व्यथा शेतकऱ्यांची ......
अगदी काल परवाची गोष्ट कांद्याचा बाजार अजून वाढू नये म्हणून बाहेरील देशातून (विशेषतः पाकिस्तान) 2000 मॅट्रिक टन इतका कांदा आयात करण्याचं निवेदन सरकारने सादर केले. याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या मालाचा बाजारभाव वाढला की तो कमी करण्यासाठी सरकार दरबारी लगेच निर्णय घेतला जातो पण जेव्हा शेतकऱ्याचा माल हा मातीमोल भावात खरेदी केला जातो तेव्हा कोणताही निर्णय सरकार दरबारी घेतला जात नाही असं का? किराणा मालाचे, कपड्यांचे, नटण्या थाटण्याच्या गोष्टींचे बाजारभाव कितीही महाग असले तरीही शहरातील लोक तिथे कोणत्याही प्रकारचा आवाज न करता ते खरेदी करतात पण कांदा ज्याचे बाजारभाव फक्त 30 रु किलो झाले तरी सुद्धा लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आणि सरकारला जाब विचारायला लागली आणि सरकारने देखील त्यांची साथ द्यायला सुरुवात केली. पण याचा विचार कोणीच करत नाही की जो शेतकरी आपल्या मालाला सोन्यासारखा जपतो आणि त्यो माल जेव्हा बाजारात दोन तीन रू किलो या कवडीमोल दराने विकला जातो तेव्हा त्या शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी येत नसेल का? याचा विचार कोणी करते का? इथे शेतकऱ्यांनी एवढी आंदोलने केली कित्येक शेतकऱ्यांनी आपले प्राण मुकले पण ह्या जगाच्या पोशिंद्याकडे लक्ष द्यायला आपल्या सरकारला वेळ नाहीये. अरे आपला देश कृषिप्रधान आहे हे आपण जगाला अभिमानाने सांगतो पण हे अभिमानाने सांगताना आपण कसे काय विसरतो की ज्या शेतकऱ्यामुळे आपला देश कृषिसंपन्न आहे त्या शेतकऱ्याची मुलेबाळे आज उपाशी झोपताहेत, त्यांना चांगलं शिक्षण आणि राहायला चांगली जागा मिळत नाहीये, त्या शेतकऱ्याला आपण विसरतो?
मध्यंतरी मी Watsapp वर एक फोटो बघितला होता त्या फोटो मध्ये दहीहंडी मध्ये जसे थर असतात ना तसे थर दिले होते आणि प्रत्येक थरावर वेगवेगळे काम करणारे लोक, पहिल्या थरावर महाराज, धर्मगुरू, दुसऱ्या थरावर राज्यकर्ते, तिसऱ्या थरावर व्यवसायदार, चौथ्या थरावर नोकरदार, आणि सगळ्यात खालच्या थरावर शेतकरी आणि सैनिक, म्हणजे देशातील सर्व लोकांचा भार शेतकरी आणि सैनिकांनी सांभाळायचा आणि एवढे करूनही सर्वात जास्त दुःख ह्या दोघांनाच, असं का? उपासमारीची वेळ ह्या दोघांवरच, का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्याच्या आणि सैनिकांच्या मनात निर्माण होतात पण ह्या प्रश्ननांची उत्तर द्यायला कोणतचं सरकार तयार होत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार करतो आहे असे प्रत्येक सरकार दाखवते पण यावर उपाय कोणीच शोधत नाही. पण एक लक्षात ठेवा जर आम्ही शेतकऱ्यांनी आणि सैनिकांनी जर हा खालचा थर काढून घेतला ना तर तुमची इमारत कोसळण्यासाठी आजिबात वेळ लागणार नाही. पण आम्ही असं करणार नाही कारण आमचं ह्या देशावर आमच्या प्राणापलीकडचं प्रेम आहे म्हणून आज आम्ही अन्याय होत असताना देखील शांत आहे. पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते म्हणून त्या मर्यादेपलीकडे जाऊ नका एवढीच एक विनंती आहे नाहीतर परिणामांची जाणीव तुम्हाला असेलच........
...........एक शेतकरी.......
ओंकार विश्वास डुंबरे
ओतूर ( जुन्नर)

You r correct, right
उत्तर द्याहटवा🙏🏻
हटवाBarobar ahe
उत्तर द्याहटवा🙏🏻
हटवा👌
उत्तर द्याहटवा👍
हटवाBhai jaaan...💯❤️❤️
उत्तर द्याहटवा