पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजे शिवछत्रपती आणि आजची प्रजा .......

               राजे शिवछत्रपती आणि आजची प्रजा.......             आज मितीला छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण मानीत नाही? असा प्रश्न विचारणे हे मूर्खपणाचे ठरेल . कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सातासमुद्रापार पोहचले आहे . अनेक विदेशी विद्यापीठांमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जातो . आज दुसऱ्या देशातील माणसे आमच्या छत्रपतींना त्यांच्या विचारांना  समजून घेतात त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतात पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना आमच्या मातीत जन्मले असून सुद्धा आम्ही त्यांना समजू शकलो नाही ,त्यांच्या विचारांच अनुकरण करू शकलो नाही . कारण आपण एवढ्या मोठया कर्तुत्ववान माणसाला देखील जातीच्या भोवऱ्यात ओढले .        आज आपण छत्रपतींना देव मानतो त्यांना माणूस आपण मानतच नाही किंबहुना यामुळेच ते आणि त्यांचे विचार आपल्यापासून दुरावत चालले आहे . आणि म्हणूनच आम्हाला आमच्या छत्रपतींची आठवण फक्त त्यांच्या जयंतीला , त्यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी होते , आणि इतर दिवशी ते आमच्यात जिवंत नस...

व्यथा शेतकऱ्यांची ......

      अगदी काल परवाची गोष्ट कांद्याचा बाजार अजून वाढू नये म्हणून बाहेरील देशातून (विशेषतः पाकिस्तान) 2000 मॅट्रिक टन इतका कांदा आयात करण्याचं निवेदन सरकारने सादर केले. याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या मालाचा बाजारभाव वाढला की तो कमी करण्यासाठी सरकार दरबारी लगेच निर्णय घेतला जातो पण जेव्हा शेतकऱ्याचा माल हा मातीमोल भावात खरेदी केला जातो तेव्हा कोणताही निर्णय सरकार दरबारी घेतला जात नाही असं का? किराणा मालाचे, कपड्यांचे, नटण्या थाटण्याच्या गोष्टींचे बाजारभाव कितीही महाग असले तरीही शहरातील लोक तिथे कोणत्याही प्रकारचा आवाज न करता ते खरेदी करतात पण कांदा ज्याचे बाजारभाव फक्त 30 रु किलो झाले तरी सुद्धा लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आणि सरकारला जाब विचारायला लागली आणि सरकारने देखील त्यांची साथ द्यायला सुरुवात केली. पण याचा विचार कोणीच करत नाही की जो शेतकरी आपल्या मालाला सोन्यासारखा जपतो आणि त्यो माल जेव्हा बाजारात दोन तीन रू किलो या कवडीमोल दराने विकला जातो तेव्हा त्या शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी येत नसेल का? याचा विचार कोणी करते का? इथे शेतकऱ्यांनी एवढी आंदोलने केली कित्येक शेतकऱ्यां...

आम्ही भारताचे लोक

"भारत माझा देश आहे " म्हणून मी इथे काहीही करतो. "सारे भारतीय माझे बांधव आहेत" म्हणून मी कोणीही फैलावलेल्या अफवेमुळे माझ्याच बांधवांशी भांडतो."माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे" म्हणून मी कोठेही कचरा टाकतो , आणि ह्या देशातील ऐतिहासिक वास्तुंना खराब करतो. " माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे " म्हणूनच का मी वेस्टर्न मूवी बघून माझ्याच देशातील माझ्याच बहिणींवर वाईट नजरा टाकतो त्यांची छेड काढतो. " त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयन्त करेल " म्हणूनच का मी समोर वाईट घडत असताना देखील त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त पाहत राहतो. " मी माझ्या पालकांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा सदैव मान ठेवीन आणि त्यांच्याशी सौजन्याने वागेन " म्हणूनच का मी वडीलधाऱ्या माणसांना एकेरी नावाने उच्चारतो , गुरुजनांना शिवीगाळ करतो . " माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिन्या करत आहे " म्हणूनच का मी देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराला अधिक चालना देतो आणि ...