आज सकाळी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे एनकाउंटर झाल्याची बातमी आली आणि बातमीमुळे सगळ्यांनीच आनंद साजरा केला . काहींनी ढोल-ताशे वाजवले , फटाके फोडले , पेढे वाटले सर्व लोकांना न्याय मिळाल्याचा आनंद झाला आणि आत्तापर्यंत जे जे बलात्कार झालेले आहेत त्यातील आरोपींना देखील लवकरच किंबहुना अशाचं प्रकारची शिक्षा मिळावी म्हणून सर्वांनी मागणी केली . ती मागणी रास्त ही आहे . पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आज ह्या गुन्ह्याची फाईल
इथेच बंद झाली आणि आपलं कामही इथेच संपले . आता आपण उद्यापासून सगळेजण या सर्व घटना विसरून पुन्हा आपापल्या कामाला लागणार , पुन्हा आपली रोजची कामे , रोजच्या सवयी प्रमाणे जगण्यास सुरुवात करणार .
काय गेले आहे घडून ,
याचा नाही बोध घेत माणसाचे मन ,
पुन्हा आपल्या सवयीप्रमाणे ,
कार्य करते हे सतत .....
ह्या उक्तीप्रमाणे माणसाचे मन ह्या घडलेल्या घटनांवरून काही एक बोध घेणार नाही आणि नाही याआधी घेतला होता कारण जर घेतला असता तर अशा गोष्टींना आज आपल्याला सामोरे जावे लागलेचं नसते . मनुष्याला किंबहुना भारतीय माणसाची एक वाईट सवयचं आहे ती म्हणजे " तहान लागल्यावर विहीर खणणे "
गोष्ट घडून गेल्यावर ती नीट करण्याचा प्रयत्न करणे . पण ती घडूचं नये यासाठी तो प्रयत्न करताना दिसत नाहीये . आज प्रत्येकाला वाटते की , वाईट करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी पण हे करताना , हा विचार मांडताना आपण स्वतः कुठे चुकतो हे मात्र बघायला आपण तयार नाही होत आणि नाही त्यात बदल करायला .
आज इथल्या मनुष्याला वाटते कि कोणीतरी यावं , आणि आम्हाला हातावर उचलून घ्यावं आणि आम्हाला या दलदलीतून बाहेर काढाव
कारण आम्ही काही स्वतः बाहेर निघू शकत नाही . इतके आम्ही परावलंबी बनलेलो आहोत . आज प्रत्येक व्यक्ती स्वतःला हुशार समजते . मी जे करतोय ते योग्य आहे आणि बाकीचे सर्व काही चुकीचे . आम्ही बाकीच्या लोकांच्या वाईट कृत्यांना आळा घालू इच्छितो पण स्वतःच्याच दिखाऊपणावर आळा घालण्यास आम्ही तयार नाही आहोत . बाकीच्या लोकांच्या नजरा सुधाराव्यात असा आम्हांला वाटतं पण आमचे दिखाऊ आणि वाईट विचार हे आम्ही नियंत्रणात आणू इच्छित नाही . अरे " टाळी कधी एका हाताने वाजत नाही
आणि नाही एका तलवारीचा मोठा आवाज होतो " त्या दिवशी जे कृत्य घडलेले आहे ना! त्या कृत्याला जितकी ते बलात्कारी जबाबदार आहेत ना! तितकेच आपणही जबाबदार आहोत हे आपल्याला समजायला हवं . कारण आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली येथे जरा अतीच स्वातंत्र्य होत चाललो आहे . आणि त्यामुळेच आपल्याला चारित्रहिन , नीतिमत्ताहिन , वाईट गोष्टी करण्याची सवयच होऊन बसलेली आहे . ( सोशल मीडिया ) म्हणजेच सामाजिक माध्यमांवर स्वतःची

वेडीवाकडी , चित्रविचित्र ( फोटो ) चित्रे टाकणे , वाईट गोष्टी , वाईट विचार एकमेकांना पाठवणे , क्षणिक आनंदाच्या नावाखाली अश्लील चित्रफीत पाहणे अशा अनेक गोष्टी आजचा युवा नकळतपणे करत असतो आणि ह्याच असंख्य वाईट गोष्टींमुळे आपल्या समाजातील बहुतेक लोकांची किंबहुना समाजातील जवळजवळ सर्वच लोकांचे विचार वाईट व दूषित बनलेले आहेत . आज आपण जी समाजमाध्यमे वापरतोय ना त्यातून फक्त तुम्हाला २० टक्के चांगल्या गोष्टी मिळतात तर बाकीच्या ८० टक्के या वाईटच गोष्टी मिळत आहेत किंबहुना त्या आम्हाला बळजबरी दाखवल्या जात आहेत . आज मितीला गुगल सारख्या मोठ्या शोध वेबसाईटवर सर्वात जास्त अश्लील गोष्टी शोधल्या जातात असे त्यांच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलेले आहे . म्हणजेचं आपण ज्या गोष्टीला चांगल्या जीवनाचं अमृत मानत होतो त्याच गोष्टी आज विषारी साप बनून आपल्या भोवती विळखा घालून उभ्या आहेत .

पण का आपण ह्या वाईट गोष्टींच्या विळख्यात अडकत आहोत याचा विचार केलाय का? कोणी कधी? नसेलचं केला! तर याचं कारण आहे ते म्हणजे आजच्या तरुणांमध्ये चांगला आणि वाईट यांत फरक करण्याची क्षमता उरलेली नाहीये . आज मितिला फक्त आणि फक्त दिखाऊपणात जगण्याची सवय लोकांना लागलेली आहे आणि ही कशामुळे तर आजच्या शिक्षण पद्धतीमुळे .....
आज समाजातील जवळजवळ सर्वचं वाईट विचारांचे बनलेले आहेत . म्हणजेच गुन्हेगारांमध्ये आणि आपल्यामध्ये काही अंतर उरलेले नाहीये . हा फक्त त्यांच्या आणि आपल्यात फरक एवढाच आहे की त्यांनी ते वाईट विचार कृतीत आणले आणि आपण त्यांच्या एक पाऊल मागे आहोत आणि जर आपण आजही सावरलो नाही ना! तर उद्या त्यांच्यासारखीच गत आपली होणार आहे आणि त्याहून वाईट ह्या समाजाची .
त्यामुळे यातून सावरण्याची आणि समाज सुदृढ आणि चांगल्या विचारांचा बनवण्याची गरज आज मीतिला निर्माण झाली आहे . आज भारताला भारतातील पुरातन सुदृढ विचारांची , शिक्षण पद्धतीची आणि भारताच्या धर्मग्रंथांची खूपच आवश्यकता भासू लागली आहे आणि त्यामुळे आज आपण भारतीय पद्धतीने पोशाख , भाषा आणि वृत्ती ही स्वीकारायलाच हवी तेव्हाचं बदलेल इथल्या लोकांची प्रवृत्ती आणि बनेल आपला भारत सुदृढ आणि सुरक्षीत .....
..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा