भारतीय अध्यात्मिक ग्रंथांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की , कलियुगामध्ये म्हणजेच आज आपण ज्या युगामध्ये जगतं आहोत ना! त्या युगात ,
संघांमध्ये प्रचंड प्रमाणात ताकद असणार आहे . कलियुगामध्ये जी ही कामे एकत्र येऊन , एकमेकांच्या सहाय्याने आणि सहकार्याने केली जातील , तीचं कामे मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील आणि दीर्घकाळ टिकणारी देखील असतील , कारण कलियुगामध्ये कोणत्याही एकाचं व्यक्तीकडे सर्वकाही असेल , असे कलियुगात घडणारं नाही . प्रत्येक गोष्टीबाबत , प्रत्येक शक्तीबाबत कलियुगातील समाज आणि समाजातील व्यक्ती ह्या विभागल्या गेलेल्या असणार आहेेत . अर्थात असे की ,
काही लोकांकडे शारीरिक ताकद ही मोठ्या प्रमाणात असणारं , तर काहींकडे बौद्धिक ज्ञान हे प्रचंड प्रमाणात असेल , काहींकडे धनाचे सामर्थ्य आधिक असेल , तर काहींकडे ते धन वापरून अथवा धनाशिवाय करावयाच्या नवनिर्मितीच्या कल्पना आणि त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे धाडस हे मोठ्या प्रमाणावर असेल आणि आज तुम्ही ही परिस्थिती तुमच्या आजूबाजूला प्रत्यक्षात बघतचं असाल .
जर
अध्यात्मिक ज्ञानाच्या सहाय्याने विचार केला आणि सध्याच्या परिस्थितीचे नीटं निरीक्षण केले , तर एक बाब नक्कीचं लक्षात येईल ती म्हणजे ,
आजच्या युगामधील जेव्हा ५०० शे मनुष्य एकत्र येतील आणि ते एकत्र येऊन त्यांची जेवढी शाररिक आणि बौद्धिक क्षमता निर्माण होईल तेवढीचं क्षमता सतयुगातील एका व्यक्तीची असेल , आजच्या युगातले ज्यावेळेला ३०० शे मनुष्य एकत्र येऊन कोणतेही कार्य करतील तेव्हा त्यांचे ते कार्य त्रेतायुगातील एका मनुष्याने केलेल्या कार्यासमान होईल आणि ज्यावेळेला आजचे १०० मनुष्य एकत्र येऊन त्यांची जेवढी ताकद उत्पन्न होईल तेवढीचं ताकद ही द्वापारयुगातील एका व्यक्तीकडे असेल , इतक्या मोठ्या प्रमाणावर या आजच्या युगामध्ये मनुष्याची ताकद विभागली गेलेली आहे . म्हणून आपण आता तरी जागृत व्हायला हवे आणि ह्या विभागलेल्या ताकदीला आणि विभाजलेल्या शक्तीला एकत्र करायला हवे अन् एकमेकांच्या सहाय्याने आणि सहकार्याने एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवेतं .
आज जगामध्ये प्रत्येक जण फुगलेल्या आर्थिक स्थितीमुळे स्वतःला खूप मोठ्या प्रमाणात बलाढ्य समजायला लागलेला आहे . पैशाच्या बळावर मी सर्व काही करू शकतो , जगातील कोणतीही गोष्ट मी साध्य करू शकतो असा समज आज अनेक लोकांचा झालेला आहे . त्यामुळे आज बहुतांश ठिकाणी बहुतेक लोकं विभक्तपणे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना दिसतं आहेत . म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी , ती म्हणजे तुम्ही कितीही विभक्तरित्या स्वतःचे अस्तित्वासाठी प्रयास केला , तरी तुम्ही निर्माण केलेले तुमचे अस्तित्व हे परिपूर्ण नसणारं आहे , कारण
परिपूर्ण साम्राज्याची जर निर्मिती करावयाची असेल ना! तर निर्मिती करणारा मनुष्य देखील परिपूर्ण असायला लागतो . तो ज्ञानाच्या बाबतीत असो , क्षमतेच्या बाबतीत असो वा सामर्थ्याच्या बाबतीत आणि असा मनुष्य आजच्या युगात सापडणे , संत सोडले तर , अशक्यचं आहे . कारण कलियुगातील मनुष्य काम , क्रोध , मोह , मत्सर , माया आणि द्वेष यांच्या आहारी गेल्यामुळे अपूर्ण झालेले आहेत . पण तरीही ते परिपूर्ण होऊ शकतात आणि परिपक्व अन् दिर्घकाळ टिकणारे योग्य अस्तित्व निर्माण करू शकतात , जर त्यांनी वाईट भावनांना आळा घातला आणि एकत्र येऊन सहकार्याने आणि एकमेकांच्या सहाय्याने काम करू लागले तर . म्हणूनचं जर तुम्हाला एका उज्ज्वल , उत्तम आणि परिपूर्ण अश्या भविष्याची स्थापना करावयाची असेल ना! तर आपण सर्वांनी एकत्र यायला हवं आणि एकमेकांच्या सहाय्याने काम करायला शिकायला हवं . ते कोणत्याही क्षेत्रातले असो , तेव्हाचं एका चांगुलकीने बलाढ्य असणाऱ्या जगाच्या भविष्याची आपण निर्मिती करू शकतो .....
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा