भारतीय संस्कृती आणि व्यापाराचा विश्वसंचार .....
भारतीय अध्यात्म आणि प्राचीन भारतीय विज्ञान हे विश्वामध्ये नेहमीच उत्कृष्ट मानले गेलेले आहे . ज्यावेळेला विश्वातील बहुतांश देश असंस्कृत जीवन जगत होते , त्यावेळी भारतीय विज्ञान आणि अध्यात्म एका सर्वोच्च ठिकाणावर विराजमान होते . भारतीय ज्योतिषशास्त्र , स्थापत्यशास्त्र , आयुर्वेदशास्त्र , युद्धशास्त्र या शास्त्रांचे बहुतांश पुरावे आज वेगवेगळ्या देशांत आढळलेले आहेत , किंबहुना आजच्या उत्तर अमेरिकेतही ते आढळलेले आहेत . अमेरिकेचा शोध हा अमेरिगो व्हेस्पुसी याने लावला असे आपण मानतो पण याआधीही कितीतरी शतके भारतीय नाविक आणि व्यापारी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांतील देशांमधे व्यापार करत होते याचे पुरावे म्हणजेच मेक्सिको देशाच्या दक्षिण प्रांतांत पलेंके या भागात सापडलेले भारतीय संस्कृतीशी निगडित असणारे मय संस्कृतीचे स्थापत्यशैलीतील तसेच मय कालगणनेतील अवशेष . ही मय संस्कृती मॅक्सिकोत इसवीसनपूर्व सातव्या शतकात स्थापली गेली आहे . म्हणजेच , येशू ख्रिस्ताचा जन्माआधी सात शतके . तसेच मध्य अमेरिकेतील बर्याचशा देशांमध्येही ही संस्कृती निदर्शनास आलेली आहे...