लोकशाही ही लोक सहभागातून तसेच , लोकशाहीवादी देश हा सामाजिकरणांतूनचं टिकतो .....



             आज सकाळीचं मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की , भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन मर्यादित कंपनीचे सरकारच्या ताब्यात असणारे ५२% चे शेअर सरकार लिलावात काढणार आहे . म्हणजेचं कंपनीचे पूर्णपणे खासगीकरण होणार आहे . आज सद्यस्थितीला  आपल्या देशामध्ये तीन ते चार टक्के लोक हे सर्वात श्रीमंत आहेत . आपल्या देशात असणारे सर्व मोठाले व्यवसाय हे याच लोकांच्या ताब्यात आहेत . आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा ५० ते ६०  टक्के भाग याचं भांडवलशाही लोकांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे हे लोक आपल्या जवळील पैशाचा वापर करून सरकार आपल्या पद्धतीने चालवण्याचा बहुतांशी प्रयत्न करतात . आता तुम्हीचं विचार करा जर देशातील सर्व अर्थव्यवस्था ही खाजगी कंपन्यांच्या ताब्यात गेली तर , जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या देशात निवडून येणारे सरकार हे कोणासाठी काम करेल . याचा विचार आता तुम्हीचं करावा . आजमितीला ह्या देशातील लोकांना राजकीय स्वतंत्र तरी आहेत पण ह्या देशात सर्व खासगीकरण झाले ना! तर ह्या देशातील नागरिकांना फक्त गुलामासारखे जगावे लागेलं . तसा आज तो विचारांनी गुलाम झालेलाचं आहे .
          आज आपल्या देशात जे काही पक्ष आहेत हे सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे उपभोक्ते बनलेले आहेत . यांना फक्त सत्ता हवीयं दुसरं काहीच नकोय . देशातील लोकांच्या विकासासाठी ही सरकारी काहीही करत नाहीत कारण हे राज्यकर्ते लोकांच्या मतावर नाही तर भांडवलदारांच्या पैशाच्या ताकदीवर निवडून येतात आणि त्यामुळेचं
फक्त विकासाची दिखाऊ घोंगडी इथल्या सामान्य नागरिकांवर पांघरूण , विकासाचा ढोंगीपणा सत्तेत येणारी सरकारे करत आहेत .

          आज देशात होणारे खाजगीकरण म्हणजे " हातावर लाकूड टेकऊन सोनं पळवणे " अशीचं गत झालेली आहे . पण आपल्या देशातील जनता याचा कधीचं विचार करणार नाही . उद्या भारतात जेव्हा सर्व क्षेत्रात खासगीकरण होईल ना! तेव्हा देशात भरपूर पैसा असेल पण तो पैसा सामान्य नागरिकांकडे नसेल तर तो फक्त देशातील काही ठराविक लोकांकडेचं असेल . देशात मतदानाचा अधिकार असेल पण निवडून येणाऱ्या सरकारवर आपला कोणताही अधिकार नसेल . फक्त जन्माला यायचं , गुलामासारखे जगायचं आणि मरायचं एवढेचं काम या देशातील सामान्य नागरिकांच असेल .

कारण देशाचा कणा असणारी सर्वात महत्त्वाची क्षेत्र हीचं भांडवलदारांच्या ताब्यात जातील . ही पहिलीचं वेळ नाही की , आपल्या देशातील लोकं हे गुलाम बनले जातील . तर याआधीही आपला देश आपल्या देशातील स्वार्थी राज्यकर्त्यांमुळे भांडवलशाही कंपन्यांमुळे पारतंत्र्यात गेलेला होता . तरीही आपल्या देशातील राज्यकर्ते हे सत्तेच्या लालसेपोटी या देशाला पुन्हा पारतंत्र्यात टाकण्यास तयार आहेत .

          आज मितीला संरक्षण , शिक्षण , आरोग्य , शेती ह्या अति महत्त्वाच्या असणाऱ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण करण्यास सरकारने सुरवात केलेली आहे . सरकारच्या मते यामुळे आपल्या देशाचे आर्थिक क्षेत्रातील स्थान उंचावेल . पण पायाजवळ पाहणाऱ्या ह्या राज्यकर्त्यांना पुढे येणाऱ्या संकटांचा काहीही एक अंदाज नाहीये . कुठल्याही देशातील भांडवलदाराला देशहितापेक्षा , लोकहितापेक्षा स्वहित आधिकं प्रिय असते . त्यामुळे हे लोकं देशाचा नाही तर स्वतःच्याचं फायद्याचा नेहमी विचार करत असतात आणि वेळेला ते देशालाही विकू शकतात .

आज आपल्या देशातील राज्यकर्त्यांना वाटत असेल की , आपल्या सरकारी धरणाच्या भिंतीपुढे ह्या भांडवलशाहीच्या पाण्याची ताकद काय? पण एक गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे , जेव्हा धरणातलं पाणी त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त वाढेतं ना! तेव्हा ते पाणी धरण फोडून आपल्या मूळ जागेवर आल्याशिवाय राहत नाही आणि इथेही तेचं होणारं आहे . उलट इथे आपण धरणाचे दरवाज्यांचं नियंत्रणचं या भांडवलदारांच्या हातात सोपवतं चाललोय आणि म्हणून येणाऱ्या काळात धरणाची सरकारी भिंत फुटली ना! तर यात सरकारही बुडणार आहे आणि सामान्य नागरिकही मरणारं आहेत . त्यामुळे जर आपल्याला आपला देश अशा वाईट परिस्थितीतून वाचवायचा असेल ना! तर आता तरी आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि आपला देश वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात करावी लागणार आहे .






         ..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....