नागरिकत्व ( एनआरसी आणि कॅब ) कायदा योग्य की अयोग्य ? .....
आपल्या देशात अशीही अनेक लोकं आहेत जी की , फक्त आणि फक्त दुसऱ्या समाजाविषयी , दुसऱ्या धर्माविषयी मनामध्ये असणाऱ्या विरोधी भावनेमुळे ह्या कायद्याला पाठिंबा किंवा विरोध करत आहेत . त्यांनीही संप्रदायाच्या दृष्टीने विचार न करता भारतीय म्हणून विचार करायला हवा
या कायद्याला नक्की असणारा विरोध कशामुळे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही काळ मागे जावे लागेल , जेव्हा देशामधील अनेक राज्यांमध्ये बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोक आल्यामुळे अनेक आंदोलने झाली होती आणि अजूनही चालू आहेत . ती आंदोलने सर्वांनाचं चांगल्या प्रकारे ज्ञात असतीलचं . ती आंदोलने का झालेली होती? तर , बाहेरच्या लोकांमुळे , आपल्या राज्यातील , आपल्या लोकांचे रोजगार कमी होतात . हे येणारे लोक दुसऱ्या संस्कृतीचे , दुसऱ्या भाषेचे असल्यामुळे , आपल्या भाषेवर आणि संस्कृती देखील त्यांचा परिणाम होतोच . म्हणून अनेक जण त्यांना विरोध करत होते आणि तो विरोध साहजिकचं प्रत्येकाचा असतोचं . यासंबंधीचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो , जे की , स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पूर्वेकडील राज्यांमध्ये विशेषतः आसाममध्ये इंग्रजांनी " बंगाली " ही बहुजनांची भाषा म्हणून आसामवर राज्यभाषा म्हणून लादण्यात आलेली होती आणि या बळजबरीने लादलेल्या भाषेमुळे आसामी लोकांच्या संस्कृतीवर , भाषेवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला होता . बंगाली भाषेच्या अतिक्रमणामुळे तेथील असामी या भाषेचे वर्चस्व हे जवळजवळ संपुष्टात येत चालले होते . जे की , स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये , आसामी भाषेला तिथंलची राजभाषा म्हणून दर्जा दिल्यानंतर थांबले . आज भाजपा सरकार हे दावा करत आहे की , बाहेरून आलेल्या लोकांना , त्यांच्यावर त्यांच्या देशात बहुजनांच्या धर्माकडून होत असलेल्या अन्याय अत्याचारामुळे आपल्या देशांमध्ये स्वीकारले जाणार आहे .
तर मग याच वेळेला भारत देशामध्ये बहुजनांची भाषा असणारी हिंदी भाषा ही इतर राज्यातील लोकांवर लादण्यात येते , तेव्हा याठिकाणी अप्रत्यक्षरीत्या बहुजन भाषिकांकडून होणाऱ्या अन्यायाकडे देखील केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवं . जर बाहेरच्या देशातील लोकांवर होणारा अन्याय हे सरकार इतक्या प्रखरतेने पाहत असेल , तर आपल्या देशातील नागरिकांवर अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या अन्यायाकडे देखील ह्या सरकारने तितक्याचं कटाक्षतेने लक्ष द्यायला हवं .
त्या दिवशी संसदेमध्ये नागरिकत्व कायद्या संदर्भातले बिल पास करण्यासाठी माननीय अमित शाह यांनी म्हटलं होतं की , या कायद्यामुळे देशातील घुसखोरांना या देशातून बाहेर काढण्यात येणार आहे आणि जे लोकं सांप्रदायिक कारणांमुळे २०१४ सालापूर्वी पाकिस्तान , अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमधून आलेले आहेत त्यांना या देशातील नागरिकता बहाल करण्यात येणार . पण इथे अजून एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे , आपल्या सरकारला प्रत्येकाच्या धर्माचीचं रक्षा करायची आहे तर , सरकारने आपल्या देशातील नागरिकांच्या धर्माची देखील रक्षा करायला हवी . कारण आपल्या देशामध्ये आजमितीला सरकारी आणि रेल्वेच्या नंतर , देशातील सर्वात जास्त जमीन जी कोणाकडे आहे ती , देशात असणाऱ्या चर्चंच्या ताब्यात आहे . असे चर्च जे या देशात राहून हिंदू , बौद्ध , शीख , जैन आणि मुस्लिम
आज सरकार जे एनआरसी आणि कॅब सारखे कायदे करत आहे यातून नक्कीचं ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहे त्यांना आधार मिळत असेल पण हे कायदे करण्याआधी देशाची जी वाईट स्थिती झालेली आहे त्यातून देशाला आधी सावरायला हवं आणि बाहेर काढायला हवं . आज अजून एक अशी सुद्धा भिती मनाला वाटते ती म्हणजे आजचे सरकार फक्त मतदारांची संख्या वाढवण्यासाठी तर हा प्रयत्न करतं नाहीयेना! अश्या अनेक बाबी आज या कायद्यामागे असू शकतात . भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या शेवटच्या भाषणात हा विचार मांडलेला होता की ,
आज देशाचा एक पाय आधीच खड्यात असताना , दुसरा पाय देखील खड्यात टाकण्यासाठी , हे सरकार विचार न करता कसे तयार झाले . या बाबींवर देखील आपण लक्ष द्यायला हवं . " मी कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा समर्थक नाहीये . मी फक्त या देशाचा सुजाण नागरिक म्हणून माझं आपल्या सरकारला एवढंच म्हणणं आहे की , पहिल्यांदा आपल्या आंतरिक बाबींवर लक्ष द्या , आपल्या देशांतर्गत असणाऱ्या समस्या आधी सोडवा मग बाहेरच्या समस्यांचा विचार करा . " फक्त निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा , देशाच्या हिताचा देखील विचार करावा जेणेकरून ह्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहील आणि त्यायोगे आपली विविधता आपली संस्कृती , भाषा ह्या सर्व अबाधित राहील आणि या देशातील नागरिक एक चांगले जीवन जगण्यासाठी समर्थ होतील याची देखील काळजी घ्यावी .



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा