.......आजची शिक्षणव्यवस्था आणि आमचे सरकार .......

      
             "सरकार" ,  सरकार फक्त नावापुरतेच काम करते , भविष्याचा विचार करण्याची क्षमता कोणत्याही सरकारमध्ये नाही , किंबहुना भविष्य माहीत असूनही आज लोकांपुढे दिखावा करण्यासाठी आणि स्वतःची घरे भरण्यासाठी प्रत्येक सरकार काम करते ,  जे रस्ते पाच ते सात वर्षे टिकायला हवेत त्यांना एका महिन्यातच भेगा जातात ते धसतात, कसं काय ? आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ नुसती आश्वासन द्यायला सांगा या सरकारी लोकांना, पण सत्यात  मात्र कोणतेही कामं उतरत नाही. अरे शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन भरायचे हे सरकारने जाहीर केले पण त्यांना हे कोण सांगणार भारतातील किती लोकांना आजही इंटरनेट नीटपणे वापरता येत नाही. नुसता मोबाईल वरून फोन लावता आला आणि युट्युब ,इंस्टा , फेसबुक वर पिक्चर आणि फोटो पाहता आले म्हणजे कोणी इंटरनेटच्या दुनियेतला बादशाहा होत नाही. आज भारतात अमर्याद इंटरनेट वापरण्याची सेवा दिली आहे पण ते कसे वापरायचे याची अक्कल मात्र द्यायला आमचं सरकार विसरून गेलं. आणि ही अक्कल नसल्यामुळे आणि इंटरनेट बद्दलच्या असणाऱ्या अज्ञानामुळे कितीएक गरीब मुले सायबर कॅफे वाल्यांची दारे पालथी घालतात आणि सायबर कॅफे वाले ह्या गरीब लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पाहिजे तेवढी फी वसूल करतात अरे कोण सांगणार या सरकारला, "की छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी साठी लागणारा खर्च हा मोठ्या कामांसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा अधिक असतो" हे सांगणारी दुसरी कोणी व्यक्ती नसुन ज्यांचा आपण सरकारी कार्यालयांमध्ये फोटो लावतो ना तेच महात्मा गांधी आहेत.
              या सरकारला जर छोट्या-मोठ्या खर्चाची जर जाणीव नसेल ना, तर कसे काय बनवणार आहे हे सरकार आपल्या देशाला जगात एक नंबरची अर्थव्यवस्था, सांगा कशी काय ? अरे हे सरकार चालवणाऱ्या कित्येक लोकांना आजही मोबाईल नीट वापरता येत नाही आणि हे बदलणार आहे आपल्या देशाला. अरे इथे विद्यार्थ्यांची तळवे झिजले सायबर कॅफे ते कॉलेज , कॉलेज ते सायबर कॅफे राऊंड मारून पण या सरकारी लोकांना याची कवडी मात्र जाणीवही नाहीये. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की नुसत्या फेऱ्यावर फेऱ्या  मारायच्या सांगा आता तुम्हीच?
    
         ......... एक शिक्षण व्यवस्थेला तरसलेला विद्यार्थी.......

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....