पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वदेशीचा स्वीकार हाचं देशाचा विकास .....

इमेज
                      आज सद्यस्थितीला एक गोष्ट मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये गाजत आहे , ती म्हणजे समाजमाध्यमांतील युट्युब आणि टिक टॉक ह्या ॲप वापरकर्त्याचीमधील संघर्ष . एका विदेशी अँपच्या वापरकर्त्याने एका दुसऱ्या विदेशी अँप वापरकर्त्यांची आणि त्या विदेशी ॲपची बदनामी केली आणि आपल्या देशातील तरुणगण त्या वापरकर्त्यांच्या तसेचं त्या अँपच्या विरोधात आणि दुसऱ्या विदेशी अँपच्या समर्थनार्थ रणांगणात उभे राहायला तयार झाले म्हणजेच थोडक्यात असे की ,    लग्न झालं दुसऱ्याचं आणि नाचतयं तिसरं माणूस , पण हे करताना आपल्याला हे लक्षात आलं नाही की , या गोष्टीमध्ये आपला आणि आपल्या देशाचा काडीमात्रही फायदा नाही . कारण ज्या अँपला विरोध करतोय तेही विदेशी आहे आणि ज्याचे आपण समर्थन करतोय तेही विदेशीचं म्हणजे एकूण विरोध करूनही तोटा आपलाचं आणि समर्थन करूनही तोटा आपलाचं . म्हणून जर बहिष्कार टाकायचा असेल ना! तर सर्व विदेशी गोष्टींवर टाकायला हवा आणि आपल्या देशातील व आपल्या लोकांकडूून निर्माण केल्या जाणाऱ्या सर्व स्वदेशी गोष्टींचा स्वीकार...