राजे शिवछत्रपती आणि आजची प्रजा .......
राजे शिवछत्रपती आणि आजची प्रजा.......
आज मितीला छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण मानीत नाही? असा प्रश्न विचारणे हे मूर्खपणाचे ठरेल . कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सातासमुद्रापार पोहचले आहे . अनेक विदेशी विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जातो . आज दुसऱ्या देशातील माणसे आमच्या छत्रपतींना त्यांच्या विचारांना समजून घेतात त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतात पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना आमच्या मातीत जन्मले असून सुद्धा आम्ही त्यांना समजू शकलो नाही ,त्यांच्या विचारांच अनुकरण करू शकलो नाही . कारण आपण एवढ्या मोठया कर्तुत्ववान माणसाला देखील जातीच्या भोवऱ्यात ओढले .
आज आपण छत्रपतींना देव मानतो त्यांना माणूस आपण मानतच नाही किंबहुना यामुळेच ते आणि त्यांचे विचार आपल्यापासून दुरावत चालले आहे . आणि म्हणूनच आम्हाला आमच्या छत्रपतींची आठवण फक्त त्यांच्या जयंतीला , त्यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी होते , आणि इतर दिवशी ते आमच्यात जिवंत नसतात . आज छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या डोक्यात आहेत , पण ते आज कोणाच्या हृदयात जिवंत नाहीत , हे आपले दुर्दैव आहे . म्हणूनचं आज आम्ही वेगवेगळ्या जातीत , धर्मात विभागलो गेलो आहोत , आणि त्यामुळेच आम्ही जाती आणि धर्माच्या नावाखाली एकमेकांसंगे लढत आहोत .
जर खरचं आपणाला छत्रपतींना आणि त्यांच्या कार्याला ,त्यांच्या विचारांना समजून घ्यायचं असेल ना तर आधी त्यांना देव न मानता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनमानसातून तयार झालेला एक कर्तुत्ववान आणि कर्तव्यनिष्ठ राजा शिवछत्रपती यांना मानलं तर आणि तरच तुम्ही शिवछत्रपतींना समजू शकाल . कारण आपण नेहमी आपल्या आदर्शांच अनुकरण करतो कोणत्याही देवाचं नाही , म्हणून जर तुम्ही छत्रपतींना देव मानलं तर , त्यांच्या कार्याचं आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण तुम्ही कधीचं करू शकणार नाही . छत्रपतींनी केलेली कामे ही देवमानसा सारखी नक्कीच आहेत पण आपले छत्रपती हे देव नाहीत ते आपले राजे आहेत , तुमच्या माझ्या सारखे मनुष्य आहेत .
नुसती कपाळावर चंद्रकोर लावून आणि गळ्यात छत्रपतींची मुद्रा अडकवली की आपण छत्रपतींना समजू शकतो , आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण करू शकतो , असे नाही . तर त्यांना आपण जनमानसात आणून त्यांचा चांगल्या कार्याचा , त्यांच्या चांगल्या विचारांचा आदर्श लोकांसमोर ठेवला तर आणि तेव्हाच आपण त्यांना जाणू शकतो ......... हे नक्कीच..
ओंकार विश्वास डुंबरे
(ओतूर , तालुका - जुन्नर , जिल्हा - पुणे)
मो. नं - ७८७५३४८९४८

Khup Chan..
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🏻
हटवाReal fact👌👍🙏
हटवाSahi hain bruh..👍🙌❤️❤️
उत्तर द्याहटवा