पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

योग्य शिक्षणातचं आहे देशाची खरी सुरक्षितता आणि प्रगती .....

इमेज
         काल एका १९ वर्षीय बलात्कार पीडितेची मृत्यूशी असणारी झुंज संपली आणि तिने आपल्या प्राणांचा त्याग केला आणि मग समाजातील सर्व स्तरांतून , बलात्कार करणाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त होऊ लागला त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी त्यांना फासावर देण्यात यावे अश्या अनेक लोकांच्या भावना व्यक्त होऊ लागल्या . महिलांवर होणारे अत्याचार यांबाबत अधिक  कडक कायदे , केंद्रांनी नेमायला हवे जेणेकरून अशी अमानवी कृती पुन्हा करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही , अशीही मते अनेक जणांनी मांडली . पण हे सर्व करतं असताना आपण एक गोष्ट विसरलो , ती म्हणजे ह्या आधीही आपल्या न्यायव्यवस्थेने दिल्ली सामूहिक बलात्कारातील आरोपींना फासावर दिले , फक्त एवढेच नाही तर हैदराबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींचा एनकाउंटर देखील केलेला आहे आणि एवढे करूनही देशातील बलात्कार मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीये . कालचं आलेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात दररोज ८८ बलात्कार प्रकरणे समोर येतात . गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये भारत देशामध्ये बत्तीस हजार तेहतीस ( ३२०३३ ) बलात्काराच्या घटना समोर आल्या आणि हो ह्या फक...