जसा ससा आणि कासव , तशीच आधुनिकता आणि स्वदेशी

         


              आज वर्तमानपत्रामध्ये मी एक नवीन बातमी वाचली की ,  कर्करोगासारख्या प्राणघातक रोगावर कायमस्वरूपी उपचार सापडला . पण मला तर यावर असं वाटतंय की ही फक्त आणि फक्त वर्तमानपत्र मधील एक बातमी म्हणूनच राहणार आहे आणि ही गोष्ट लोकांपर्यंत कधीच पोहोचणार नाहीये . कारण आज  कर्करोग हा जगातील सर्वात मोठे व्यापाराचे साधन बनलेला आहे . हे फक्त कर्करोगासाठी नसून तर हजारो बाकीच्या आजारांसाठी देखील आहे . त्यामुळे कायमस्वरूपी त्यावर उपचार म्हणजे लाखो करोडो रुपयांचा व्यापार याठिकाणी नष्ट होणार आणि ते तर ह्या विदेशी व्यापारी कंपन्या होऊ देणार नाही .
              ह्या आजारांचा व्यापार आज इतका मोठा झालेला आहे की ,

 या व्यापारातली सर्वात खालची कडी  म्हणजे उपचार करणाऱ्या डॉक्टरांची , यांचे देखील आज बंगले उभे राहण्यास सुरुवात झाली आहे . सर्वात खालच्या कडीची एवढं उत्पन्न असेल तर ,  सर्वात वरती असणाऱ्या कंपन्या किती पैसा छापीत असतील याचा आकडा आपल्या विचारांच्या आवाक्याबाहेरच आहे . जर ह्या मेडिसिन कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी रोग देखील तयार करू शकणाऱ्या या कंपन्या  कर्करोगावर कायमस्वरूपी उपचार काढून स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड का म्हणून मारून घेतील? तुम्हाला पूर्णपणे बरे करण्याची किंवा कायम स्वरूपी तुमच्यावर उपचार करण्याची ताकद ह्या व्यापारी कंपन्या ठेवतच नाही , आणि ती ताकद त्यांच्यात नसतेही , कारण " कायमस्वरूपी उपचार फक्त आणि फक्त परमेश्वरच करू शकतो आपण फक्त प्रयोग करतो पण फळ मात्र परमेश्वराकडेच असते " आणि हे यशस्वी प्रयोगांची फळ सामान्य जनतेपर्यंत या विदेशी कंपन्या कधीच पोहोचू देत नाही . उलट आजार अजून अधिक कसे बळावतील आणि आपला फायदा कसा वाढेल याचाच विचार या कंपन्या नेहमी करत असतात . भारतामध्ये गेल्या सत्तर वर्षात जेवढे आजार , रोग आलेले आहेत ना! आणि त्या आजारांमुळे जेवढी माणसे मेलेली आहेत ना!

तेवढी गेल्या हजार वर्षात देखील आजाराने मेलेली नसतील . आज मितीला मनुष्यदेह म्हणजे एक व्यापारी साधन झालेला आहे ह्या विदेशी व्यापारी कंपन्यांसाठी .
              भारतामध्ये प्राचीन काळात जी जीवन पद्धती होती ना! ती पूर्णपणे पर्यावरण पूरक अशीच होती आणि आज जी आपण युरोपियन जीवन पद्धती वापरतोय ना! ती फक्त आणि फक्त पर्यावरण मारक आहे .

आपण जीला आधुनिक जीवनपद्धती म्हणतो ना! या जीवन पद्धतीचे आयुष्य फक्त आणि फक्त दोनशे ते तीनशे वर्ष आहे त्यापेक्षा अधिक ही जगणे शक्यच नाहीये आणि म्हणून तिचे  भयावह परिणाम आपल्याला आज दिसायला सुरुवात झालेली आहे . आधुनिक जगतातील सर्वच्या सर्व गोष्टी ह्या वाईट आहे , असे मला म्हणायचे नाहीये . पण तरी ह्या आधुनिक जगातील शंभर गोष्टी पैकी दहा ते पंधरा गोष्टी चांगल्या सोडल्या तर , बाकीच्या ८५ ते ९० गोष्टी वाईटच आहेत . हे आपल्याला आज कळायला लागले आहे , पण आपणाला अजूनही ते वळत नाहीये जर आपल्याला एक चांगली जीवन जगायचं असेल तर ह्या आधुनिक नावाच्या आभासी जगातून बाहेर पडावेच लागेल .
           इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो जेवढा विकासाचा देखावा गेल्या दीडशे ते दोनशे वर्षात या जगाचा झालेला आहे ना!  तेवढा मागच्या कोणत्याच कालखंडात झालेला नाहीये . म्हणजेच आज मीतिला आपण फक्त

आणि फक्त एक पुष्ट्याची इमारत उभी करत आहोत जी की जेवढ्या लवकर तयार होणार आहे तेवढ्याच लवकर ढासळणार आहे आणि ह्या पुष्ट्याच्या इमारती सारखेच हे आधुनिक जग आहे , जे की लवकरच मोडकळीस येणार आहे जर आपल्याला रोगमुक्त , आनंदाने आणि स्वावलंबी ,  स्वाभिमानी होऊन जगायचे असेल तर आपण आपलीच प्राचीन चिकित्सापद्धती , संस्कृती , अन्न आणि शिक्षणपद्धती वापरली पाहिजे . " जेवढी ताकद हळूहळू प्रगती करण्यात आहे ना! तेवढी धावून प्रगती करण्यात नाहीये "
          आपल्या आवडती गोष्ट जी जगभरात देखील खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे ससा व कासवाची गोष्ट .

आपण आपल्या लहान मुलांना ही गोष्ट आवर्जून शिकवतो पण तीच गोष्ट आपण मात्र आचरणात आणायला विसरतो आहोत आणि म्हणून आज आपण ह्या आधुनिकता रुपी सस्यामागे धावतोय . जो की पुढे कुठेतरी दमणारच आहे आणि थांबणारच आहे .अरे या आधुनिक सस्यापेक्षा आपले हळुवारपणे काम करणारे पर्यावरणपूरक आणि एक आनंदी जीवन जगण्याचे शिकवणारे आपले स्वदेशी कासवंच बरे .
         या ठिकाणी मी आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो , ते म्हणजे आपल्या अवकाशीय संशोधन संस्था इस्रो चे .

कोणत्याही देशाची मदत न घेता , भारताने स्वदेशीच्या बळावर अवकाशशास्त्रामध्ये , विज्ञानामध्ये जे सर्वोच्च स्थान या जगामध्ये निर्माण केलेले आहे ना! ती कधीही न मिटणारे आहे .  ज्याठिकाणी , ज्यागोष्टीसाठी युरोपियन देश , पाश्चिमात्य देश एकमेकांमध्ये स्पर्धा करत होते ना!  त्याच ठिकाणी , त्याच गोष्टीसाठी आणि त्याच शर्यतीच्या पट्टीवर हळूहळू कासवाच्या गतीने चालून स्वतःच्या जीवावर आणि पूर्ण स्वदेशी विज्ञानावर आपण जे यश मिळवलेले आहेत ना! ती खरोखरच खूप अलोकनीय आहे . आणि जर हीच पद्धत बाकीच्या क्षेत्रात वापरली तर , विचार करा काय बदल होईल? हे उदाहरण त्यांच्यासाठी आहे जे  म्हणतात की स्वदेशीत काय आहे? तर ,

            " स्वदेशीतच आहे खरी ताकद जगण्याची ,
               स्वदेशीतच आहे खरी ताकद टिकण्याची ,
               स्वदेशीतच आहे खरी ताकद लढण्याची ,
               या आधुनिक रुपी वाईट जगताशी .....
               या आधुनिक रुपी वाईट जगताशी .....






            ..... वंदे मातरम ..... जय हिंद जय भारत .....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....