विविधतेमध्येच आहे खरी एकता .....


          विविधता हा प्रत्येकाच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा विषय आहे . आज मीतिला अनेक वाईट गोष्टी घडत आहेत आणि या सर्व वाईट गोष्टींचे कारण " विविधता " आहे असे अनेकांचे म्हणणे आहे . आज अनेक जण विचार करतात की , धर्म , पंथ , भाषा , राज्य हे सर्व नष्ट झाले तर , सर्व लोकांमध्ये एकता येईल , सर्व जण गुण्यागोविंदाने राहतील आणि फक्त माणुसकी हाच धर्म ह्या जगात उरेल , पण खरंतर हे आहे , जर ही विविधता , हे धर्म , भाषा , प्रांत , पंत नष्ट झाले ना! तर जगण्याची ओढ , जगण्यातील उत्सुकता आणि मजाही नष्ट होईल आणि हे जगणं कंटाळवाणे होऊन विद्रूप होईल .  एकता जर आणायची असेल तर , विविधता नष्ट करण्याची गरज नाहीये , फक्त आणि फक्त तुमचे विचार बदलणे महत्वाचे आहे . जर तुमचे विचार सुसंस्कृत आणि चांगले असतील तर , सर्वांमध्ये " एकता " नक्कीच येईल . आज तुम्ही या समाजात , या जगात जी अराजकता माजलेली आहे , जी असंतुष्टता निर्माण झालेली आहे , ती पाहत आहात ना! ती अराजकता , ती असंतुष्टता , ही " विविधता " नष्ट केली  तरी , नष्ट होणार नाहीये . अरे ही " विविधता " नष्ट करण्याची बाब म्हणजे असं आहे की , आजार एक आहे आणि त्यावर उपचार आपण दुसरा घेत आहोत .

          आज समाजात जे बलात्कार होत आहेत , जे छोट्या छोट्या वादावरून खून होत अाहेत , जी भांडणे होत आहेत ही सर्व " विविधता " नष्ट केल्यावर संपणार आहेत का? तर नाही . " अरे हळू हळू होणारे नुकसान हे कोणत्याही मोठ्या होणाऱ्या नुकसानापेक्षा अधिक असतं " हे आपण आधी समजावून घ्यायला हवं . ते तर जाऊ द्या आपण सर्व एका कुटुंबात राहतो , एकमेकांच्या आनंद दुःखात एकत्र सहभागी होतो , तर का होतो? एकमेकांनसंगे गुण्यागोविंदाने राहतो , तर का राहतो?

कारण कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावामध्ये असलेल्या भिन्नतेमुळे , विविधतेमुळे . त्यामुळे कधी कोणी समजून घेतो तर कधी कोणी सांभाळून आणि ह्या असलेल्या विविधतेमुळे कुटुंब एकरूप होऊन राहते आणि जर ह्या कुटुंबातील व्यक्तींच्या स्वभावातील विविधता नष्ट झाली आणि सर्वजण एकाचं स्वभावाचे झाले तर , ते आपोआप एकमेकांपासून दूर जाणार आहेत . कारण संसाराचा नियमचं असा आहे की , समान गुणधर्म असणाऱ्या वस्तू एकमेकांपासून दूर जातात . ( उदाहरणार्थ दोन लोहचुंबकाची सारखी टोके ) आणि हाच नियम मनुष्याच्या जीवनावर देखील प्रभाव करतो आणि लागू होतो .

          ज्याप्रमाणे इंद्रधनुष्यामध्ये असणारे वेगवेगळे रंग एकत्र पाहताना डोळ्यांना जिवंतपणीच स्वर्गप्राप्तीचा आनंद भेटतो ना! तसाच आनंद ह्या जगात विविधता असल्यामुळे , जगताना आपल्याला आपल्या जीवनात भेटतो . आपण आपल्या घरामध्ये एकाच रंगाच्या सगळ्या वस्तू ठेवतो का? नाही ना! मग तुमचं जगणं देखील विना " विविधते " शिवाय कसे चालेल तुम्हीच विचार करा? जिभेला देखील एकाच चवीचे अन्न दररोज खाल्यावर कंटाळा येतो . मग हे तर जगणं आहे . म्हणून " विविधता " ही हवीच . पण त्याचबरोबर एकताही असायलाच हवी कारण इंद्रधनुष्याचे रंग एकत्र असतात म्हणून ते शोभून दिसतात तसेच आपण आपली विविधता जपून एकत्र , एका विचाराने जगायला हवे तरच आपलं जगणं सुंदर  आणि शुशोभित होईल .

          ज्याप्रमाणे अन्न हे आपण वेगवेगळ्या चवीचं खातो पण ते खाण्यामागचा विचार एकच असतो की , आपलं पोट भरलं पाहिजे . तसेच आपण आपल्या अंगावर विविध रंगाचे कपडे घालतो आणि आपल्या घरामध्ये विविध रंगाच्या वस्तू ठेवतो तर का? कारण आपण आणि आपलं घर सुंदर दिसावं हा त्यामागचा हेतू असतो . तसेच आपल्या जगण्यामध्ये , धर्मामध्ये , भाषेमध्ये , प्रांतामध्ये विविधता ही असायलाच हवी पण सर्वांचा हेतू मात्र एकच हवा . ( थोडक्यात म्हणजे मार्ग वेगवेगळे पण अंतिम ध्येय एकच ) म्हणजे आपलं जगणं अर्थपूर्ण आणि सुसंस्कृत बनेल ज्यायोगे सर्वांचेच भले होईल आणि सर्वांनाच मोक्ष प्राप्त होईल .

          आपले जीवन हे एक प्रकारचे वृक्ष आहे . आपले धर्म , पंथ , भाषा या वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत आणि आपण सर्व या भूतलावरील सजीव , या वृक्षाची पाने आहोत , ज्यायोगे हे झाड सदा बहरलेले आहे आणि या वृक्षाचे जे खोड आहे ना! ते म्हणजे आपले सुसंस्कृत विचार आहेत जे की , आपल्या सर्व विविध धर्मीय , प्रांतीय , भाषिय लोकांना एकत्र बांधतात . म्हणून या जगातील विविधता नष्ट करू नका , उलट तिचं संवर्धन करा आणि जर तुम्हाला काही नष्ट करायचे आहेचं ना! तर ते तुमच्या वाईट आणि स्वार्थी विचारांना करा आणि चांगले आणि निःस्वार्थी विचारांना तुमच्या मनामध्ये जोपासा ज्यामुळे पुन्हा एकदा चांगुलकीच , माणुसकीचं राज्य निर्माण होईल आणि सर्वांचेच भले होईल .....






         ..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....