व्हा खरे ज्ञानी ..... व्हा सत्यवादी आणि निःस्वार्थी .....
आज मनुष्याच्या जीवनात जे काही घडत आहे , जे काही गोष्टी होत आहेत , ते सर्वकाही अतिप्रमाणात होत आहे . ती कोणतीसुद्धा गोष्ट असो . कारण आज मनुष्याचा स्वार्थ खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे . ज्या चांगल्या गोष्टी आज मनुष्य करत आहे ना! यात देखील बहुतेकदा स्वार्थीपणा असतोच . " इकडे आड तिकडे विहीर "
या म्हणीप्रमाणे आज मनुष्याची जीवन अवस्था होताना दिसत आहे . कोणत्या दिशेला जावं हा प्रश्न आज अनेकांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसतोय .
आज मनुष्य त्याच्या रोजच्या जीवनात छोट छोटाली पापे नकळतपणे करतच असतो आणि ही आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे , तर कधी आधार नसलेले दावेही निर्माण करतो आणि त्यायोगे आपल्या मनाची समजूत काढतो आणि आपल्या वाईट गोष्टींची पाठराखणी देखील करतो . " थेंबे थेंबे तळे साचे "
ही म्हण आपल्याला माहीतच आहे पण हीच म्हण आपल्याला छोटी-छोटी पापे करताना ध्यानात येत नाही , ही आपली आजची दुर्दैवी स्थिती आहे .
प्रत्येक वेळेला मनुष्यापुढे वाईट आणि चांगले असे दोन पर्याय असतात . पण दुर्दैव असं की , यामध्ये फरक करण्याची क्षमताच आपल्यामध्ये राहिलेली नाहीये आणि त्यामुळेचं बऱ्याच वेळेला आपल्याला वाईटामध्ये दुःखे ही आडासारखी छोटी तर चांगल्यामध्ये दुःखे ही विहिरीसारखी मोठी दिसतात आणि मनुष्य नेहमी कमी दुःख असणाऱ्या बाबीकडे लवकर वळतो कारण मनुष्याकडे जे सत्यता जाणन्याचं परिपूर्ण ज्ञान हवयं ते नाहीये आणि किंबहुना त्यामुळेचं आज
मनुष्याच्या जीवनामध्ये , " स्वार्थरूपी झाडाचं रोपटं वाढतचं चालले आहे .
आज मनुष्य स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला तर , तेव्हा तो लगेचं परमेश्वराला शरण जातो आणि मला यातून बाहेर काढा अशी प्रार्थना देखील करतो , आणि एकदा संकटे दूर झाली की , तो लगेचं सर्वकाही विसरून पहिल्या कामांना पुन्हा लागतो म्हणजे देव फक्त संकटांपुरता अशी स्थिती आज देवाची झालेली आहे . आज जी तुमच्यावर संकटे येतात ना! या संकटांचं मूळ कारण तुमची कर्मे आहेत आणि म्हणून तुम्हाला संकटे , सांसारिकं दुःखे नको असतील तर कर्म चांगली करा कारण की , " जसे करावे , तसेची भरावे "
या म्हणीप्रमाणे जे कर्म तुम्ही करणार आहात त्याचेच फळ तुम्हाला मिळणार आहे . जर वाईट केलेले असेल तर वाईट आणि चांगलं केलेले असेल , तर चांगलं . आज बऱ्याच वेळेला मनुष्य वाईट गोष्टीला , चांगली गोष्ट समजून कर्म करत असतो कारण आज आपण समाजात तेचं बघतो आहे तेचं शिकत आहोत आणि तेचं सत्य मानतो आहे .
आज हिंसाचाराचा विषय आला की बरेच जण म्हणतात की , श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला लावलेचं ना!
म्हणजेचं चांगल्यासाठी वाईट करणे यात काही गैर नाहीये , हो यात गैर काही नाहीये आणि वाईटही नाहीये कारण कधी कधी चांगल्यासाठी युद्ध देखील करावं लागतं . पण खरं तर इथे वाईट आपल्यात आहे कारण की , आपण अज्ञानामुळे इतके झपाटलेलो आहोत की , त्यामुळे कोणती गोष्ट कोणत्या वेळेला योग्य आहे हे आपल्याला माहीतच नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचे अनेक मनुष्य हिंसाचार हा कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी नाही तर , फक्त आणि फक्त स्वार्थासाठी , आणि स्वफायद्यासाठी करत आहेत त्यामुळे सत्याचे ज्ञान घेणे आज गरजेचे झालेलं आहे
आज मितीला मनुष्य सुशिक्षित होऊनही , अज्ञानीचं आहे , कारण योग्य काय आहे हे त्याला कळत नाहीये त्यामुळे हा हिंसाचार , व्याभिचार या समाजात वाढताना दिसत आहे . मनुष्याचे जीवन हे दरीवर तरणाऱ्या पुलाप्रमाने असते . जिथे पुलाच्या दोन्ही बाजूला क्रोध , माया , मोह , काम , वासना ह्यांनी भरलेली दरी आहे आणि पुलावरून सुख दुःखांचा वारा वाहत आहे आणि
हा येणारा सुखदुःखाचा वारा मनुष्याला ह्या दरीत पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर मनुष्य ह्या सुखदुःखाच्या वाऱ्यामध्ये फसला आणि ह्या दरीत कोसळला तर यातच तो अडकणार आहे आणि त्याला पुलाच्या दुसऱ्या दिशेला असणाऱ्या अंतिम सत्याकडे जाता येणार नाहीये . त्यामुळे ह्या स्वार्थी जगातल्या धूर्त वाऱ्याला न फसता तुम्ही तुमच्या चांगल्या कर्माची झाडे बहरवा आणि ह्या भौतिक जगतातून मुक्त व्हा .
अजुन हे देखील लक्षात ठेवा की , धोतराच्या झाडाला काटे नसले तरी धोतऱ्याच्या झाडाला येणारे फुलं हे विषारीचं असतं आणि गुलाबाच्या झाडाला कितीही काटे असले तरी ,
गुलाबाचं फूल मात्र योग्य आणि चांगलं असते , म्हणून कितीही काटे असले तरी जे सत्य आहे आणि जे योग्य आहे ते सोडू नका कारण तेचं आहे खरे शास्वत .....
संकट रुपी काटा जरी ,
धसला तुझ्या जीवनरूपी देहात ,
तरी न घेता माघार ,
तू पूर्ण कर ,
तुझ्या सत्यतेचा आणि योग्य कर्माचा निर्धार .....
..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....
आज मनुष्य त्याच्या रोजच्या जीवनात छोट छोटाली पापे नकळतपणे करतच असतो आणि ही आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे , तर कधी आधार नसलेले दावेही निर्माण करतो आणि त्यायोगे आपल्या मनाची समजूत काढतो आणि आपल्या वाईट गोष्टींची पाठराखणी देखील करतो . " थेंबे थेंबे तळे साचे "
प्रत्येक वेळेला मनुष्यापुढे वाईट आणि चांगले असे दोन पर्याय असतात . पण दुर्दैव असं की , यामध्ये फरक करण्याची क्षमताच आपल्यामध्ये राहिलेली नाहीये आणि त्यामुळेचं बऱ्याच वेळेला आपल्याला वाईटामध्ये दुःखे ही आडासारखी छोटी तर चांगल्यामध्ये दुःखे ही विहिरीसारखी मोठी दिसतात आणि मनुष्य नेहमी कमी दुःख असणाऱ्या बाबीकडे लवकर वळतो कारण मनुष्याकडे जे सत्यता जाणन्याचं परिपूर्ण ज्ञान हवयं ते नाहीये आणि किंबहुना त्यामुळेचं आज
आज मनुष्य स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला तर , तेव्हा तो लगेचं परमेश्वराला शरण जातो आणि मला यातून बाहेर काढा अशी प्रार्थना देखील करतो , आणि एकदा संकटे दूर झाली की , तो लगेचं सर्वकाही विसरून पहिल्या कामांना पुन्हा लागतो म्हणजे देव फक्त संकटांपुरता अशी स्थिती आज देवाची झालेली आहे . आज जी तुमच्यावर संकटे येतात ना! या संकटांचं मूळ कारण तुमची कर्मे आहेत आणि म्हणून तुम्हाला संकटे , सांसारिकं दुःखे नको असतील तर कर्म चांगली करा कारण की , " जसे करावे , तसेची भरावे "
आज हिंसाचाराचा विषय आला की बरेच जण म्हणतात की , श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला लावलेचं ना!
आज मितीला मनुष्य सुशिक्षित होऊनही , अज्ञानीचं आहे , कारण योग्य काय आहे हे त्याला कळत नाहीये त्यामुळे हा हिंसाचार , व्याभिचार या समाजात वाढताना दिसत आहे . मनुष्याचे जीवन हे दरीवर तरणाऱ्या पुलाप्रमाने असते . जिथे पुलाच्या दोन्ही बाजूला क्रोध , माया , मोह , काम , वासना ह्यांनी भरलेली दरी आहे आणि पुलावरून सुख दुःखांचा वारा वाहत आहे आणि
अजुन हे देखील लक्षात ठेवा की , धोतराच्या झाडाला काटे नसले तरी धोतऱ्याच्या झाडाला येणारे फुलं हे विषारीचं असतं आणि गुलाबाच्या झाडाला कितीही काटे असले तरी ,
संकट रुपी काटा जरी ,
धसला तुझ्या जीवनरूपी देहात ,
तरी न घेता माघार ,
तू पूर्ण कर ,
तुझ्या सत्यतेचा आणि योग्य कर्माचा निर्धार .....
..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा