भारतीय अध्यात्म आणि प्राचीन भारतीय विज्ञान हे विश्वामध्ये नेहमीच उत्कृष्ट मानले गेलेले आहे . ज्यावेळेला विश्वातील बहुतांश देश असंस्कृत जीवन जगत होते , त्यावेळी भारतीय विज्ञान आणि अध्यात्म एका सर्वोच्च ठिकाणावर विराजमान होते . भारतीय ज्योतिषशास्त्र , स्थापत्यशास्त्र , आयुर्वेदशास्त्र , युद्धशास्त्र या शास्त्रांचे बहुतांश पुरावे आज वेगवेगळ्या देशांत आढळलेले आहेत , किंबहुना आजच्या उत्तर अमेरिकेतही ते आढळलेले आहेत . अमेरिकेचा शोध हा अमेरिगो व्हेस्पुसी याने लावला असे आपण मानतो पण याआधीही कितीतरी शतके भारतीय नाविक आणि व्यापारी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांतील देशांमधे व्यापार करत होते याचे पुरावे म्हणजेच मेक्सिको देशाच्या दक्षिण प्रांतांत पलेंके या भागात सापडलेले भारतीय संस्कृतीशी निगडित असणारे मय संस्कृतीचे स्थापत्यशैलीतील तसेच मय कालगणनेतील अवशेष .
ही मय संस्कृती मॅक्सिकोत इसवीसनपूर्व सातव्या शतकात स्थापली गेली आहे . म्हणजेच , येशू ख्रिस्ताचा जन्माआधी सात शतके . तसेच मध्य अमेरिकेतील बर्याचशा देशांमध्येही ही संस्कृती निदर्शनास आलेली आहे . त्याचबरोबर जपान , चीन कंबोडिया , लाओस , व्हिएतनाम , म्यानमार , थायलंड , मलेशिया , इंडोनेशिया या ईशान्य आशियातील नैऋत्य आशियातील देशांमध्ये देखील भारतीय संस्कृतीचे पंधराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष भारतीय ज्ञान आणि संस्कृतीच्या समृद्धीची साक्ष देते . आजच्या कंबोडिया देशात इसवी सन दुसऱ्या शतकात भारतीय नाविक कौडिंण्याद्वारे स्वतःचे राज्य स्थापन करण्यात आले होते .
त्याचबरोबर कंबोडियात बाराव्या शतकात भारतवंशीय राजा दुसरे सूर्यवर्मनयांद्वारे बांधण्यात आलेले विष्णुसमरपित अंगकोरवॅट मंदिर तसेच ३ किमी * ३ किमी या क्षेत्रात स्थापलेली सातवे जयवर्मनयांद्वारे अंगकोरवॅट मंदिराजवळ बांधण्यात आलेली अंगकोरथॉम ही नगरी याची एक साक्ष आहे . तसेच लाओस , थायलंड , म्यानमार या भागातही अश्या अनेक विष्णूसमर्पित , शिवसमर्पित तसेच दुर्गादेवी यांची अनेक मंदिरे आजही आपणास पहावयास मिळतील .
सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रचाराचे मोठे कार्य केले गेले , त्याचे रूप आज आपण आजच्या म्यानमार , चीन आणि जपानमध्ये पाहत आहोत .
तसेच इटली मध्ये सापडलेली इसवी सनपूर्व आठव्या शतकातील सर्वेतेरी या भागातील सीता , राम , लक्ष्मण यांची वनवासगमन भित्तीचित्र त्याचबरोबर रशिया मध्ये सापडलेले शिवलिंग आणि मध्य आणि पश्चिम आशियात सापडलेली हजारो भारतीय देवी देवतांची मंदिरे भारतीय संस्कृतीची आणि त्याचबरोबर भारतीय व्यापारांच्या वैश्वीकरणाची साक्ष देते . दक्षिण अमेरिका खंडातील पेरू या देशातील माचू पिचू ही इंका राजपुत्राने बांधलेली ७४०० फूट उंचीवरील वसाहत आणि आजही मध्य अमेरिकेच्या आणि दक्षिण अमेरिकेच्या देशांतील किनार पट्टी वरच्या शहरात पाळल्या जाणाऱ्या भारतीय परंपरा भारतीय लोकांच्या जगत प्रवासाच्या आणि त्यांच्या वैश्विक व्यापाराच्या लाखो साहसकथांची आठवण करून देतात .
त्यामुळे भारतीय तरुणांनी स्वतःच्या ताकदीवर संदेह न करता , स्वतःच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा चांगल्या विचारांनी जगावर राज्य करण्यासाठी आणि या जगात भारतीय व्यापाराचा आणि व्यापाऱ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सज्ज व्हायला हवे आणि स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हे संपूर्ण विश्व जिंकायला हवे .....
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा