संस्कृतीशी जोडूनी नाळ , साधूया विश्वाचा विकास .....
आज जगभरामध्ये आपण बघत असाल की , मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य टंचाई निर्माण झालेली आहे . जमिनीवरील पाण्याची पातळी दिवसेदिवस ढासळत चाललेली आहे . जमिनीची उर्वरकता रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे नष्ट होत आहे . भारतातील शेतीयोग्य जमीनीपैकी सुमारे ४० टक्के जमीन रासायनिक खतांच्या अति वापरामुळे नापीक झालेली आहे . भारतातील अनेक भागांमध्ये जमिनीतील भूगर्भातील पातळी पूर्णपणे खालावलेली आहे . चारशे ते पाचशे फूट खोल कूपनलिका घेऊन देखील आज पाणी लागत नाहीये . आधुनिक अवजारांच्या वापरामुळे जमीन दिवसेंदिवस कडक होत चाललेली आहे आणि त्यात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव आणि गांडूळे दिवसेंदिवस नाहीसे होत आहेत . ज्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा नाहीसा झालेला आहे आणि ह्याचं गोष्टीमुळे जमिनीतील पोषकद्रव्य पिकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचतच नाहीत . ज्यामुळे आपण करतं असणारी आजची शेती ही एकप्रकारे कुंड्यांमधील किंवा एका सिमेंटच्या हौदात करत असणाऱ्या शेतीसारखी झालेल आहे . ज्यात त्या कुंडीत किंवा त्या सिमेंटच्या हौदात असणाऱ्या तेवढ्...