पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रत्येक अंगाचा विकास , म्हणजेचं सर्वांगीण विकास .....

इमेज
                  ज्यावेळेला घरातील सर्वोच्च स्थानावर असणारी व्यक्ती तिचे कर्तव्य व्यवस्थित बजावतं नाही , त्यावेळेला जशी कुटुंबव्यवस्था ढासळते ना! तसेचं ज्यावेळेला एकमेकांच्या सहकार्यावर आधारितं असणाऱ्या ह्या समाजव्यवस्थेतील एखादा घटक , त्याचे कर्तव्य निस्वार्थीपणे आणि निष्ठेने जेव्हा बजावतं नाही ना! त्यावेळेला बाकीचा समाज गोंधळला जाऊन समाजात अराजकता माजली जाते आणि सामाजिक व्यवस्था ही ढासळली जाते आणि असा समाज सजीवमात्रांसाठी राहण्यास अयोग्य बनतो . आज मितिला ह्या जगामध्ये अराजकतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसतचं आहे कारण आज अनेकजण त्यांना दिलेली काम योग्यरीत्या आणि जनतेशी निष्ठा ठेऊन पार पाडण्यापेक्षा , आपण करतं असणाऱ्या कामाचा , आपल्या स्वार्थासाठी कसा जास्तीत जास्त वापर करून घेता येईल याचाचं विचार करतो आहे आणि ह्या समाजातील घटकांनी त्यांचे असणारे काम नीटं न केल्यामुळे , समाजातील बाकीच्या घटकांना त्यांचे आधिकार प्राप्त करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था हाती घ्यावी लागते आणि त्यातूनचं कधी हिंसाचार घडून देशाच्या संविधानिक व्यव...

एकमेकांच्या सहकार्यावरचं तर अवलंबून आहे , जगाचे परिपूर्ण भविष्य .....

इमेज
                  भारतीय अध्यात्मिक ग्रंथांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की ,  कलियुगामध्ये म्हणजेच आज आपण ज्या युगामध्ये जगतं आहोत ना! त्या युगात , संघांमध्ये प्रचंड प्रमाणात ताकद असणार आहे . कलियुगामध्ये जी ही कामे एकत्र येऊन , एकमेकांच्या सहाय्याने आणि सहकार्याने केली जातील , तीचं कामे मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील आणि दीर्घकाळ टिकणारी देखील असतील , कारण कलियुगामध्ये कोणत्याही एकाचं व्यक्तीकडे सर्वकाही असेल , असे कलियुगात घडणारं नाही . प्रत्येक गोष्टीबाबत , प्रत्येक शक्तीबाबत कलियुगातील समाज आणि समाजातील व्यक्ती ह्या विभागल्या गेलेल्या असणार आहेेत . अर्थात असे की , काही लोकांकडे शारीरिक ताकद ही मोठ्या प्रमाणात असणारं , तर काहींकडे बौद्धिक ज्ञान हे प्रचंड प्रमाणात असेल , काहींकडे धनाचे सामर्थ्य आधिक असेल , तर काहींकडे ते धन वापरून अथवा धनाशिवाय करावयाच्या नवनिर्मितीच्या कल्पना आणि त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे धाडस हे मोठ्या प्रमाणावर असेल आणि आज तुम्ही ही परिस्थिती तुमच्या आजूबाजूला प्रत्यक्षात बघतचं असाल . ...