.....विचारशून्य मतदार आणि कर्तव्यहीन सरकार.....
"निवडणूक" निवडणुक ही फक्त आज स्वतःच्या स्वार्थासाठी लढवली जातेय असे वाटते. विकासाचे ढोंग आणून स्वतःची मालमत्ता कशी वाढवता येईल याचाच विचार प्रत्येक उमेदवार करतोय. मलाच मत द्या मी तुमच्यासाठी योग्य असा उमेदवार आहे असे निवडणुकीच्या वेळेस सांगितले जाते पण निवडणुका झाल्यावर आपला आणि त्यांचा संबंध तुटतो, तो तुटतोचं पुढील पाच वर्षांसाठी. आपला पक्ष कोणत्या धोरणावर स्थापन करण्यात आलेला आहे त्याची आश्वासन काय याच्यावर कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यातच आमचा मतदार देखील विचारशून्य बनत चाललेला आहे . हजार पाचशे दिले की दिवसभर त्या उमेदवाराच्या मागे, आमचे साहेब आमचे साहेब करत हिंडेल पण निवडणुका झाल्यावर तेच साहेब हात वर करतील आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा दूरदूरपर्यंत संबंध येणार नाही याचा विचार करायला आजचा मतदार विसरतोय .आज मितिला अनेक पक्षाचं असे झाले आहे की, काही पक्षांचे वरचे नेते चांगले आहेत तर काही पक्षांचे खालचे नेते, पण ते इतकेही चांगले नाहीत की ह्या देशाच्या विकासासाठी एकदम योग्य असतील. प्रत्येक उमेदवार लहान चुका करतो तो चांगला असो किंवा वाईट . पण त्या चुकांवर मतदारांनी पांघरून न घालता त्याचा त्याला जाब विचारला पाहिजे कारण लहान चुकांवर पांघरून घालने , म्हणजेच मोठ्या चुकांना आमंत्रित करणे . "जर आजार लहान असताना त्याचा इलाज नाही केला तर तो वाढत जाणारे आणि त्याचा शेवट हा नेहमी मृत्यूचं असणार आहे" . तसेच ह्या देशाचं आहे लोकांना आज वाटते किंबहुना त्यांच्या अंगवळणीच पडले आहे की उभा राहणारा निवडून येणारा उमेदवार हा थोडं त्याच्या स्वार्थासाठी करणारचं पण असं थोडं थोडं करता करता तो बोका या उंदीर रुपी जनतेचे सर्वकाही हिसकावून घेईल आणि तरीही ही जनता आपल्या मोकळ्या हातांकडे दुर्दैवी नजरेने बघतच राहील पण तिला काही लोण्याचा तुकडा मिळणार नाही.
किती समृद्ध होता माझा देश पण आज मला लाज वाटते हे सांगताना की , किती दरिद्री झालाय आपला देश . ज्याची पात्रता आहे , त्याला योग्य जागा मिळत नाही . आणि ज्याची नाहीये त्याला ती मिळते . कष्ट किती करा पण " ज्याचा वशिला त्याचाच घोडा पहिला" हे ह्या देशात आज मितीला घडत आहे . त्यामुळे पात्रता नसणारे लोक ह्या देशाच्या अनेक प्रमुख हुद्द्यांवर आहेत आणि त्यामुळे सामान्य जनता दररोज मरत आहे. हा देश खरा जिच्या मालकीचा आहे , जिच्या मालकीची ही सरकार आहे , ती जनता आज जसं " सावकाराच्या ताब्यात असणाऱ्या आपल्या शेतावर अडानी शेतकरी जसा मजुराप्रमाने राबतो ना! तशी ही जनता या देशात राबत आहे ", पण तिला काही तिच्या कष्टाचं फळ मिळतं नाहीये , ही विदारक परिस्थिती आजची आहे .
आधी बाहेरची लोकं आम्हाला लुटून उघडे करून गेले आणि आता आपलेच लोक आपल्या लोकांना उघडे करण्याच्या मागे लागले आहेत ही सत्य वस्तुस्थिती आहे .अरे कधी सुधारणार ही विचारशून्य जनता आणि कधी सुधारणार आमचा भारत हा प्रश्न मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहात नाही .... आज यावर विचार करण्याची खरी गरज या देशातील प्रत्येक मतदाराला आहे .
म्हणूनच विचार करून आणि योग्य उमेदवारालाच मत द्या कारण तुमचं आजचं एक मत उद्याच्या भारत घडवणार आहे....

.... जय हिंद जय महाराष्ट्र....
( एक कर्तव्यदक्ष मतदार )
( एक कर्तव्यदक्ष मतदार )
Bro tu he na kontya tari marathi paper la det ja tuz nav takun
उत्तर द्याहटवाधन्यवाद भावा...
हटवा