स्वदेशी - एक देशवाचवा चळवळ
स्वदेशी ह्या शब्दावर आणि स्वदेशी चळवळीवर आज सद्यस्थितीला पुन्हा विचार करण्याची गरज भासू लागली आहे , कारण आज आपण ज्या परिस्थितीत धसत चाललो आहे , ज्या दृष्टीने आपण विचार करत चाललो आहेत , ती परिस्थिती , ते विचार आपल्याला शेवटी नष्ट करणारे आहेत , आपल्या देशाचं या जगातला अस्तित्व मिटवणारे आहेत . आज आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या आणि रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या बहुतेक गोष्टी ह्या विदेशी कंपनीच्या वापरत आहोत . दात घासण्यासाठी लागणाऱ्या टूथपेस्ट पासून , आपण घालत असणाऱ्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ही विदेशी कंपनीच्या बनावटीची आहे , आणि आपल्या देशातील लोकांनाही दुसऱ्या देशातील गोष्टी दिसल्या की अंगात वारं शिरतं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही . त्यामुळे आज आपण आर्थिक पारतंत्र्यात पूर्णपणे फसलो गेलो आहोत आणि त्यामुळे बाहेरच्या देशांचे अप्रत्यक्षपणे गुलामही आपण बनलेलो आहोत . " स्वातंत्र्यलढ्याच्या ...