राजकारण , स्वतंत्र आणि देशाचे खरे वास्तव्य .....



         आज आपल्या देशात घेतले जाणारे  निर्णय , मांडली जाणारी विधेयके , राबवली जाणारी धोरणे ही सामान्य जनतेला , शेतकऱ्यांना , जे देशासाठी दिवस-रात्र खपतात त्या सैनिकांना लक्षात घेऊनचं‌ मांडायला आणि मान्य करायला हवीतं , ते कोणत्याही एका ठरावीक लोकांच्या गटासाठी  घेतली जायला नकोत . पण आज आपल्या देशामध्ये सामान्य माणसासाठी , शेतकऱ्यांसाठी , सीमेवरील जवानांसाठी कोणतेही निर्णय न घेता फक्त देशातील दोन ते तीन टक्के लोकांसाठी ते घेतले जात आहेत आणि जरी सामान्य जनतेसाठी निर्णय घेतले , तरी ते कधीही अंबलबजावणीमध्ये येतचं नाहीत ,

ते फक्त दिखाऊपणासाठी घेतले जातात . त्यामुळे आपल्या देशाची प्रगती सर्व बाजूंनी न होता फक्त एकाचं बाजूने होते आहे . ज्याप्रमाणे कागदाचा एकच कोपरा जर वर केला असल्यास , त्यावरील असणाऱ्या गोष्टी ज्याप्रमाणे आजूबाजूला पांगल्या जातात ना! तसेच आज आपल्या देशातील लोक विस्कटले गेले आहेत , कारण देशाची प्रगती फक्त एकाचं दिशेने होत आहे . आज भारताची लोकसंख्या १३५ कोटीच्या घरात आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या जर असेल तर देशासाठी कोणतीही भांडवलशाही अर्थव्यवस्था उपयोगी पडणार नाहीये , तर इथे फक्त समाजवादी तत्वज्ञानचं लागू पडेल . जर देशाची लोकसंख्या कमी असती तर भांडवलशाही अर्थव्यवस्था योग्य होती , पण जिथे लोकसंख्याचं मुळात जास्त आहे तिथे भांडवलशाही शक्य नाही , कारण भांडवलशाहीमुळे देशाचा असणारा पैसा हा मोजक्याचं लोकांकडे आकसला जातो आणि त्यामुळे बाकीचे लोकं फक्त आणि फक्त त्या थोडक्या लोकांच्या आधारावर उभी राहतात त्यांचा विकास मात्र होतचं नाही . त्यामुळे देश विकसित होण्यापेक्षा अविकसितचं बनतं जातो आणि लोकं अधिक गरीब . म्हणून आपल्या सरकारने खाजगीकरणाच्या मागे जायचे सोडून समाजकारणाकडे लक्ष द्यायला हवे .

          आज आपण आकाशामध्ये जेव्हा बघतो , तेव्हा लाखो तारे आपल्याला चमकताना दिसतात , कशामुळे? तर सूर्यामुळे , पण हा सूर्यचं नष्ट झाला तर! तारे चमकणार आहेत का? नाही ना! तसेच आपण आपल्या देशाची संपत्ती ही देशातील दोन ते तीन टक्के लोकांकडे राखून ठेवली तर , बाकीचे लोकं फक्त त्यांचे गुलाम बनतील , त्यांचा स्वतःचा विकास मात्र होणार नाही . म्हणून जर देशाचा व्हावा असे वाटतं असेल , तर देशातील संपत्तीचे सर्व लोकांकडे समान वितरण व्हायला हवे . आज आपण आपल्या देशाचा विकास दरीच्या काठावर उभे राहून करत आहोत . कोणताही भविष्याचा वेध न घेता फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा हा देशाचा दिखाऊ विकास आपण करत आहोत .
         आता आपल्या देशाच्या स्वायत्तेचा विचार करू . स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात आपण ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होतो . विदेशी गोष्टीचा , वस्त्रांचा , शिक्षणाचा आपण त्याकाळात त्याग करत होतो का तर , आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं म्हणून ना! मग आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही , आजही आपण दुसऱ्या देशांचे , त्यांच्या भाषेचे , त्यांच्या शिक्षणाचे , संस्कृतीचे , सणांचे अप्रत्यक्षरीत्या गुलाम का आहोत . कारण आपल्याला परिपूर्ण स्वातंत्र्य हवं नव्हतं तर फक्त आपल्यावर राज्य करणारे विदेशी नको होते , म्हणून आजही आपण त्यांचे अप्रत्यक्षरीत्या गुलामचं आहोत .

       अरे १९०६ सालच्या कोलकत्याच्या अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याची चतु:सुत्री मांडली होती . त्यांनी स्वराज्य , स्वदेशी , बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे त्या चतुःसूत्रीचे महत्वाचे घटकं सांगितले होते . पण आज मितीला आम्ही यातील एकचं घटकं आमच्याकडे ठेवला आहे तो म्हणजे " स्वराज्य " पण ह्या स्वराज्याचा देखील आज अर्थ बदललेला आहे आणि तो " सत्ताराज्य " एवढाचं उरलेला आहे . उरलेले बाकीचे तिन्ही घटकं आम्ही आजही विदेशी लोकांच्या डोक्याप्रमाणे वापरतोय . आज आम्ही स्वदेशी गोष्टींपेक्षा विदेशी गोष्टींच जास्त प्रमाणात वापरतो आहे . आज संस्कृती , भाषा , पेहराव सर्वच गोष्टी विदेशी वापरायला आपल्या देशातील तरुण बघतात आणि बहिष्काराबाबत बोलायचे झाले तर आज आपण आपल्याचं स्वदेशी गोष्टींवरचं बहिष्कार टाकलेला आहे . आज देशातील राष्ट्रीय शिक्षणासंबधीत कार्यक्रमांत आपण प्रादेशिक भाषेंपेक्षा विदेशी इंग्रजी भाषेलाचं आधीक महत्व दिलेले आहे . म्हणजे आज इथे प्रत्यक्षपणे इंग्रज नसूनही , आपण आजही अप्रत्यक्षरीत्या त्यांचे काम पुढे चालवीतं आहोत , इतके अविचारी आपण आज झालेलो आहोत .
          आज आपल्या देशातील नेत्यांचा फक्त सत्ता उपभोगणे एवढाचं उद्योग होऊन बसलेला आहे आणि देशातील लोकांचा परावलंबी बनण्याचा . हा देश ज्या गोष्टींमुळे विकसित होऊ शकतो , त्याचं विदेशी असल्यामुळे आपला देश दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे . आजच्या स्थितीला आपल्या देशातील नेते सत्ता मिळवण्यासाठी लढत आहेत तर , इथल्या तरुण वर्ग क्षणिक आनंद मिळवण्यासाठी . त्यामुळे आपला देश पुन्हा एकदा प्रत्यक्ष पारतंत्र्यात तर जाणार नाही ना! अशी भीती वाटते आहे? आज फक्त आपलं शरीरचं भारतीय आहे पण आपले विचार , भाषा , पेहराव सर्व गोष्टी विदेशी बनत चालल्या आहेत .
          आज मितीलां भारत जगातला सर्वात तरुण असणारा देश आहे पण आपलं दुर्दैव असं की , इतकी प्रचंड ताकद , बुद्धिमत्ता असूनही आपण आजही त्याचं देशांचे अप्रत्यक्ष गुलाम आहोत . जगातील सर्वात प्राचीन धर्म असणारा , सर्वात मोठा इतिहास असणारा , सर्वांत जास्त ज्ञान असणारा हा देश आजही दुसऱ्यांच्याचं आधारावर जगण्याचा प्रयत्न करतोयं . याचं कारण येथे स्वार्थाला आधीक महत्त्व दिले जात आहे , त्यामुळे पारतंत्र्याची घारीने आज आपल्या देशावर घिरट्या घालायला सुरुवात केलेली आहे आणि तिची सावली आपल्यावर पडायला देखील लागलेली आहे . म्हणून सावध व्हा आणि ह्या विदेशीच्या जाळ्यातून बाहेर पडून आपल्या देशाचा विकास करा .....







         ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भारतीय संस्कृती आणि व्यापाराचा विश्वसंचार .....