स्वदेशी - एक देशवाचवा चळवळ

              स्वदेशी ह्या शब्दावर आणि स्वदेशी चळवळीवर आज  सद्यस्थितीला पुन्हा विचार करण्याची गरज भासू लागली आहे , कारण आज आपण ज्या परिस्थितीत धसत चाललो आहे , ज्या दृष्टीने आपण विचार करत चाललो आहेत , ती परिस्थिती , ते विचार आपल्याला शेवटी नष्ट करणारे आहेत , आपल्या देशाचं या जगातला अस्तित्व मिटवणारे आहेत . आज आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या आणि रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या बहुतेक गोष्टी ह्या विदेशी कंपनीच्या वापरत आहोत . दात घासण्यासाठी लागणाऱ्या टूथपेस्ट पासून ,
                       
आपण घालत असणाऱ्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ही विदेशी कंपनीच्या बनावटीची आहे , आणि आपल्या देशातील लोकांनाही दुसऱ्या देशातील गोष्टी दिसल्या की अंगात वारं शिरतं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही . त्यामुळे आज आपण  आर्थिक पारतंत्र्यात पूर्णपणे फसलो गेलो आहोत आणि त्यामुळे बाहेरच्या देशांचे अप्रत्यक्षपणे गुलामही आपण बनलेलो आहोत .
            " स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आपण पारतंत्र्यात असूनही स्वतंत्र सुस्थितीत होतो आणि स्वतंत्रपणे विचारही करत होतो ,  कारण विदेशी गोष्टींचा आणि विदेशी विचारांचा त्याग करून आपण स्वदेशीचा स्वीकार केला होता , पण आज आपण स्वातंत्र्यात असूनही पारतंत्र्यात आहोत कारण आज आपण स्वदेशी सोडून विदेशी गोष्टींना आणि विचारांना अपनावले आहे , त्यांचा स्वतःहून स्वीकार केला आहे . इंग्रज , डच , पोर्तुगीज  ह्या सर्व सत्ताधार्‍यांच भारतात येण्याचं पहिलं जे ध्येय होते ते म्हणजे व्यापार आणि दुसरं सत्ता . त्यांची आपल्यावर असणारी सत्ता आपण आपल्या देशामधून सक्षम पणे लढा देऊन समूळ नष्ट केली होती पण त्यांचं पहिलं ध्येय  व्यापार हे अजूनही आपण नष्ट करू शकलो नाही आणि त्यामुळंच आपण आजही ही आर्थिक पारतंत्र्यात आहोत आणि आपल्याला ह्या विदेशी देशांचे हे आर्थिक पारतंत्र्य नष्ट करताही येणारं नाही असं मला वाटतं कारण विदेशी गोष्टींशिवाय आम्हाला करमतच नाही किंबहुना त्यांना नसल्या तर आम्हाला जगताचं येणार नाही अशी आमची समजूत झालेली आहे .
              अरे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या भारतदेशातील कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी विदेशी मालावर बहिष्कार टाकला  होता आणि त्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली होती .



आठवा तो काळ , आठवा ते १९०५ सालचं लोकमान्य टिळकांचा आंदोलन , आठवा ते १९०७ सालचे वीर सावरकरांच आंदोलन आणि १९१५ सालचे महात्मा गांधींच स्वदेशी ( खादी ) आंदोलन अरे आठवा ते हुतात्मा बाबू गेनू यांचे १९२२ साली विदेशी माल घेऊन जाणाऱ्या ट्रकखाली दिलेली आपल्या प्राणांची

आहुती अरे आठवा जरा आणि विचार करा . आज मीतिला त्यांच्या जयंतीला त्यांच्या पुण्यतिथीला आपण त्यांना फक्त नावापुरतीच श्रद्धांजली वाहतो पण खरी आदरांजली , खरी श्रद्धांजली त्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा आपण विदेशी मालाचा त्याग करुन स्वदेशीचा पुन्हा स्वीकार करू .
             १९४७ साली इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं ते फक्त नावापुरतचं दिल आहे असं आज  वाटायला लागले आहे कारण आज आम्ही फक्त देहाने स्वतंत्र झालो आहोत , पण विचारांनी मात्र आजही परावलंबी आहोत किंबहुना आजच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे आम्ही परावलंबी झालो आहोत . कारण आजचे पालक हे त्यांच्या पाल्यांना मराठी

किंवा त्यांच्या मातृभाषेत शिकवण्याऐवजी त्यांना इंग्रजीचे धडे देत आहेत , त्यांना इंग्रजीमधून विचार करायला भाग पाडत आहेत . भारतामध्ये इंग्रजांनी इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी सुरूवात केली , ती भारतीयांचा विकास व्हावा यासाठी नाही ,

तर त्यांना कमी पैशांमध्ये कारकुनी करणारी माणसे इथेच मिळावी त्यांना ती त्यांच्या देशातून आणावी लागू नये म्हणून आणि आम्ही ह्या गोष्टीचा विचार न करता " इंग्रजी म्हणजेच विकास " असं खूळ डोक्यात घेऊन बसलेलो आहोत .  अरे फक्त बारा हजार शब्द असूनही आपण त्यांच्या भाषेचा अभ्यास करत आहोत आणि ३८००० शब्द असणारी आपली मराठी , इंग्रजीपेक्षा कितीतरी पट सुसंस्कृत आणि समृद्ध आहे आणि तरीही आम्ही इंग्रजीकडे पळत चाललो आहोत .
          आता आपली आरोग्य

व्यवस्थाच घ्या की , आरोग्यव्यवस्था आपली पण ती सर्व नियंत्रित होते ती विदेशी कंपनीद्वारे , भारतामध्ये विकली जाणारी औषधे ही सर्व विदेशी कंपनींची , जगातील सर्वात जास्त रोग्यांची संख्या ही भारतातचं , आजमितीला तुम्हाला आढळेल . ज्या गोळ्या औषधांनी आजार नष्ट व्हायला हवेत , तीच  गोळ्या औषधे खाऊन नवनवीन आजार वाढत चालले आहेत आणि काही काही आजार तर कंपन्यांना फायदा वाढावा म्हणून तयार केले जात आहेत आणि आम्ही मात्र त्यावर विचार करत नाहीये . अरे जगातील पहिली शस्त्रक्रिया ही भारतात झाली , अरे जगाला औषध शास्त्राचे ज्ञान देणारे सुश्रुत हे भारताचेच , सर्व काही आमचं , सर्व काही आम्ही जगाला शिकवल पण नावावर मात्र विदेशी लोकांच्या ही दुर्दैवी परिस्थिती आज आपली आहे कारण आम्ही निर्विचार बनत चाललो आहोत .
                 अरे तीन ते चार महिन्यांपूर्वीचीचं गोष्ट आहे , एका संशोधनात सिद्ध झाले की अंडे शाकाहारी आहे , अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये छापून आली आणि आपल्या लोकांनीही ती गोष्ट सत्य आहे की असत्य हे विचार न करता ती फक्त संशोधनात सिद्ध झाल्यामुळे त्या गोष्टीला खरं मानलं , पण आम्ही विचार केला नाही की ज्या गोष्टीपासून कोंबडीचे पिल्लू तयार होतं ती गोष्ट शाकाहारी कशी , अरे स्रीच्या पोटामध्ये असणारा मांसाचा गोळा म्हणजेच लहान अभ्रक त्याला जर आपण बाहेर काढलं तर हत्या सिद्ध होते पण खरं तर सातव्या महिन्यामध्ये त्या मांसाच्या गोळ्यांमध्ये प्राण येतो . मग आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये त्याला बाहेर काढलं तर ती हत्या कशी ? म्हणजेच आपण मानतो की , मांसाच्या गोळ्या पासून बाळ तयार होणार आहे . तर मग अंड्यापासून कोंबडी

तयार होते , हे आपणाला माहीत असून सुद्धा , आपण त्याला शाकाहारी का मानावे याचा विचार आपण करायला हवा आणि आपण समजून घ्यायला हवं हे संशोधन वगैरे सर्वकाही चाली आहेत व्यापार वाढवण्यासाठी , अशा असंख्य चाली संशोधनाचा आधार घेऊन आपल्यावर हे व्यापारी लोक लादत चालले आहेत आणि आपण फक्त आपल्या संस्कृतीचा , आपल्या परंपरांचा आणि आपल्या रूढीगत ज्ञानाचा विचार न केल्यामुळे आपण त्यांना बळी पडतं चाललो आहोत . आज आपल्याला हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेले ज्ञान चुकीचे वाटते आणि हे काल परवा तयार झालेले हे ज्ञान सत्य वाटते . अरे विचार करा जरा काही दिवसांनी संशोधनाचा आधार घेऊन मांसही शाकाहारी आहे असे सिद्ध नाही ना केले या व्यापाऱ्यांनी तर नाव बदला माझे .
              अरे हजारो वर्षापासून चालेले आलेले आमचे

आयुर्वेद चुकीचे आणि काल जन्मलेली ही ॲलोपॅथी बरोबर हा कुठला न्याय आहे . फक्त व्यापाराचा विचार करणाऱ्या ह्या विदेशी कंपन्यांना माणूस देखील एक व्यापाराचे साधन दिसत आहे आणि आपण फक्त आशेचा एक किरण दाखवणाऱ्या ह्या खराब विदेशी गोष्टींमुळे आणि विचारांमुळे प्रगतीचा आणि विकासाचा आपला प्राचीन सूर्य आपल्यापासून दूर करत चाललो आहे .
         अरे अजूनही आपण स्वतःला बदलले नाही ना! , तर या देशाचा कचरा आणि विदेशी कंपन्यांची चांदी व्हायला वेळ लागणार नाही . म्हणून स्वतःत बदल करा व स्वदेशी गोष्टींचा , स्वदेशी भाषेचा वापर वाढवा आणि आपल्या देशाला परिपूर्ण आणि स्वावलंबी बनवा .

                           वंदे मातरम् जय हिंद

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....