आज आपण आपल्या आजूबाजूला ज्या वाईट घटना , ज्या वाईट गोष्टी बघतोय ह्या कशामुळे होतात , का मनुष्य ह्या वाईट गोष्टींना बळी पडतोय याचं कारण आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपल्या देशात , आपल्या समाजात बहुतांश लोक फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत . आजच्या मनुष्याला वाटतंय की मीच सर्वांपेक्षा बलवान व्हावा आणि म्हणून आज बहुतांश लोक स्वार्थी भाव मनात ठेवून कार्य करत असतात . बहुतेक जण आज मीतीला फक्त आणि फक्त दिखाऊपणा करण्यात व्यस्त आहे .

मनुष्याची पहिली प्राथमिक गरज असते अन्न आणि ती पूर्ण झाली की , त्याला संपत्तीची ओढ लागते , संपत्ती मिळाली की दिखाऊपणा वाढतो आणि तो वाढला की समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे असे त्याला वाटते आणि त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी तू तयार असतो . ही आजची परिस्थिती आहे , ती आज तयार झाली आहे अशातला भाग नाहीये , तर ही परिस्थिती महाभारताच्या काळापासून चालत आलेली आहे आणि सबंध महाभारत देखील स्वार्थीपणा मुळेचं घडले अाहे हे आपल्या सर्वांना माहितच असेलच . आज जगातला ७० ते ७५ टक्के समाज हा फक्त आणि फक्त स्वार्थीपणाच उराशी बाळगून जगत आहे आणि उरलेले २५ ते ३० टक्के लोक निस्वार्थीपणाने . पण हळू त्यांची संख्या सुद्धा घटत चालली आहे कारण
सडलेल्या कांद्यामध्ये एक चांगला कांदा असेल तर त्याला डाग लागतोच .
आज बहुतांश लोक समाजामध्ये स्वार्थीपणाचे विचार घेऊन हिंडत आहेत आणि त्यामुळे आज समाज एवढ्या वाईट गोष्टींकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे . ही समाजातील स्वार्थी , चारित्रहीन माणसे तयार होण्याचे दुसरे कोणतेही कारण नसून आजचे आधुनिक शिक्षण पद्धती आहे . जी की फक्त आणि फक्त
पैसा कसा कमवावा , पैशाशिवाय तुम्हाला समाजात मानचं मिळू शकत नाही , पैशाशिवाय सुख नाही हेच शिकवते आणि त्यामुळे नकळतपणे आज समाजातील बहुतांश लोक फक्त पैशाच्या मागे लागलेले आहेत आणि तो पैसा कमवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार आहेत . याची उदाहरणे रोज तुम्हाला दिसत असतील दूरचित्रवहिन्यांवर आणि तुमच्या भ्रमणध्वनीवर .
आज गुंठाभर जमिनीच्या तुकड्यासाठी देखील लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत ,
एकमेकांचा जीव घेण्यासाठी तयारच बसले आहेत . आज मी जिकडे बघतोय तिकडे प्रत्येक जण अलिप्त , विभक्त राहिला बघतोय , एकटं राहिला बघतोय . अरे ही कुटुंबपद्धती , समाजपद्धती आपल्या पूर्वजांनी कशासाठी तयार केली आहे? कशासाठी आपले पूर्वज एकत्र राहात आलेले आहेत? हे आपण जाणतो आहे का? माणसांनी एकत्र एकोप्याने , सुखात आणि आनंदात रहावे म्हणूनच ही समाजपद्धती , कुटुंब व्यवस्था आपल्या पूर्वजांनी तयार केली आहे कारण त्यांना माहिती एकटं राहण्यात काही अर्थ नाहीये . " एकटी काठी लगेच मोडून जाते , पण त्या काठ्यांची मोळी मात्र टिकते . "
ही गोष्ट आपण सर्वांनी लहानपणी वाचलेली , ऐकलेली आहे पण आज मात्र आपण त्या गोष्टीला पूर्णपणे विसरलेलो आहोत . आजच्या माणसाला वाटते आहे की , तो एकटा पैशाच्या जीवावर कोणतेही सुख खरेदी करू शकतो , कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो पण त्याला ठावं नाहीये की , तो एका गोड भ्रमात जगत आहेत , जो की लवकरच कडू होऊन त्याचा जीव घेणार आहे .
आज माणूस फक्त आणि फक्त त्याच्या बायकोचा आणि त्याच्या मुलाबाळांच्या स्वार्थाचा विचार करतोय . त्याला त्यांच्यापुढे त्याचे जन्म देणारे आई-वडील
त्याचे भाऊ-बहीण कोणीच दिसत नाहीये , त्याला वाटत आहे की तो एकदम बरोबर आहे पण नकळतपणे तो त्याच्या मुलाबाळांना देखिले हेच वाईट , अलिप्तवादी संस्कार देत आहे . पण त्याला हे आत्ता कळत नाहीये , त्याला वेळ गेल्यावर आणि त्याने म्हातारंपणात पदार्पण केल्यावर हे कळतं .
मुलांची मने ही निर्मळ पाण्याच्या झऱ्यासारखी , ओल्या मातीची असतात , ज्यांना चांगला आकार देणे गरजेचे असते पण आपण त्या पाण्याला , त्या मातीला चांगला आकार देण्याऐवजी त्याला नकळतपणे आपल्या स्वार्थीप्रेमापोटी दूषित करत आहोत .
अरे खरे आयुष्य काय असतं? आपण या मनुष्य देहात का जन्माला आलो आहे , आपलं खरं सुख कशात आहे , हेचं आजच्या माणसाला कळत नाहीये कारण त्याला ह्या बद्दलचे ज्ञान कोणी दिलेलेच नाहीये , आणि देणार तरी कसे , त्याने त्याच्या प्राचीन ज्ञानाला अउपयोगी , वेळखाऊ ठरवून , स्वार्थी आणि नीतिमत्ताहिन शिक्षणाला स्वीकारले आहे .
जर एखादा चांगला समाज एखादं चांगलं सुसंस्कृत कुटुंब हवे असेल तर आपल्या प्राचीन शिक्षणाला , विचारांना पुन्हा पुनर्जीवित करावेच लागेल , कारण त्यातच आहे जगण्याची खरी मूल्ले आणि जीवनाचा खरा आनंद व पाया .
.
..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा