आज प्रत्येक देश एकमेकांशी प्रत्येक बाबतीत स्पर्धा करत आहे . एकमेकांशी चढाओढ करत आहे . ती आर्थिक बाब असो वा राजकीय . आज जे देश प्रगतीच्या बाबतीत पुढे आहेत , ते उद्या , आज मागासलेल्या असणाऱ्या देशांच्या मागे येणारचं आहे , मग कितीही काही झालं तरी आणि आज जे देश मागे आहेत , ते उद्या , प्रगतीच्या आणि विकासाच्या पथावर पुढे जाणारचं आहेत , हे त्रिकाल सत्य आहे . कारण अधोगतीची , विकासाची परिस्थिती ही त्या देशातील असणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते आणि लोकांची मानसिकता ही एखाद्या ठराविक उच्च पातळी पर्यंत पोहोचली आणि तिला सुख , चैन ह्या गोष्टींची सवय लागली की , ती त्या परिस्थितीची भोगी बनते आणि त्या भौतिक सुखलाचं सर्वश्रेष्ठ मानून बसते त्यामुळे , त्या व्यक्तीचे हळू हळू पतन होत जाते .
ही गोष्ट म्हणजे अशी आहे की , श्रीमंत कुटुंबात जन्माला येणाऱ्या व्यक्तींपैकी , बहुतांश लोकं हे ज्याप्रमाणे त्यांच्या भौतिक परिस्थितीचा वापर हा स्वतःच्या उत्कर्षासाठी करून न घेता , फक्त त्याचा भौतिक सुखासाठी उपभोग घेतात त्याप्रमाणेचं
देशातील लोकांना सुख , चैन गोष्टींची ऊर्मी लागली की , देशाच्या प्रगतीला अधोगतीची वाळवी लागायला वेळ लागतं नाही .
म्हणून बहुतांश वेळा कुटुंबातील एक पिढी खूप कर्तृत्व करते तर , दुसरी पिढी काहीचं कर्तृत्व करत नाही आणि मग त्यांच्या पुढच्या म्हणजेचं तिसर्या पिढीला कर्तृत्व करण्याची आवश्यकता भासते . याचा अर्थ असा की , गरिबीची जाणीव असली की , प्रगतीची वाट शोधायला माणूस सुरुवात करतोचं . अशीचं परिस्थिती देशाबद्दलची असते . फक्त फरकं एवढाच असतो की , मनुष्यासाठी काळ कमी , तर देशासाठी काळ हा आधीकं लागतो .
म्हणून जोवर देश हा गरीब आहे , तोवर देशातील नागरिक विकासाची स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्याचा दिवसेंदिवस ,आधिकाधिक प्रयत्न करीत करत राहतात आणि एकदा परिस्थिती सुधारली की , हा प्रवास उलट्या दिशेने सुरू होतो , म्हणजे फिरणाऱ्या चाकासारखा म्हणून चाकाची उंची किती ठेवायची हे तुमच्या हातात आहे .
त्यामुळे जर देशाची प्रगती कायम ठेवायची असेल तर , चाकाची उंची एवढी ठेवा की , विकासाचा आलेख हा नेहमी चढताचं असेलं . म्हणजेचं देशातील लोकांना कधीचं थंड होऊन द्यायचे नाही , त्यांच्यामध्ये विकासाची आग ही कायम पेटती आणि नेहमी पुनर्जीवित होणारी असायला हवी . म्हणून त्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देणे आवश्यक आहे .
प्रत्येक देशात दोन प्रकारची माणसे असतात , एक थंड रक्ताची जी परिस्थितीनिरूप स्वतःमध्ये बदल करतात आणि दुसरी असतात गरम रक्ताची जी परिस्थितीला आपल्या परीने बदलतातं . थंड रक्ताचे जे लोक असतात ते म्हणजे भोगी असलेली पिढी असते आणि गरम रक्ताची लोकं ही एका क्रांतीची पहाट असतात . म्हणून जर
"
देशाच्या प्रगतीचा क्रांतीसुर्य जर नष्ट होऊन द्यायचा नसेल ना! तर देशातील नागरिकांच्या हृदयात क्रांतीची मशाल नेहमी पेटती ठेवायला हवी " . जन्माला येणाऱ्या मनुष्याला चैनीच्या गोष्टींची हाव कधीचं भासणार नाही आणि ते फक्त शंडासारखे बसणार नाही यासाठी आपण त्यांना नेहमी , आपले आपल्या ह्या देशासाठी काहीतरी देणे लागतं याची जाणीव करून द्यायला हवी . जर देशातील नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रवाद , देशप्रेम गच्च भरलेले असेल ना! तर येणारा प्रत्येक काळ हा आपल्या देशासाठी विकासाचं आणि प्रगतीचाचं असेल .
..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा