प्रत्येक गोष्टीत सत्यता हाचं जीवनाचा पाया .....
तीन ते चार दिवसांपूर्वी केरळमध्ये एका गर्भवती हत्तीनीचा बळी घेतला गेला आणि बघता बघता ही गोष्ट पूर्ण भारतभर आगी सारखी पसरली . या गोष्टीचा प्रत्येक स्तरातून निषेध व्यक्त केला गेला . या निषेध व्यक्त करण्यामध्ये बहुतेक नायक-नायिका , नेते , सामाजिक कार्यकर्ते असे अनेक जण होते . त्या हत्तीनीची हत्या झाली ही बाब चुकीचीचं आहे , पण या चुकीच्या बाबीवर टीका करणाऱ्या व्यक्ती बरोबरचं आहेत हे कशावरून . कारण या टीका करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य व्यक्ती या मांसाहारी आहेत जे की स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी निसंकोचपणे प्राण्यांचा जीव घेतात त्यावेळेला ह्या व्यक्तींना त्या प्राण्यांचे जीव घेतल्याचे काही वाटत नाही का? आणि आता ह्या ठिकाणी देखील यातल्याचं बहुसंख्य व्यक्ती ह्या हत्तीनीच्या हत्येला विरोध करतायेत हे कितपत योग्य आहे? म्हणजे थोडक्यात इथे झाली बाब अशी की , मी म्हणेल तीचं पूर्वदिशा . काही दिवसांपूर्वी मी एका साधूची मुलाखत ऐकली , त्या मुलाखतीत एका व्यक्तीने त्या साधूंना प्रश्न विचारला की , प...