आजचा भारत ..... एक विदारक परिस्थिती ...
गुलाल , भंडारा उधळला . ज्यांचा पराभव झाला त्यांची कार्यकर्त्यांनी समजूत काढली , पुढच्या वेळेला नक्की येऊ असे म्हणून त्यांना धीर दिला . जे जिंकले त्यांनी मेजवान्या दिल्या , आमच्या कार्यकर्त्यांनीही त्या आनंदाने स्वीकारल्या अशा प्रकारचा आनंद साजरा करून आमचा पक्षाचा कार्यकर्ता घरी आला , दमून भागून आणि नाच-गाणं करून आल्यामुळे अर्थातच तो दमला आणि त्यामुळे तो झोपला
आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही ह्या देशाचा नागरिक हा झोपलेलाच . या नागरिकाला त्याचे देशाप्रती असणाऱ्या कर्तव्याची एक कवडीमात्रही जाण नाहीये , आपलं देशाप्रती असणारं सर्वात पहिलं कर्तव्य जे आहे ते मतदान हे मतदान देखील आजचा नागरिक पूर्ण विचार करून करत नाहीये , बहुतेक वेळेला तर हा नागरिक मतदानाची सुट्टी ही कुठेतरी
फिरण्यात , बागडण्यात घालवत असतो आणि याचाच फायदा आजचे राज्यकर्ते घेत आहेत . म्हणून असंख्य विकासकामे आजही रखडलेली आहे . गेल्या सत्तर वर्षांमध्ये आपला भारत देश हा जगातला महासत्ताक देश बनायला हवा होता , या जगाचा पुन्हा विश्वगुरू बनायला हवा होता पण आजही तो लाचार पणे दुसऱ्या देशांच्या दिशेने बघत आहे . आजही आमच्या देशाला आधार देण्यासाठी विदेशी कंपन्यांची गरज लागते आहे . अरे इंग्रज येण्याआधी या जगाच्या व्यापारामधला 33 टक्के भाग जो देश पुरवत होता , तोच देश आज मितिला बाहेरच्या विदेशी कंपन्यांकडून माल आयात करत आहे ,
अरे जो देश या जगाला ज्ञान देत होता तोच देश आज स्वतःचे ज्ञान विदेशी भाषेतून शिकत आहे इतकी दरिद्री परिस्थिती आज आपल्या देशवासियांवर वर आलेली आहे याचं कारण एकच आहे ते म्हणजे आजही आमचा सुजाण नागरिक जागरूक झालेला नाहीये . आजही तो त्याच्या भोवती तयार केलेल्या आभासी जगतामध्ये जगत आहे . त्याजगतामधून बाहेर येऊन तो काहीतरी नवीन आणि ह्या देशाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न करत नाहीये .
आज मितिला आपल्या देशामध्ये आपण फक्त सत्ता बदलण्याचे काम करतोय . पण तरीही सत्तेत येणारी माणसे ही काही चांगली कामे करत नाहीये जी माणसे आधी सत्तेत होती त्यांसारखी किंवा त्याहूनही आधीक खराब कामे आत्ता सत्तेत येणारे लोक करीत आहेत कारण " नळाला येणारं पाणी आपण कितीही स्वच्छ सोडलं तरीही ते खराब
होणारच , कारण नळाला जोडलेला पाईप हाच खरा खराब आहे " , म्हणून सत्ता बदलली तरीही सामान्य शेतकऱ्यांच्या , सामान्य माणसांच्या आयुष्यात काहीही बदल होत नाही , बदल होतो तो फक्त नेत्यांच्या आयुष्यात . निवडणुकीआधी माणूस कितीही चांगला असू द्या पण निवडणूक झाली की तो बदलतोच निवडणुकीपूर्वी तुम्हाला माय बाप , मालक म्हणून संबोधणारे पण निवडणूक झाल्यावर तुम्हाला तुच्छतेची वागणूक देणारे हे आजचे राज्यकर्ते .
सामान्य माणसाच्या जीवनातील रोजच्या समस्या या सरकार बदलल्या की कमी होतात असं या देशात तरी घडत नाही उलट त्या वाढतात , जो दारिद्र्याच्या खड्डा छोटा असतो तो खड्डा दिवसेंदिवस वाढतच जातो . त्यांच्या आयुष्यातील समस्या रोज वाढतचं जातात आणि ह्या समस्या सोडवण्याऐवजी या समस्यांची शिडी बनवून स्वतःला नेहमी वर ठेवण्याचा प्रयत्न आपले राज्यकर्ते करतात . आम्ही जनतेचे सेवक आहोत असेच हे तुम्हाला दाखवतील पण खरेतर हे जनतेचे सेवक नसून हे तर जनतेचे शोषक असतात , आणि आपली भोळीभाबडी जनता विचार न करता त्यांना साथ देते आणि आपलं शोषण करून घेते . आज भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरीही आपण आपल्या स्वतःच्या पायावर नीटपणे उभे राहू शकलो नाहीये . आपल्या मागून स्वतंत्र झालेला सिंगापूर देश आज जगाचे
व्यापारी केंद्र बनतो आणि आपण आजही भ्रष्टाचाराच्या , अत्याचाराच्या पिळवणुकीचा फासात फसून आहोत . कारण आपल्या भारतीयांची विचार करण्याची क्षमता कधीच संपलेली आहे .
आज आपण ह्या गोष्टीच्या मागे पळत आहे तर ऊद्या कोणताही विचार न करता त्या गोष्टीच्या मागे आणि जेव्हा त्या गोष्टीचे वाईट परिणाम हे आपल्यावर होतात तेव्हा आम्हाला जाग येते , पण तरीही आम्ही गप्पचं . म्हणूनच तर विदेशी कंपन्या आम्हां भारतीयांचा प्रयोगासाठी वापर करतात आणि आम्ही तो त्यांना करूनही देतो अरे ह्या देशात क्रांतीच्या नावाखाली किती वाईट गोष्टी हे राज्यकर्ते लोक घेऊन आलेले आहेत आणि आम्ही देखील त्या खराब आणि वाईट गोष्टींना विकासाचा भाग समजून स्वतःमध्ये सामावून घेतले आहे . आपली प्राचीन परंपरा आपली संस्कृती हे आपण विसरलो आहोत आणि विदेशी संस्कृती परंपरा
आम्ही स्वीकारली आहेत . काय वाईट काय चांगलं याची कवडी मात्र हि विचार न करता आपण दुसऱ्यांच्या विचारांचे पालन करत आहोत . अरे किती काळ जगणार असे लाचारवाने आणि लाजिरवाने जीवन .
विचार करा ह्या गोष्टीचा आणि आत्मपरीक्षण करा स्वतःचे . जर आज आपण बदललो नाही तर उद्याचा भारत पुन्हा गुलामांचा भारत म्हणून उदयास येईल .
म्हणून विचार करा ...... आणि नविन भारत घडवा...
वंदे मातरम् ... जय भारत







Supperb bro
उत्तर द्याहटवाBhai true...❤️❤️❤️
हटवाधन्यवाद भावा
हटवाKadak na bhau...
उत्तर द्याहटवाछान लिहीलंय ओंकार.हे लिखाण जपलं पाहिजे. तुझी लिखाणाची शैली पाहता वेगवेगळ्या विषयांवर तू मुक्पतणे लिहीशील अशी खात्री वाटते.
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा
हटवाधन्यवाद प्रातिक भाऊ
उत्तर द्याहटवा