द्वेषप्रेम नव्हे तर , खरं देशप्रेम आपल्याला हवं आहे .....
काही दिवसांपूर्वी गोष्ट भारत सरकारने चिनी मोबाईल ॲपवर बंदी घातली . कारण होते की , चीन आपल्यावर करीत असलेल्या लष्करी कारवाया . या गोष्टीच्या आधी चीन आणि आपल्या भारत देशातील जवानांमध्ये काही चकमकी झाल्या आणि त्यात त्यांचे आणि आपलेही काही जवान शहीद झाले आणि त्यावेळेला ह्या देशातील अनेक लोकांचे द्वेषप्रेम हे जागृत झाले , हो द्वेषप्रेमचं , आणि बहुसंख्य लोकांनी ह्या बाबीला देशप्रेमाचे नाव दिले आणि आता सर्वांनी देशासाठी लढायला हवं अश्या बाबी सगळीकडे पसरवल्या पण हे खरंच राष्ट्रप्रेम आहे का? कारण खरे राष्ट्रप्रेम , खरी राष्ट्रभक्ती , देशप्रेम काय असते , हे आज बहुतेक लोकांना माहितीचं नाहीये आणि त्याची बहुसंख्य लोकांना जाणीवही नाही , " फक्त गंगेत हात धुऊन घ्यायचे आणि नंतर परत ये रे माझ्या मागल्या सारखी परिस्थिती पुन्हा उत्पन्न करायची " अशीचं स्तिथी आज भारतातील अनेक लोकांची झालेली आहे . सद्यस्थितीला भारतातील लोकांमध्ये देशप्रेम नसून द्वेषप्रेमचं मोठ्या प्रमाणात बळकावत चाललेले आहे . जे की , आपल्या देशाला राष्ट्रीय उत्कर्षाकडे घेऊन न जाता राष्...