आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात
आरक्षण , हा विषय सध्या प्रत्येकाच्या चहाचा विषय झालेला आहे , एखाद्याने चहाच्या सवडीला आरक्षणाचा विषय नाही घेणे म्हणजे नवलच म्हणावं लागेल . ज्यांना आरक्षण आहे ते अजून आरक्षण वाढवायचे कसे याचा विचार करतायेत तर ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मिळवायचे कसे याचा विचार करतायेत . आज ह्या देशातील जवळजवळ सर्वच लोकांना फक्त स्वतःच्या दिखाऊ अन् तात्पुरत्या प्रगतीचे घेणे पडलेले आहे . आज देशातील कुणालाही स्वतःच्या हिमतीवर आणि बळावर ह्या देशाचा विकास करण्याचा प्रगती करण्याचा साधा विचार देखील मनात नाहीये . देशातील राजकारण्यांना सत्ता हवी तर देशातील जनतेला फक्त स्वतःचा भपकेबाज आणि न टिकणारा अपूर्ण विकास हवा आहे . जर खरचं ह्या देशातील जनतेला संविधानाच्या मूल्यांवर आधारित असणारा सामाजिक , राजकीय न्यायाच्या परिघात आणि समानतेच्या व संधीच्या शिखरावर असणारा खरा समाजवादी आणि राष्ट्रवादी देश हवा असेल ना! तर देशात असणाऱ्या ह्या आरक्षणाच्या बाबीला आज पूर्णपणे नष्ट करायला हवे . देशाचा खरा विकास करायचा असेल ना! तर या देशातील जनतेला प्रत्यक्ष स्पर्धेच्या तयारी मधील अपूर्ण आरक्षणापेक्षा , परिस्थितीच्या रिंगणातील समान आरक्षणाची गरज जास्त आहे . देशातील विविध ठिकाणहून वेगवेगळ्या परिस्थितीतून येणाऱ्या व्यक्तीला देशाच्या आणि स्वतःच्या प्रगतीसाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षामध्ये आरक्षणाच्या नावाखाली प्रत्यक्ष स्पर्धेत त्या व्यक्तीला टिकायला लावणारे संपूर्ण ज्ञान त्याला घेण्यापासून वंचित का ठेवावे?
हे म्हणजे असे झाले पायदळी चालणारे सैन्य असल्यामुळे त्या सैन्याला कमी तयारीच्या अन कमी हत्यारांच्या जोरावर युद्धात पाठवण्यासारखे झाले असेचं म्हणावं लागेल . म्हणजे थोडक्यात हे दिले जाणारे आरक्षण कागदपत्री अपूर्ण ज्ञानाच्या आधारे पदवी मिळवण्यासाठी योग्य आहे , पण जीवनाच्या खऱ्या स्पर्धेत अन् देशाच्या योग्य विकासाच्या पाण्यामध्ये हे अपूर्ण ज्ञान आरक्षण घेणाऱ्या व्यक्तींना बुडवणारेचं आहे . थोडक्यात आजचे आरक्षण हे ज्ञानाच्या बाबतीत तडजोड करायला लावणारे आरक्षण आहे .
अरे ज्या देशांमध्ये चाणक्य , आर्यभट्ट , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम होऊन गेले , जो देश एकेकाळी या संपूर्ण जगाचा विश्वगुरू होता , अरे ज्या देशाने तंत्रज्ञान , स्थापत्यशैलीमध्ये प्रथमतः मुहूर्तमेढ रोवली , अरे ज्या देशाने ह्या जगाला प्रथम लिपी देऊन योग्य प्रकारे लिहायला आणि वाचायला शिकवले आणि आजही जो देश खूप मोठ्या प्रमाणावर अभियंते दुसऱ्या देशांना पुरवितो . म्हणून ज्या देशाची ओळख मेंदू पुरवणारा देश म्हणून आहे , तोचं देश आरक्षणाच्या मृगजलामध्ये समानतेच्या आणि देशाच्या विकासाचे स्वप्न चाचपडत त्यात खितपत पडलेला आहे आणि याच बाबींमुळे विश्वगुरू असणाऱ्या या देशाला गुलामगिरी पत्करण्याची वेळ आज मितीला आलेली आहे . खरंच आपल्याला आपल्या प्राचीन इतिहासातला समृद्ध भारत पुन्हा एकदा संपन्न आणि सुजलाम सुफलाम बनवायचा असेल ना! तर जातीच्या अन् आर्थिक परिस्थितीच्या गर्तेमध्ये लोंबकळणारे आरक्षण रद्द करून सर्वांना समान पातळीवर सरकारी शाळा महाविद्यालयांच्या मार्फत विनामूल्य अन् विनागृहिक शुल्क आकारता एका समान शैक्षणिक व्यासपीठावरून योग्य , अध्यात्मिक , तांत्रिक शिक्षण द्यायला हवे . संपूर्ण देशामध्ये सरकारी स्तरावर अन् सरकारी योजनांतून शिक्षणाची सोय करण्यात यायला हवी , तेव्हाचं संविधानिक समानतेचे अन् समान दर्जाचे मूल्य योग्य प्रकारे लागू पडतील आणि देशाचा अंतर्बाह्य परिपूर्ण असा सुदृढ विकास होईल आणि ह्या बाबीमुळे देश पुन्हा एकदा संपन्नतेकडे आणि समृद्धीकडे पुन्हा वाटचाल करेल .
आता ह्या देशातील जनतेनेचं ठरवायचे आहे की , त्यांना परिस्थितीच्या आणि जातीच्या आधारावर आरक्षित असणारे अपूर्ण शिक्षण घ्यायला आवडेल की , समानतेच्या व्यासपीठावरून परिपूर्ण शिक्षण घेणे आवडेल .
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....




बरोबर आहे महाराज आरक्षण आणि जातिवाद या दोन गोष्टी बाजूला केल्या तर भारताला जागतिक पातळीवर सर्व बाबीत प्रथम क्रमांक घेतल्यापासून कोणीच रोखू शकत नाही
उत्तर द्याहटवाओंकार आपला आरक्षणावरील लेख वाचला..आज प्रत्येक फुकट कसे मिळेल कसे मिळेल याची वेध लागले आहेत.. आपण अतिशय खूप छान आणि सडेतोड लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन💐💐
उत्तर द्याहटवापरंतु फुकट मिळालेल्या गोष्टीचे किंमत शून्य असते हेच अनेकांना कळले नाही...पण राज्यकर्त्यांनी तरी,एखाद्याला किती सवलत द्यावी याचा विचार करायला हवा..म्हणजे मुलं मोठं झालं तरी,आईने त्याला हाताने घास भरवावा काय?
सुंदर लेख💐💐