पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संवर्धन आणि सांगड हीचं आहेत भौतिक गर्तेतून सुटण्याचे एकमेव साधन .....

इमेज
                       माझ्या मनात नेहमी एक विचार येतो की , आपल्या पूर्वजांकडे आपल्याहून अधिकं ज्ञान होते , त्यांची असणारी व्यवस्था ही आपल्याहूनही अधिकं प्रगत होती ,    पण मग असं कोणते वादळ आले , असे कोणते कारण होते की , ज्यामुळे त्या वेळेच्या ज्ञानाचा आणि आपला असणारा संपर्क हा थंड झाला , तुटला गेला? असा प्रश्न मला नेहमी पडतो , पण आज त्या प्रश्नाचे उत्तर उलगडल्यासारखं मला वाटतंय , ते उत्तर म्हणजे , नवीन विचार अथवा नवीन जीवन जगण्याची शैली , पद्धती . हिचं ती गोष्ट जी कारणीभूत असते , प्रत्येक युगात बदल घडवण्याला आणि हा होणारा बदल हळूवार आणि अप्रत्यक्ष असतो त्यामुळे हा होणारा बदल लवकर कुणाच्याही लक्षात येत नाही . ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे मन काही ठराविक काळानंतर एका गोष्टीवरून उडून दुसऱ्या गोष्टीवर जाऊन बसते , तसेच होते ह्या समाजाचेही .              एका गोष्टीवरून मन उडून हळू हळू दुसऱ्या गोष्टीवर रमू लागले की , तसे पहिल्या गोष्टीबाबत असणारे आपले ज्ञान हळूहळू नष्ट होतं जाते . " जसे ...