द्वेषप्रेम नव्हे तर , खरं देशप्रेम आपल्याला हवं आहे .....
काही दिवसांपूर्वी गोष्ट भारत सरकारने चिनी मोबाईल ॲपवर बंदी घातली . कारण होते की , चीन आपल्यावर करीत असलेल्या लष्करी कारवाया . या गोष्टीच्या आधी चीन आणि आपल्या भारत देशातील जवानांमध्ये काही चकमकी झाल्या आणि त्यात त्यांचे आणि आपलेही काही जवान शहीद झाले आणि त्यावेळेला ह्या देशातील अनेक लोकांचे द्वेषप्रेम हे जागृत झाले , हो द्वेषप्रेमचं , आणि बहुसंख्य लोकांनी ह्या बाबीला देशप्रेमाचे नाव दिले आणि आता सर्वांनी देशासाठी लढायला हवं अश्या बाबी सगळीकडे पसरवल्या पण हे खरंच राष्ट्रप्रेम आहे का? कारण खरे राष्ट्रप्रेम , खरी राष्ट्रभक्ती , देशप्रेम काय असते , हे आज बहुतेक लोकांना माहितीचं नाहीये आणि त्याची बहुसंख्य लोकांना जाणीवही नाही ,
" फक्त गंगेत हात धुऊन घ्यायचे आणि नंतर परत ये रे माझ्या मागल्या सारखी परिस्थिती पुन्हा उत्पन्न करायची " अशीचं स्तिथी आज भारतातील अनेक लोकांची झालेली आहे . सद्यस्थितीला भारतातील लोकांमध्ये देशप्रेम नसून द्वेषप्रेमचं मोठ्या प्रमाणात बळकावत चाललेले आहे . जे की , आपल्या देशाला राष्ट्रीय उत्कर्षाकडे घेऊन न जाता राष्ट्रीय मूल्यांच्या ढासळनीकडे मात्र नक्कीचं घेऊन जात आहे . कारण आज आपल्या लोकांमध्ये चिनबद्दल द्वेष आहे म्हणून आज आपण त्यांना विरोध करत आहोत , पण उद्या जेव्हा ही आणीबाणीची , रोशाची परिस्थिती नाहीसी होईल , त्याचबरोबर आपल्या देशातील लोकांमध्ये असणारी देशाप्रतीची दिखाऊ राष्ट्रभक्ती देखील हळूहळू कमी होईल आणि कालांतराने पूर्ण संपुष्टात देखील येईल .
कारण द्वेषप्रेम हे मावळणाऱ्या सूर्याप्रमाणे असते जसा सूर्य मावळताना त्याचा प्रकाश हळू हळू कमी होत जातो तसेच देशातील लोकांमध्ये असणारी इतर राष्ट्रांच्याप्रतीची द्वेषाची , रोषाची रोषाची भावना नष्ट होत गेली की , लोकांमध्ये असणारे दिखाऊ देशप्रेमही हळू हळू कमी होत जाते . " तर याच्या उलट खरं देशप्रेम , खरी राष्ट्रभक्ती असते जी की , उगवत्या सूर्याप्रमाणे वाढतं जाणारी असते वाढत जाते आणि ती आंतरनिर्मित असते " .
आज आपण ज्याप्रमाणे बोलतोय की , चिनी मालावर बहिष्कार टाका कारण हा आपल्या देशाचा , देशप्रेमाचा विषय आहे . पण त्याचंवेळेला आपण ज्या राष्ट्राचा द्वेष आहे त्या राष्ट्राचे सोडून इतर देशांचे सामान , साहित्य , वस्तू हमखास वापरतो तेव्हा आपले आपल्या देशावरील प्रेम कुठे जाते , सांगा? अरे हे तर सोडाचं ,
ज्यांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्या देशाचा माल देखील आपण मोठ्या आनंदाने वापरतो , का? कारण आपल्यात खरं देशप्रेम उरलेलेचं नाहीये , आपल्यात फक्त भरलेला आहे लोभीपणा , स्वार्थीपणा . जर खरंच आपल्यात देशप्रेम असले असते ना! तर आपण कोणतीही विदेशी वाईट गोष्ट ही स्वीकारली नसती ती वस्तू असो वा! संस्कृती असो अथवा कोणतीही विदेशी भाषा , कोणतीचं नाही .
आपण ह्या भारत देशाच्या विकासासाठी , संपूर्ण स्वदेशी पद्धतीचा अवलंब करून ह्या भारत देशाची प्रगती करायला सुरुवात केली असती , पण नाही . आज अनेक मोठ्या क्षेत्रातील कंपन्या ह्या विदेशी आहेत . आज ज्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हा लेख पोहोचवत आहे ते माध्यमही विदेशीचं आहे , का? आज आपल्या देशातील तरुण या सर्व गोष्टी स्वदेशी बनवण्याचा विचार करत नाही , तो फक्त चित्रविचित्र , क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्याच्या मागे लागलेला आहे , का? कारण आज त्याच्या मनामध्ये कोठेही देशाबद्दल , स्वतःच्या संस्कृतीबद्दल , स्वतःच्या भाषेबद्दल कुठलाही आभिमान आणि खरं प्रेम उरलेले नाहीये .
" ज्याप्रमाणे शेतामध्ये पाटातील पाण्याला बारं देताना ओल्या मातीत थोडी कोरडी माती ही मिसळवली तर ते बारं त्या पाण्याला योग्यरित्या अडऊ शकते , तसेच आज आपल्या देशातील काही थोडे लोकं जे की प्रामाणिक आहेत त्या लोकांमुळेच आज आपला देश थोडा का होईना आपल्या पायावर टिकून आहे . पण हळू हळू आज या लोकांची संख्या देखील हळूहळू ढासळत चालली आहे त्यामुळे अजुन किती दिवस हा देश स्वतःच्या पायावर टिकून राहील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे " . जर आपल्याला आपला देश पूर्णतः विदेशी कुबड्यांवर आधारित करायचा नसेल ना! तर आता तरी आपण सर्व विदेशी वाईट मालाचा संपूर्ण बहिष्कार करून , योग्य अश्या पूर्ण स्वदेशी पद्धतींच्या विकासासाठी एकत्र यायला हवं आणि एकमेकांच्या सहकार्याने ह्या सहकारी स्वदेशी विकास कार्यक्रमाला हातभार लावायला हवा , तेव्हाचं आपला देश स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनेल ...
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....






उत्तम विश्लेषण केलं आहे मित्रा
उत्तर द्याहटवाधन्यवाद भावा .....
हटवाExcellent point
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा .....
हटवायाला म्हणतात देशयावरील खर खरं प्रेम
उत्तर द्याहटवाबरोबर भावा
हटवा