व्यसनाधीनता - एक विषारी साप

           

              आज माझ्या घराच्या शेजारी , माझाच चुलत भाऊ म्हटलं तरी चालेल , दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला , अत्यंत वाईट आणि हृदयद्रावक ही घटना होती . एका पूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून तो परमात्म्यात विलीन झाला . तो गेला पण त्याच्या मागे असणार्‍या त्याच्या कुटुंबाचे मात्र हाल काही काळ हाल होणारं . " कुणी कुणासाठी थांबत नाही हे मला मान्य आहे " , पण तरीही एक न भरता येणारी पोकळी मात्र आयुष्यभरासाठी त्यांच्या जीवनात तयार झाली आहे . असे एक-दोन नाही तर , लाखो-करोडो संसार आजपर्यंतच्या ह्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेले आहेत , नष्ट झालेले आहेत . अरे ऐन उमेदीच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षाच्या वयात या व्यसनामुळे अनेक माणसे आपल्या कुटुंबाला सोडून जातात .
               दोन-तीन दिवसांपूर्वी अशीच एक हृदयद्रावक घटना आमच्या गावातच घडली , ती म्हणजे दारूच्या अतिसेवनामुळे फुफ्फुसे फुटून एकाचा दुर्दैवी अंत झाला . अशी आपल्या सभोवताली असंख्य वाईट उदाहरणे असूनही आपण त्याच व्यसनाधीन मार्गाकडे का वळतोय आणि का

चरस , गांजा , गुटखा , तंबाखू , सिगारेट , दारू या मादक पदार्थांचे सेवन करतोय . या व्यसनाच्या पॉकेट वर या गोष्टीपासून तुमच्या आरोग्याला धोका आहे असे लिहिले असतानाही त्याच्याकडे आपण का आकर्षिले जातो आहेत . आज तुम्हाला मंदिरामध्ये माणसे कमी दिसतील पण दारूच्या अड्ड्यावर आणि वेश्यांच्या कोठ्यावर माणसांची तुडुंब गर्दी तुमच्या नजरेस पडेल .

तिथे कधीही तुम्हाला ओसाडपणा दिसणार नाही . इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक ह्या वाईट गोष्टींच्याकडे आकर्षिले जात आहेत .पण का? तर अनेक जणांचे उत्तर असेल की आज लोकांवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण आहे . त्यांच्या जीवनात खूप तणाव आहे म्हणून ते व्यसनाधीन झालेले आहे . तर माझा त्यांना असा प्रश्न आहे की , हा ताण , तणाव , त्रास कशासाठी सहन करतो आहे , जगण्यासाठीच ना?  दोन वेळेचं अन्न सुखानं गिळायला मिळावं आणि चांगले आरोग्य मिळावे , समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठीच ना? जर एवढा ताण , तणाव सहन करून देखील तुम्ही वाईटच व्यसनाधीन मार्गाकडे जाणार असाल , तर त्या कामाचा , त्या तणावाचा काय उपयोग सांगा तुम्हीच?
       

          आजच्या तरुण पिढीला व्यसन म्हणजे फॅशनच होऊन बसली आहे , जिकडे मी आज बघतोय तिकडे व्यसनाधीन  तरुण-तरुणीच मला दिसतात . एक काळ होता जेव्हा व्यसन करणाऱ्यांना तुच्छ मानलं जायचं , पण आज मितीला जे व्यसनाधीन नाहीये त्यांनाच तुच्छ समजले जात आहे आणि म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजची तरुण पिढी भविष्याचा कोणताही विचार न करता या अंधकाराच्या आणि फसव्या जगात प्रवेश करत आहे , जेथून सुटका होणे जवळजवळ अशक्यच आहे .
          सध्या अजून एक फॅड आपल्या समाजामध्ये आले आहे , जे की आधीपासूनच असेलच , ते म्हणजे इतरांपेक्षा मी मोठा कसा , इतरांपेक्षा

कोणती गोष्ट माझ्यात वेगळी आहे हे दाखवण्याचा आणि स्वतःला मोठे सिद्ध करण्याचा नादामुळे अनेक मुलं व्यसनही करतात आणि यात अजून दुसरे काही लोक असतात , जे लोक ज्या गोष्टी सर्व करतात त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाही तर , त्यापेक्षा वेगळं म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणी कचरा टाकत नसेल तर त्या ठिकाणी टाकणं , एखाद्या ठिकाणी कोणी कचरा उचलत नसेल तर तेथे उचलणे , जिथे थुंकू नये असं लिहिलं असेल

तिथे मुद्दामहून थुंकणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी निव्वळ लोकप्रियतेसाठी काही क्षुल्लक लोक करत असतात . त्यामुळे कधी कधी स्वतःला लोकांपुढे सिद्ध करण्यासाठी तर कधीकधी मी लोकांपेक्षा वेगळा कसा आहे हे दाखवण्यासाठी आजची ही तरुण पिढी वाईट मार्गाकडे आकर्षिली जात आहे . या व्यसनाधीन तरुण पिढीला कोणत्याही गोष्टीचे भान राहिलेलं नाहीये , नाही स्वतःच्या इज्जतीचे आणि नाही समाजाच्या नीतिमूल्यांचं आणि म्हणून या उताविळ पणे वागणाऱ्या तरुण पिढीमुळे आपल्या भारताचे भविष्य कुठेतरी नष्ट होत चालले आहे .
         आज बारा बारा तेरा तेरा वर्षाची पोरं तंबाखू , गुटखा खातात ,

सिगारेट फूकतात , सोळा सतरा वर्षाची पोरं दारू पितात , शिव्या देतात , विषयांन सुख अनुभवण्याचा प्रयत्न करतात . अरे आधुनिकतेच्या नावाखाली कोणत्या रस्त्याला अापण चाललोय याचं भानचं आपल्याला राहिलेले नाहीये .
         मनुष्याला भगवंताने स्वतंत्रता दिलेली आहे , पण आजची युवा पिढी या स्वतंत्रतेच्या नावाखाली कशीही उनाडपणे वागत आहे , त्यामुळं आजची तरुण पिढी पूर्णपणे भ्रष्ट होत चाललेली आहे .

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच स्वप्न होतं की , भारताला महा प्रजासत्ता करण्याचं , ते स्वप्न आज मला तर पूर्ण होण्यासारखं , आजच्या परिस्थितीकडे पाहून वाटत नाहीये . उद्याचा भारतात जगातील सर्वात जास्त तरुण नक्कीच असतील पण त्यातले निम्म्याहून अधिक व्यसनाधीन असतील . त्यामुळे आपला भारत तरुण नसूनही म्हाताराचं असेल . हे आपण लक्षात घेतलं पाहिजे .
       " वेगळेपणा व्यसनात नसून आपली प्राचीनता आपली संस्कृती आपली माणुसकी आणि चांगुलपणा जपण्यात असतो , जोपासण्यात असतो " हे ध्यानात ठेवायला विसरू नका .
       त्यामुळे ह्या आधुनिकतेमध्ये असणाऱ्या वाईट गोष्टींना बळी न पडता चांगल्या गोष्टींचा चांगल्या विचारांचा स्वीकार करून आपल्या देशाला स्वावलंबी आणि प्रगतीशील बनवा . कोणताही चित्रपट पाहून त्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टींचा अवलंब केला म्हणजे आपला देश सुधारणार आहे , आपली परिस्थिती सुधारणार आहे अश्या चुकीच्या भ्रमात न राहता चांगल्या सवयींचा अवलंब करून स्वतःला त्याच बरोबर आपल्या भारताला सुदृढ बनवा . कारण की त्यातच आपलं हित आहे .




         ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....

       " आज आधुनिकता आली पण , त्याचबरोबर माणुसकीची कमतरता कुठेतरी भासायला लागली , आज मनुष्याकडे पैसा आला पण , त्याची ताकद कुठेतरी हरवली , अरे जगणे गतिमान झालं पण , जीवन कुठेतरी छोटा झालं , आवाज दूरवर पोहोचण्यासाठी साधन आली पण , माणसं जोडण्याची कला कुठेतरी माणूस विसरला , ज्या जगाची सुरुवात प्रेम ,  दयामाया , निस्वार्थीपणा आणि मानव जातीचे कल्याण यावर झाली होती , तो माणूस आज कुठेतरी भटकला आहे . त्यामुळे आपण बदलांच्या नावाखाली असंख्य वाईट गोष्टींना आनंदाने मिठी मारलेली आहे . हळूहळू समाजव्यवस्थेची एक सुसंस्कृत इमारत कोसळलत चाललेली आहे . आम्हाला ती डोळ्यांनी दिसत असूनही आम्ही फक्त तिच्याकडे बघतच आहोत , आज मनुष्याला सर्व गोष्टींचे ज्ञान लवकर आत्मसात होते , समजते पण , त्याला ते प्रत्यक्षात उतरवता मात्र येत नाही हीच एक खंत आणि शाप आजच्या  मानवजातीसाठी म्हणावा लागेल .

शेवटी एवढंच सांगावसं वाटतं , "जेवढी असे आधुनिकता , त्याहून अधिक भासे माणुसकीची कमतरता " .....





        ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....