प्रत्येक गोष्टीत सत्यता हाचं जीवनाचा पाया .....

   

          तीन ते चार दिवसांपूर्वी केरळमध्ये एका गर्भवती हत्तीनीचा बळी घेतला गेला आणि बघता बघता ही गोष्ट पूर्ण भारतभर आगी सारखी पसरली . या गोष्टीचा प्रत्येक स्तरातून  निषेध व्यक्त केला गेला . या निषेध व्यक्त करण्यामध्ये बहुतेक नायक-नायिका , नेते , सामाजिक कार्यकर्ते असे अनेक जण होते . त्या हत्तीनीची हत्या झाली ही बाब  चुकीचीचं आहे , पण या चुकीच्या बाबीवर टीका करणाऱ्या व्यक्ती बरोबरचं आहेत हे कशावरून . कारण या टीका करणाऱ्यांमध्ये 
बहुसंख्य व्यक्ती या मांसाहारी आहेत जे की स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी निसंकोचपणे प्राण्यांचा जीव घेतात त्यावेळेला ह्या व्यक्तींना त्या प्राण्यांचे जीव घेतल्याचे काही वाटत नाही का? आणि आता ह्या ठिकाणी देखील यातल्याचं बहुसंख्य व्यक्ती ह्या हत्तीनीच्या हत्येला विरोध करतायेत हे कितपत योग्य आहे? म्हणजे थोडक्यात इथे झाली बाब अशी की , मी म्हणेल तीचं पूर्वदिशा . 
          काही दिवसांपूर्वी मी एका साधूची मुलाखत ऐकली , त्या मुलाखतीत एका व्यक्तीने त्या साधूंना प्रश्न विचारला की , प्रश्न विचारला म्हणण्यापेक्षा स्पष्टीकरणचं दिले असेचं म्हणले तरी वावगे ठरणार नाही , त्या व्यक्तीचे असे म्हणणे होते की , मांसाहरामुळे पृथ्वीवरील अन्नधान्याचा साठा हा बचावला जातो आहे . पृथ्वीवर जी प्राण्यांची अनावश्यक वाढ होते त्यावर मांसाहरामुळे नियंत्रण आणता येते वगैरे वगैरे आणि ह्या व्यक्तीसारखे समाजातील अनेक व्यक्तींचे देखील मांसाहरावर असेचं विचार असतील तर त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की ,
  काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये थाई माशांवर म्हणजेचं कॅट फिशवर बंदी घालण्यात आली होती . त्याचे कारण म्हणजे या माशांचे असणारे वेगवान प्रजनन प्रक्रिया आणि त्यांचे मांसाहारी आहार आणि यातचं दुसरी बाब म्हणजे या माशांची पैदास ही मनुष्यानेचं स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी संकरित पद्धतीने केलीली आहे आणि नंतर त्याच जींवाना मारून , निसर्गाला वाचवण्याचा दावा देखील हा मनुष्यचं करतो , हा कुठला कायदा आहे म्हणजे थोडक्यात असे की , चुकी करणाराही तोचं आहेत आणि न्याय करणाराही तोचं , अशी विचित्र परिस्थिती या जगात तयार झालेली आहे . 
          या निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट अनावश्यक प्रमाणात कधीही निर्माण होत नाही , ती कोणतेही असो , सजीव असो वा निर्जीव , प्रत्येक गोष्ट ही संतुलनामध्येचं असते . पण हे संतुलन मोडायचे काम करतात ते आपल्यातीलचं काही मनुष्य आणि पुन्हा तोडकेमोडके पर्याय वापरून ह्या जगाला वाचवण्याचा दिखाऊपणा देखील यातीलचं काही मनुष्य करतात . ज्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये असणाऱ्या सुळ्या दातांचा योग्य वेळी , विशिष्ट परिस्थितीमध्ये वापर होतो ना! तसेच प्राण्यांना भक्ष्य म्हणून देखील काही विशिष्ट परिस्थितीतचं वापरले गेले पाहिजे याची माहिती तुम्हाला आपल्या हिंदू
धर्मग्रंथांमध्ये प्राप्त होईलचं , तसेचं इस्लामी संस्कृतीत देखील हीचं बाब महमंद पैगंबरांनी देेेेखील सांगितली आहे की , जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा असेल तेव्हाचं प्राण्यांचे भक्षण करने हे योग्य आहे . ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धान्य अधिकं प्रमाणात पिकतं नाही , त्या ठिकाणी मांसाहार करने हे योग्य आहे पण भारतासारख्या देशांमध्ये जेथे अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकते त्या ठिकाणी हा मांसाहार कशासाठी केला जातो? आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की , भौतिक सुखांची पूर्तता करण्यासाठी ती सुखे उपभोगण्यासाठी तुम्ही जगू नका , तर भौतिक सुखसोईंचा , साधनांचा आधार घेऊन आध्यामिक जीवनात प्रवेशिण्यासाठी , ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी आपण सर्वांनी जगायला हवे . पण आपण मात्र हे जाणून घेत नाही , आपल्याला फक्त भौतिक गोष्टींमध्येचं अतीउत्साहितपणा वाटतो . त्यामुळेचं अनेक वाईट गोष्टी आपल्या हातून नकळत घडतात आणि आपण देखील अशा चुकीच्या गोष्टींना बरोबर मानतो कारण आपण फक्त भोगी जीवन जगत असतो . त्यामुळे ह्या कल्की प्रवृत्तीतून बाहेर पडून आपण एका चांगल्या समाजाची स्थापना करायला हवी , जिथे आध्यात्मिक प्रगती उच्च स्तरावर असेल आणि मनुष्य शुद्ध मनाचा असेल ..... 






..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....