तुमचे चांगले विचारचं बदलतील हा देश .....

         

          आज सकाळी मी एक बातमी वाचली जी की बहुतेकांनी आपल्या मोबाईल स्टेटस ठेवली होती . ती बातमी होती हैदराबाद मधील एका युवतीवर बलात्कार झाल्याची ..... ह्या वाईट गोष्टीचा राग सगळ्यांनी आपल्या स्टेटसमधून पुरा व्यक्त केला . बहुतेकांनी तर शिव्यांपर्यंत मजल मारली .

पण हे करताना ते सर्व विसरले की , कुठेतरी आपणही या अशाच प्रकारच्या खराब विचारांचा भाग आहोत भलेही ते कृतीत आणले नसतील ( कारण विचार करणे ही अर्धी कृती असते ) आज बहुतेक तरुण स्रीकडे आकर्षित होतात , त्यांच्या मनामध्ये स्री बघताच विषयं भावना उत्पन्न होतेच होते  , मग आता तुम्हीच सांगा त्यां नराधामांमध्ये आणि आपल्या मध्ये फरक कसा काय? त्या नराधमांचा शिरच्छेद करायला हवा , त्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी , त्यांना जाळून टाकायला हवं असे विचार अनेकांनी मांडले पण ,

          " झाडाची खराब झालेली फांदी छाटून काय उपयोग जर का , त्या झाडाची मुळेच विषात बुडालेली असतील . "              त्यांना आज फाशी जरी दिली तरी , सुद्धा असंख्य अशीच वाईट विचाराची माणसे आपल्या समाजात हिंडतायेत , जी का उद्या अशीच कृती करणार आहेत .

फाशीच्या शिक्षेने शंभरात मधल्या पाच ते सहा जणांवर परिणाम होईल पण उरलेल्या ९५ जणांचा काय? याचे उत्तर आहे का कोणाकडे? कारण ह्या गुन्ह्याच्या वेळेला गुन्हेगारांना वाटणारे क्षणिक शाररिक सुख कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठे वाटते , त्यावेळेला त्यांना बरेवाईट याची काहीच कल्पना येत नाही , कितीही त्यांनी स्वतःला आवरले तरीही मन तिकडे वळणारच आणि कृती करनारचं . त्यामुळे मला तरी वाटते आहे की , या गुन्हेगारी प्रवृत्तीला क्षणिक शिक्षेमुळे काही बदलता येणार नाहीये . जर गुन्हेगारी , अशा प्रकारचे अत्याचार थांबवायचे असतील तर वाईट विचारांच्या प्रवृत्तीला मुळापासून समूळ नष्ट करावे लागेल तरच हे शक्य आहे .
          आज तरुणांमध्ये बरेवाईट काय आहे याचा फरक करण्याची क्षमता उरलेली नाहीये आणि ही क्षमता त्यांच्यामध्ये शिल्लक नाहीये कारण आपण त्यांना चांगले विचार करायला शिकवले नाहीये . असे म्हणतात की ,

                  " विद्ये विना निती गेली ,
                     निती विना मती गेली ,
                     मती विना भान हरले ,
                     हे सारे अनर्थ एका अविद्येने घडवले ."

         पण मला तर असं वाटतंय की , आज विद्या देऊनही लोकांचे मती गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे भान हरून हे वाईट प्रकार आपल्या समाजात आज घडतायेत . कारण आजची विद्या आजचे शिक्षण हे फक्त

पैसा कसा कमवावा एवढेच शिकवते पण त्या पैशाचा वापर कसा करावा हे शिकवत नाही आणि नाही नितीमत्ता , चारित्र्यपूर्णता , सुविचार . यामुळेच आज आपल्या समाजामध्ये एवढ्या वाईट प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि हे गुन्हे यापुढेही घडत राहणार जोपर्यंत आपण इथल्या लोकांना नीतिमत्तेचे , चारित्र्यवानतेचं शिक्षण देत नाही .

आणखी दुसरं गोष्ट म्हणजे आपल्या हातामध्ये असणारे तंत्रज्ञान हे  देखील या वाईट गोष्टींना तितकेच कारणीभूत आहे . त्यामुळे सुसंस्कृत आणि सुदृढ विचारांचा भारत बनवायचा असेल तर आपली प्राचीन संस्कृती , शिक्षण व्यवस्था पुन्हा पुनरुज्जीवित करावी लागेल आणि त्यायोगे ह्या देशातील तरुणांमध्ये चांगल्या विचारांच रक्त भिनवायला लागेल , आणि या वाईट विचारांना आळा घालून ह्या सुसंस्कृत भारताची घडी पुन्हा बसवावी लागेल .....
          तेव्हाच भारत बदलेल आणि या जगाचा पुन्हा विश्वगुरू बनेल .....




  ..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....