आम्ही भारताचे लोक
"भारत माझा देश आहे " म्हणून मी इथे काहीही करतो. "सारे भारतीय माझे बांधव आहेत" म्हणून मी कोणीही फैलावलेल्या अफवेमुळे माझ्याच बांधवांशी भांडतो."माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे" म्हणून मी कोठेही कचरा टाकतो , आणि ह्या देशातील ऐतिहासिक वास्तुंना खराब करतो. " माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे " म्हणूनच का मी वेस्टर्न मूवी बघून माझ्याच देशातील माझ्याच बहिणींवर वाईट नजरा टाकतो त्यांची छेड काढतो. " त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयन्त करेल " म्हणूनच का मी समोर वाईट घडत असताना देखील त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त पाहत राहतो. " मी माझ्या पालकांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा सदैव मान ठेवीन आणि त्यांच्याशी सौजन्याने वागेन " म्हणूनच का मी वडीलधाऱ्या माणसांना एकेरी नावाने उच्चारतो , गुरुजनांना शिवीगाळ करतो . " माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिन्या करत आहे " म्हणूनच का मी देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराला अधिक चालना देतो आणि भ्रष्टचार वाढवतो का !
" त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे हित समावले आहे " म्हणूनच मी वरील गोष्टींना अजूनही बदलायचा प्रयत्न करत नाहीये का?
फक्त भारत माझा देश आहे हे रोज म्हणून आपला देश सुधारणार नाहीये तर आपण आपल्यात बदल करून हा देश बदलला जाणारे हे लक्षात ठेवा आणि आपली देशाप्रती असणारी आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नीट पार पाडा म्हणजे आपला देश बदलेल आणि विकसनशील राष्ट्रा तुन विकसित राष्ट्रांकडे प्रस्तान करेन.
........ एक भारतीय,
.........जय हिंद जय महाराष्ट्र
(ओंकार विश्वास डुंबरे , गाव-ओतूर , तालुका- जुन्नर , जिल्हा- पुणे )

Very good sir you are best
उत्तर द्याहटवाThanks bro
हटवाMast omkar
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाMera Bhai,Meri Takad..❤️
हटवाधन्यवाद भावा
हटवाNice
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा