.............मुक्त होताना.............
 
          " मुक्त होताना " हे नाव मी मुद्दामहून दिले आहे , कारण हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा क्षण आहे . काहींसाठी तो खूप आनंददायी असतो , तर काहींसाठी जबाबदारीचे ओझे पडल्याप्रमाणे असतो . पण आजच्या पिढीला हा क्षण खूपच आनंददायी वाटतो आणि तो तितका असतोही पण , कधी कधी तो धोकादायक सुद्धा ठरू शकतो , जर योग्य वेळेला मुलांना योग्य गोष्टी लक्षात नाही आल्या तर .त्यामुळे योग्य वेळेला काही गोष्टी मुलांना सांगायला हव्या .
         मुले प्राथमिक , माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असतात त्यावेळेला ती अनेक बंधनात बांधली गेलेली असतात , किंवा थोडक्यात धाकात असतात , तेव्हा अनेकदा त्यांना त्यांच्या मनाचे निर्णय घेता येत नाही . पण जेव्हा हे माध्यमिक शिक्षण पूर्ण होते आणि मुले त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाला प्रारंभ करतात त्यावेळेस खरे त्यांना बंधनातून मुक्त झाल्याची जाणीव होते . " आणि ज्याप्रमाणे गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांना आपण कधी कधी मोकळे सोडतो त्यावेळेला जशी  ती स्वतःवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण न ठेवता सर्वत्र सैरवैर धावत सुटतात आणि सगळं जग डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतातं " याचप्रमाणे आपली मुले देखील ह्या मुक्त जीवनाला लगेच स्वीकारू शकत नाही , चांगल्या आणि वाईट गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही आणि तीसुद्धा ह्या मायारुपी जीवनात सैरभैर पळत सुटतात आणि जीवनाच्या खऱ्या ध्येयापासून दूर जातात . पण प्रत्येक गोष्टीबद्दलचा आपला उत्साह हा काही काळापुरता असतो , " जशी सैरावैरा पळणारी जनावरे भुकेच्या आशेमुळे थांबतात आणि शांत होतात " तशीच ह्या मुक्त जगात सैरभैर पळणारी ह्या मुलांची मनेही हळूहळू शांत होतात आणि जीवनाच्या खऱ्या सत्याचा शोध घेऊन त्याप्रमाणे चालतात.
         पण कधी कधी अधिक उत्साहीपणामुळे अनेक मुले वाईट मार्गांकडे आकर्षिली जातात तर काहींचे जीवन यामध्ये संपुष्टात येते . असे आपल्या मुलांसोबत घडू नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन समजावले पाहिजे जेणेकरून आपली मुले वाईट मार्गाकडे जाणार नाहीत आणि ती चांगल्या गोष्टींचा अवलंब करतील .
          या ठिकाणी मला एक संस्कृत श्लोक आठवतो तो असा,
    " प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्र मित्र कदाचन " ।
     याचा अर्थ असा की मुलांना जेव्हा सोळा वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्यांच्या बरोबर पालकांनी मित्राप्रमाणे राहावे जेणेकरून मुलांच्या मनात निर्माण होनारे प्रश्न आपण समजावून घेऊन त्यांना मित्राच्या नात्याने समजावू शकतो आणि त्यांच्या मनाची संभ्रम अवस्था दूर करु शकतो.
 
   
     ओंकार विश्वास डुंबरे
      ( ओतूर , जुन्नर )
        9860971339

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....