अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....
ह्या जगातील आपल्या सर्वांना येणारी दुःख ही भौतिक बंधनांमुळे येतात , कारण भौतिक सुखांची , भौतिक आनंदाची आपल्याला प्राप्ती होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या भौतिक गोष्टीच्या आधाराची गरज असते . तो आनंद कोणत्याही स्वरूपाचा असूद्यात . जेव्हा एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो अथवा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते , तेव्हा त्या व्यक्तीला सर्वाधिक दुःख होते जो व्यक्ती मृत्यू झालेल्या अथवा सोडून गेलेल्या व्यक्तीशी कोणत्या ना कोणत्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भौतिक बंधनाद्वारे जोडला गेलेला असतो कारण त्या व्यक्तीचा भौतिक सुखांचा आधार हा पूर्णपणे हरवलेला असतो , म्हणजेच थोडक्यात भौतिक बंधने तुम्हाला ह्या जगतामध्ये अडकवून ठेवण्याची काम करतात . याउलट अध्यात्मिक अंगामध्ये असते , ज्या ठिकाणी स्वतःला ह्या जगातून एका योग्य अध्यात्मिक साधनेद्वारे मुक्त करण्याचा सुंदर मार्ग दिलेला असतो . " अध्यात्मिक जगतातील स्वतःच्या मुक्तीचा मार्ग अर्थात अध्यात्मिक स्वार्थ म्हणजे स्वतःचे सोडून अवघ्या विश्वातील लोकांचे कल्याण करण्यामध्ये लप...