स्वदेशीचा स्वीकार हाचं देशाचा विकास .....

          
           आज सद्यस्थितीला एक गोष्ट मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये गाजत आहे , ती म्हणजे समाजमाध्यमांतील युट्युब आणि टिक टॉक ह्या ॲप वापरकर्त्याचीमधील संघर्ष . एका विदेशी अँपच्या वापरकर्त्याने एका दुसऱ्या विदेशी अँप वापरकर्त्यांची आणि त्या विदेशी ॲपची बदनामी केली आणि आपल्या देशातील तरुणगण त्या वापरकर्त्यांच्या तसेचं त्या अँपच्या विरोधात आणि दुसऱ्या विदेशी अँपच्या समर्थनार्थ रणांगणात उभे राहायला तयार झाले म्हणजेच थोडक्यात असे की , 

  लग्न झालं दुसऱ्याचं आणि नाचतयं तिसरं माणूस , पण हे करताना आपल्याला हे लक्षात आलं नाही की , या गोष्टीमध्ये आपला आणि आपल्या देशाचा काडीमात्रही फायदा नाही . कारण ज्या अँपला विरोध करतोय तेही विदेशी आहे आणि ज्याचे आपण समर्थन करतोय तेही विदेशीचं म्हणजे एकूण विरोध करूनही तोटा आपलाचं आणि समर्थन करूनही तोटा आपलाचं . म्हणून जर बहिष्कार टाकायचा असेल ना! तर सर्व विदेशी गोष्टींवर टाकायला हवा आणि आपल्या देशातील व आपल्या लोकांकडूून निर्माण केल्या जाणाऱ्या सर्व स्वदेशी गोष्टींचा स्वीकार करायला हवा त्या सामाजिक , ज्ञानिक , भाषिक कोणत्याही क्षेत्रातील असो . 

            आज तुम्ही जर नीट निरीक्षण केले ना! तर तुम्हाला समजेलं आपला देश आज अनेक गोष्टींबाबत दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे . याचे कारण म्हणजे आपण आपल्या देशातील गोष्टींना नीचं मानतो आणि बाहेरच्या गोष्टींना उच्च , त्याचबरोबर आपले आपापसात असणारी भांडणे , अंतर्गत कलहामुळे आपण आपल्या शेजारी असणाऱ्या चांगल्या गोष्टींना न स्वीकारता विदेशातून येणाऱ्या वाईट गोष्टींना पूर्ण निष्ठेने स्वीकारतो आणि म्हणून ह्या अशा गोष्टींमुळे आपला देश हा दुसऱ्या देशांचा गुलाम बनतं चाललेला आहे . आपल्यात ताकद असूनही आपण अकार्यक्षम बनतं चाललो आहोत , आपल्यात योग्यता असूनही आपण षंडासारखे शांतच राहत आहोत आणि त्यामुळेचं ही पारतंत्र्याची साखळी दिवसेंदिवस अधिकाधिक जाड होत चालली आहे . 

          याआधीही आपण पारतंत्र्यात गेलो होतो पण त्यावेळीचे ते पारतंत्र्य हे प्रत्यक्षपणाचे होते आणि आता आपण ज्या पारतंत्र्यात चाललो आहोत ना! हे पारतंत्र्य अप्रत्यक्षपणाचे आहे , जे की , सामाजिक , शैक्षणिक , भाषिक , सांस्कृतिक , आर्थिक क्षेत्रातले आहे आणि ह्या सर्वांमध्ये आपल्या देशातील तरुण हा दुसऱ्या देशांमधील सत्ता आणि आर्थिक संघर्षामधील माकड होऊन बसला आहे , त्याला जिकडे आधीकं फायदा दिसेल तिकडे तो पळायला लागतो . आजच्या बहुतांश तरुणांमध्ये देशाबद्दल प्रेम नाहीये , पण समाजमाध्यमांवर टाकण्याइतपत प्रेम मात्र त्याच्यांमध्ये निश्चितचं आहे . त्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात , " देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी , आपण सर्वांनी आत्मनिर्भर बनायला हवे " असे सांगितले आणि आम्ही पण समाजमाध्यंमावर तो संदेश एकमेकांना पाठवून शांत झालो . जसे की , आपले कार्य संपले , पण आपले कार्य इथून सुरू झालेले आहे हे आपण समजून घेऊ शकलो का? 
          भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की , याआधी आपल्यातील अंतर्गत कलहांमुळे आपला देश हा पारतंत्र्यात गेलेला होता आणि जेव्हा भविष्यात देखील अशी परिस्थिती पुन्हा उत्पन्न होऊन  आणि आपला देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल ना! तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवणे खूप अवघड होऊन बसेल आणि आज तो विचार प्रत्यक्षात येतो की काय असे दिसू लागलेले आहे . पण तरीही अजूनही वेळ आपल्या हातातून गेलेली नाहीये , आपण आता तरी जागे होऊया आणि विदेशी गोष्टींसाठी भांडण्यापेक्षा , त्यांचे समर्थनासाठी आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या शक्तीचा वापर आपल्या स्वदेशीच्या विकासावर खर्च करूया . जेणेकरून आपण आपल्या देशाचा विकास करून आपल्या देशाला सर्वांगाने परिपूर्ण आणि समृध्द बनवू ..... 




..... वंदे मातरम ... जय हिंद ... जय भारत .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....