धर्म - आहे जगण्याचा खरा अर्थ .....




          आज बहुतेक लोकांचं असं म्हणणे आहे की , आज समाजात जी काही वाद चाललेले आहे , जी काही अराजकता माजलेली आहे त्याचे मूळ म्हणजे जगात असणाऱ्या " धर्म , जाती " आहेत . त्यामुळे आज अनेक लोकं म्हणतात की , जर समाजातील " धर्म " नष्ट झाला की , सर्व भेदभाव , दंगली नष्ट होतील . त्यामुळेचं आज आपण धर्म नष्ट व्हावा अशीही मागणी करतो , पण ही मागणी , हा विचार मुळातचं चुकीचा आहे . उलटं जेव्हा धर्म नष्ट होईल ना! तेव्हा उलट भांडणे , अत्याचार , गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढतील .
         धर्माची स्थापना ही सर्व भेद मिटवून , सर्व भूतलावर एकता पसरवण्यासाठी आणि मनुष्याच्या उत्कर्षासाठी करण्यात आली होती . पण आज धर्माच्या नावाखाली समाजाची पिळवणूक करणाऱ्या काही थोडक्या लोकांमुळे आपण संपूर्ण धर्मालाचं चुकीचे ठरवायला लागलो तर हा समाजाचा कुठले शहाणपण आहे ,

ही बाब म्हणजे अशी आहे की , उसाच्या फडात कोल्हे शिरले म्हणून संपूर्ण उसाच्या फडालाचं आग लावणे अशी गोष्ट झाली म्हणून  , जरी लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणून काय वाघाचे अस्तित्व झुगारून जमतं नाही .

           धर्माशिवाय मनुष्य समाज म्हणजे , फक्त प्राण्यांच्या कळपासारखा बनूनं राहीलं . जिथे कोणत्याही गोष्टीला मर्यादा नसतील .

जिथे फक्तं शाररिक सुखचं सर्वकाही मानले जाईल आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी कोणत्याही नात्यांची बंधने नसतीलं . असे प्राणी जीवन आपण धर्माशिवाय कंठीत करू आणि आज तसे जीवनं धर्माच्या नियमांना निषिद्ध मानणारे लोकं जगतंचं आहेत . आज जे देखील विकसित देश आहेत जिथे धर्माच्या नियमांचे अनुसरण केले जात नाहीये त्यांचे जीवन आज बऱ्यापैकी पशूंप्रमाने झालेले आहेचं , फक्त फरक एवढाचं आहे की , आज ह्या वाईट परिस्थितीला विकासाचे ढोंगी आवरण चढवले गेले आहे .

आज समाजात नशापान , मांसाहार , जुगार आणि व्याभिचार यांसारख्या वाईट गोष्टींनी थैमान घातलेले आहे आणि येणाऱ्या काळात तर प्रगतीच्या नावाखाली ह्या समाजात सर्वत्र पसरणार आहेत .
         धर्माशिवाय मनुष्य जीवन म्हणजे , बिना पावसाचा पावसाळा , बिनारंगाचा इंद्रधनुष्य आणि बिना पिकाची भूमी आहे .

धर्मामुळेचं जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो . धर्माशिवाय सर्व जीवन व्यर्थ आहे . पण चुकीच्या , अशास्वत गोष्टींनाचं आपल्या जीवनाचे खरे अस्तित्व मानून बसल्यामुळे आज माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षिला जात आहे . त्याला क्षणिक सुखाच्या खोट्या, आभासी पडद्यामुळे खऱ्या , शास्वत गोष्टी दिसूनचं येत नाहीये . त्याला खरे ज्ञान न झाल्यामुळे तो आज अमानुष वाईट कर्मे करण्यात गुंतलेला आहे , ज्यामुळे उद्या येणारे त्याचे व समाजाचे भविष्य अजून खालावलेल्या पातळीचे होणारं आहे . त्यामुळे असा वाईट आणि दिखाऊ भविष्यकाळ आपल्याला नको असेल , तर आज आपण आपल्या पायाजवळ न बघता समोर बघायला हवं आणि आपल्या बरोबर बाकीच्या मनुष्यांचे देखील धर्माच्या आधाराने कल्याण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे . जेणेकरून येणारा तुमचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आणि उत्तम असेल , म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही , आता तरी जागे व्हा आणि शाश्वत गोष्टींसाठी लढा अन् त्यांची प्राप्ती करून स्वतःचा आणि त्याचबरोबर सर्व मनुष्य समाजाचा देखील आध्यात्मिक उत्कर्ष करून घ्या .....



          ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....