पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकारण , स्वतंत्र आणि देशाचे खरे वास्तव्य .....

इमेज
         आज आपल्या देशात घेतले जाणारे  निर्णय , मांडली जाणारी विधेयके , राबवली जाणारी धोरणे ही सामान्य जनतेला , शेतकऱ्यांना , जे देशासाठी दिवस-रात्र खपतात त्या सैनिकांना लक्षात घेऊनचं‌ मांडायला आणि मान्य करायला हवीतं , ते कोणत्याही एका ठरावीक लोकांच्या गटासाठी  घेतली जायला नकोत . पण आज आपल्या देशामध्ये सामान्य माणसासाठी , शेतकऱ्यांसाठी , सीमेवरील जवानांसाठी कोणतेही निर्णय न घेता फक्त देशातील दोन ते तीन टक्के लोकांसाठी ते घेतले जात आहेत आणि जरी सामान्य जनतेसाठी निर्णय घेतले , तरी ते कधीही अंबलबजावणीमध्ये येतचं नाहीत , ते फक्त दिखाऊपणासाठी घेतले जातात . त्यामुळे आपल्या देशाची प्रगती सर्व बाजूंनी न होता फक्त एकाचं बाजूने होते आहे . ज्याप्रमाणे कागदाचा एकच कोपरा जर वर केला असल्यास , त्यावरील असणाऱ्या गोष्टी ज्याप्रमाणे आजूबाजूला पांगल्या जातात ना! तसेच आज आपल्या देशातील लोक विस्कटले गेले आहेत , कारण देशाची प्रगती फक्त एकाचं दिशेने होत आहे . आज भारताची लोकसंख्या १३५ कोटीच्या घरात आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या जर असेल तर देशासाठी कोण...