आज विचार बदलला तरच उद्या जगशाल .....
किती वाईट परिस्थिती आजमितीला आपल्या संपूर्ण मानव जातीवर आपण ओढवलेली आहे याची कणमात्रही कल्पना आपल्याला नाहीये . आज सद्यस्थितीला कोणी माणुसकीचा विचारच करताना दिसत नाहीये . जो तो आज दिखाऊपणा करण्यात व्यस्त आहे .
प्रत्येक जण आज आपल्या धर्माला स्वतःहाच्या प्राणापेक्षा प्रिय मानतो आहे आणि ते मानायलाच हवं . पण त्याचबरोबर आपल्या धर्म आपल्याला काय सांगतो? , धर्माचे खरे विचार काय? याची देखील आपल्याला तितकीच जाणीव असली पाहिजे . आजच्या युगातील माणसाचा स्वभाव असा झाला आहे की , तो कोणत्याही गोष्टीवर विचार न करता ती बरोबर आहे का चूक आहे हे न जाणता , ती गोष्ट स्वीकारत आहे आणि आपल्या विचारशून्य प्रवृत्तीमुळे आपण चांगल्या गोष्टीला वाईट आणि वाईट गोष्टीला चांगले मानतं चाललो आहे .
आज बहुतेक लोकांमध्ये धर्माचे खरे विचार जिवंत नाहीये . कारण आज बहुतेक माणसांचा पैसा हाच धर्म होऊन बसला आहे . पहिल्या काळात तुम्ही धर्माला मानत आहात आणि धर्माचे खरे मानवतावादी निस्वार्थी विचार तुमच्यात जिवंत आहेत तरचं तुम्हाला सर्व गोष्टी मिळवता येतील . अशी समाजात पहिल्यांदा मान्यता होती पण आज नकळतपणे ती मान्यता पैशाकडे आलेली आहे .
" आज तुमच्याकडे पैसा असेल तरच , सर्व काही तुम्हाला मिळेल अशी भावना झालेली आहे " आणि दुसरं म्हणजे आज लोके पैसा कमवण्याला पुण्यकर्मे समजतं आहेत . त्यामुळं लोकं ही आभासी , अशाश्वत पुण्यकर्मे मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्यासाठी आज तयार आहेत . आज तुमच्या आजूबाजूला तुम्ही याची उदाहरणे बघतच असाल .
असे म्हटले जाते की ,
" ज्याप्रमाणे एका वृक्षाची बी मातीत रुजून झाडाचे रूप घेते आणि हळूहळू त्या झाडापासून हजारो झाडे तयार होऊन जंगल निर्माण होते . त्याच प्रमाणे आज आपल्या समाजामध्ये ह्या अंधकारमय वाईट गोष्टींची , वाईट विचारांची बी रुजलेली आहे किंबहुना बहुदा तिचे रोपटे बनायला देखील सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू ही अंधकारमय वाईट विचारांची बी हळूहळू वाढत जाऊन आपल्या समाजाला ,
ह्या मानव जातीला स्वतःच्या वाईट , विचारहीन गोष्टींचा छत्रछायेखाली घेईल किंबहुना याची सुरुवात देखील झालेली आहे आणि ह्या वाईट जगतातून बाहेर पडणे खुपचं अवघड आहे .
असे म्हटले जाते ,
" जो माणूस नवीन काहीतरी करतो त्याला समाज पहिल्यांदा हसतो , नंतर वाईट नजरेने त्याच्याकडे बघतो , तदनंतर त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्याला स्वीकारतो " ही गोष्ट , ही ओळ जशी चांगल्या विचारांबद्दल जितकी लागू पडते ना! तितकीच ही गोष्ट , ही ओळ वाईट गोष्टींसाठी देखील लागू पडते . आज प्रत्येक जण स्वतःचे नवीन अस्तित्व निर्माण करू पाहतोय , ज्यातून त्याला समाजात पैसा आणि त्या पैश्यांद्वारे समजात स्थान मिळवता येईल , मान्यता प्राप्त करता येईल . यासाठीचं आज प्रत्येकजण प्रयत्न करतोय , त्यामुळे तो असंख्य अशा वाईट गोष्टींना देखील आधुनिक विचार समजून या समाजात पसरवत आहेत आणि आपला समाज देखील त्या गोष्टी मान्य करत आहे , कारण समाजातील व्यक्तींमध्ये काय वाईट आहे , काय चांगलं आहे याचा विचार करण्याची क्षमताचं उरलेली नाहीये . त्यामुळे जी वाईट गोष्ट समाजात येते ती आधी वाईट आहे म्हणून दूर करण्याचा दिखावा ह्या समाजातील व्यक्ती करतात आणि नंतर त्याच गोष्टींना या समाजातील व्यक्ती आत्मसात करतात , तर का? कारण ही समाजाची गरज आहे म्हणून?
आज लोकांना फक्त क्षणिक आनंद हवा आहे याचा उच्चार मी माझ्या मागच्या लेखांमध्ये देखील केलेला आहे आणि तेच खरं देखील आहे कारण आज लोक फक्त क्षणिक आनंदासाठी जगतात . जे आमच्या मनाला क्षणाचे का होईना सुख देईल ते आम्हाला लगेच हवयं . त्यामुळे असंख्य वाईट विचारांनी आपल्या समाजामध्ये प्रवेश केलेला आहे .
आज ज्याप्रमाणे आपण प्राण्यांना निर्दयीपणे मारतो आहे ना! त्यांची कत्तल करतो आहे ना!
त्याचप्रमाणे आज माणूस माणसांना निर्दयीपणे मारायला लागला आहे . तर कशासाठी , तर क्षणिक आनंदासाठी , स्वार्थासाठी आणि पैशासाठी कारण पैसा हाच आजच्या माणसाचा धर्म बनून बसला आहे . मला तर वाटतयं आज जशी चौकाचौकात मटणाची दुकाने दिसतं आहे ना!
तशीच काही काळानंतर तुम्हाला माणसाच्या मांसाचीही देखील दुकाने चौकाचौकात दिसायला लागतील आणि आपण या वाईट गोष्टीला सामाजिक मान्यता आहे म्हणून ते मांस खात असू .
अरे हे तर काहीच नाही याहूनही खूप वाईट गोष्टी या जगात घडतील जर आपण आज सावध झालो नाही , आज सावरलो नाही तर , आज भारतातील प्रत्येक माणसाने जागरूक होण्याची गरज आहे आणि विचारपूर्वक गोष्टींचे , वस्तूचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विचारांचे फायदे तोटे जाणूनच त्यांना स्वीकारायला हवं . चला सर्वजण वाईटाचा त्याग करून पुन्हा एकदा एका सुसंस्कृत , सुविचारी , चारित्र्यवान , नितीवादी आणि धैर्यशील भारताची निर्मिती करूयात ..... जो की , मानवतेवर , माणुसकीवर आणि निस्वार्थी विचार आणि प्रेमावर आधारित असेल
..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....
आज बहुतेक लोकांमध्ये धर्माचे खरे विचार जिवंत नाहीये . कारण आज बहुतेक माणसांचा पैसा हाच धर्म होऊन बसला आहे . पहिल्या काळात तुम्ही धर्माला मानत आहात आणि धर्माचे खरे मानवतावादी निस्वार्थी विचार तुमच्यात जिवंत आहेत तरचं तुम्हाला सर्व गोष्टी मिळवता येतील . अशी समाजात पहिल्यांदा मान्यता होती पण आज नकळतपणे ती मान्यता पैशाकडे आलेली आहे .
असे म्हटले जाते की ,
असे म्हटले जाते ,
" जो माणूस नवीन काहीतरी करतो त्याला समाज पहिल्यांदा हसतो , नंतर वाईट नजरेने त्याच्याकडे बघतो , तदनंतर त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्याला स्वीकारतो " ही गोष्ट , ही ओळ जशी चांगल्या विचारांबद्दल जितकी लागू पडते ना! तितकीच ही गोष्ट , ही ओळ वाईट गोष्टींसाठी देखील लागू पडते . आज प्रत्येक जण स्वतःचे नवीन अस्तित्व निर्माण करू पाहतोय , ज्यातून त्याला समाजात पैसा आणि त्या पैश्यांद्वारे समजात स्थान मिळवता येईल , मान्यता प्राप्त करता येईल . यासाठीचं आज प्रत्येकजण प्रयत्न करतोय , त्यामुळे तो असंख्य अशा वाईट गोष्टींना देखील आधुनिक विचार समजून या समाजात पसरवत आहेत आणि आपला समाज देखील त्या गोष्टी मान्य करत आहे , कारण समाजातील व्यक्तींमध्ये काय वाईट आहे , काय चांगलं आहे याचा विचार करण्याची क्षमताचं उरलेली नाहीये . त्यामुळे जी वाईट गोष्ट समाजात येते ती आधी वाईट आहे म्हणून दूर करण्याचा दिखावा ह्या समाजातील व्यक्ती करतात आणि नंतर त्याच गोष्टींना या समाजातील व्यक्ती आत्मसात करतात , तर का? कारण ही समाजाची गरज आहे म्हणून?
आज लोकांना फक्त क्षणिक आनंद हवा आहे याचा उच्चार मी माझ्या मागच्या लेखांमध्ये देखील केलेला आहे आणि तेच खरं देखील आहे कारण आज लोक फक्त क्षणिक आनंदासाठी जगतात . जे आमच्या मनाला क्षणाचे का होईना सुख देईल ते आम्हाला लगेच हवयं . त्यामुळे असंख्य वाईट विचारांनी आपल्या समाजामध्ये प्रवेश केलेला आहे .
आज ज्याप्रमाणे आपण प्राण्यांना निर्दयीपणे मारतो आहे ना! त्यांची कत्तल करतो आहे ना!
अरे हे तर काहीच नाही याहूनही खूप वाईट गोष्टी या जगात घडतील जर आपण आज सावध झालो नाही , आज सावरलो नाही तर , आज भारतातील प्रत्येक माणसाने जागरूक होण्याची गरज आहे आणि विचारपूर्वक गोष्टींचे , वस्तूचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विचारांचे फायदे तोटे जाणूनच त्यांना स्वीकारायला हवं . चला सर्वजण वाईटाचा त्याग करून पुन्हा एकदा एका सुसंस्कृत , सुविचारी , चारित्र्यवान , नितीवादी आणि धैर्यशील भारताची निर्मिती करूयात ..... जो की , मानवतेवर , माणुसकीवर आणि निस्वार्थी विचार आणि प्रेमावर आधारित असेल

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा