आज मी जेव्हा एखादा विचार , एखादा शब्द लिहिण्यासाठी घेतो तेव्हा तो विचार , तो शब्द लिहिताना माझ्याकडून तो आपोआप इंग्रजी या भाषेमध्ये , इंग्रजी अक्षरामध्ये लिहिला जातो . आपल्या मराठी भाषेत तो शब्द पहिल्यांदा माझ्याकडून लिहिलाच जात नाही . इतक्या मोठ्या प्रमाणावर या विदेशी भाषेने माझ्या मनावर , माझ्या बुद्धीवर ताबा मिळवलेला आहे . आज बोलताना देखील मी अनेक शब्द इंग्रजीच वापरतो .
इतकेच नाही तर आजची म्हातारी माणसे देखील इंग्रजी शब्द वापरतात . आज आपण बोलताना जवळजवळ अर्धे इंग्रजीत बोलतो . आज आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तू आहेत , ज्यांना मराठीतून काय म्हणतात , त्यांच्यासाठी मराठीतून काय शब्द वापरतात हे आपल्याला माहितच नाही . उदाहरण द्यायचं झालं तर , टेबल , मोबाईल , आयडिया ही काही थोडेच शब्द झाले पण यांसारखे असे खूप शब्द आहेत , जे आजमितीला आपण वापरतो . इंग्रजीचे व्याकरण सोडले तर , इंग्रजी ही भाषा दररोज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्रास पणे वापरतो . आज जेव्हा मी माझ्या आजूबाजूला बघतो तेव्हा मला सर्व काही इंग्रजीच दिसते .
एखाद्या लाकडाला जशी वाळवी लागते ना! तशी ही विदेशी भाषा , ही विदेशी संस्कृती आपल्या भाषेला , आपल्या संस्कृतीला , आपल्या धर्माला लागलेली आहे . ही वाळवी जशी लाकूड पूर्णपणे नष्ट केल्यावर दुसऱ्या लाकडाच्या शोधात जाते ना! त्याचप्रमाणे ही विदेशी भाषा , संस्कृती आणि धर्म सुद्धा , आपल्या भाषेला , आपल्या संस्कृतीला आणि आपल्या धर्माला नष्ट करून दुसऱ्या गोष्टीच्या शोधात निघणार आहे .
आणि दुसरं म्हणजे ही विदेशी भाषा संस्कृती धर्म हे परावलंबी बांडगुळ आहेत .
जे की दुसऱ्याच्या धर्मावर , दुसऱ्याच्या संस्कृतीवर आणि दुसऱ्याच्या भाषेवर अवलंबून असतात . त्यांना स्वतःची जोपासना स्वतः करताच येत नाही , म्हणजेच त्यांच्या भाषेत , धर्मात , संस्कृतीत कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाहीये ते फक्त आणि फक्त दुसऱ्याचे ज्ञान , दुसऱ्याची संस्कृती व दुसऱ्याच्या गोष्टी चोरून बहूदा त्या करून स्वतःची संस्कृती , धर्म , भाषा महान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत .
ह्या विदेशी गोष्टी म्हणजे एक प्रकारचे हळूहळू काम करणारे विषच आहे .
जे की आपल्या भाषेमध्ये , आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या धर्मामध्ये फैलावत चालले आहे .
जर आपण या विषावर आजच उपाय केला नाही ना! तर आपलं अस्तित्व लवकरच ह्या जगातून नष्ट होईल . आपल्याला आपलं स्वतःचं म्हणण्यासारखं काहीही राहायचं नाही आणि मग आपल्याला एका भुकेलेल्या कुत्र्याप्रमाणे या विदेशी लोकांकडे ,
त्यांच्या तोंडाकडे पहावे लागेल . आणि तोच अपमान ( भारतीय आणि कुत्र्यांना इथे येण्याची परवानगी नाहीये ) पुन्हा सहन करावा लागेल .
आज ज्याप्रमाणे आपल्याकडे कच्चे तेल पेट्रोल-डिझेल उपलब्ध नसल्याकारणाने आपल्याला तेलासाठी अमेरिकेचा दबाव सहन करावा लागत आहे ना!
त्याच प्रमाणे भविष्यात आपल्याला आपल्याकडे आपली भाषा , आपली संस्कृती , धर्म आणि स्वदेशी गोष्टी नसल्याकारणाने दुसऱ्या देशांची मक्तेदारी पुन्हा सहन करावी लागेल . आपल्यापैकीच काहींना माझे बोलने पटेल तर काहींना ते पटणार नाही हे नक्कीच ! पण , एक गोष्ट प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवली पाहिजे , ती म्हणजे आपण भारतीय येणाऱ्या संकटाची वाट पाहत बसत नाही , तर ती संकटे येण्याच्या आधीच त्या संकटांना नष्ट करतो हा आपला इतिहास आहे . त्या संकटांना या देशात मुळे धरायच्या आताच त्यांना आपण नष्ट करतो . हे मी स्वतः म्हणतोय अशातला भाग नाहीये आणि हे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे अशातलाही भाग नाहीये , तर आपल्या आयुर्वेदशास्त्र

या ग्रंथाची निर्मितीच या नियमावर आधारित आहे . त्यामुळे अजून काही वेगळं सांगावं असं याची मला तरी गरज भासत नाहीये . संकटे आल्यावर त्यातून पळायला , त्यातून पळवाट काढायला आपण काही विदेशी लोक नाहीहोत , तर आपण संकटांशी दोन हात करू त्यांना हरवणारे आपण भारतीय आहोत . म्हणून मी सांगतोय की आपल्यात विदेशी लोकांचं रक्त वाहत नाहीये तर आपणामध्ये स्वदेशी , भारतीय भूमीच्या शूर पुत्रांच रक्त सळसळत आहे आणि म्हणून ही गोष्ट हसण्यावारी न घेता , येणार्या विदेशी संकटांपासून आपल्या धर्माचा , आपल्या भाषेचा , आपल्या स्वदेशी गोष्टींचा स्वीकार करून आपल्या भारत वर्षाला , आपल्या भारतभूमीला वाचवूया आणि पुन्हा एकदा एका निर्धाराने , एकतेच्या आणि स्वकीयांच्या आधारावर या देशाला उभं करूयात .....
वंदे मातरम ... जय हिंद ... जय भारत ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा