पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सात्विक , सर्वांगीण विकास हाचं खरा विकास .....

इमेज
                   आज जगभरामध्ये कोरोना नावाच्या एका मोठ्या संकटाने थैमान घातलेले आहे आणि दिवसेंदिवस ह्या संकटाची तीव्रता वाढतचं चाललेली आहे . आज बरेच जण असेही म्हणतं आहेत की , हा मनुष्यजातीचा शेवट आहे , हा जगाचा अंत आहे वगैरे वगैरे . पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे , हा आजार कितीही बळवला तरी देखील मनुष्यजातीला तो नष्ट करू शकणारं नाहीये पण हा , तो एक घाव मात्र नक्की घालून जाणार . म्हणून त्या घावाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व जगाने आणि जगातील सगळ्या नागरिकांनी एकत्रितरित्या प्रयत्न नक्कीचं व्हायला हवेतं .            आज आपण ज्या युगात जगतं आहोत ते आहे कलियुग आणि ह्या चालू असणाऱ्या कलियुगाचे सद्या पहिले चरण चालू आहे आणि अजून लाखो वर्षे जायची आहे त्यानंतर ह्या धरतीवरची वाईट मनुष्य जात नष्ट होईल आणि चांगले मनुष्य शिल्लक राहून एका नवीन युगाला म्हणजेचं सतयुगाला सुरुवात होईल . आज जगभर जो कोरोना विषाणू थैमान घालत आहे ना! तो फक्त आपल्या मनुष्यजातीला निसर्गाकडून दिली गेलेली एक छोटीसी ठेचं आहे . ...

येणारा काळ ... सुवर्णकाळ .....

इमेज
                  आज मितीला भारत हे जगामध्ये एक विकसनशील राष्ट्र आहे आणि आज जी जगात परिस्थिती चाललेली आहे त्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित आहे की , येणार काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ असणार आहे . भारताची संस्कृती , भारताची सभ्यता , भारताची परंपरा ह्या येणाऱ्या काळात , पुन्हा जगात सर्वोच्च पातळीवर येणारं आहेत . आता हळू हळू ह्या देशात असणारे विद्वान , हे मोठ्या प्रमाणात जगापुढे येतील आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्या देशाला पुन्हा सर्वोच्च स्थानावर घेऊन येतील . तरी देखील इथे जो प्रश्न उद्भवतो तो आहे की , हे येणारे सामर्थ्य , अमर्याद काळ टिकवावे कसे? ते कोणत्याही क्षेत्रातले असो , सामाजिक असो , आर्थिक असो , सांस्कृतिक असो वा शैक्षणिक पण आलेली प्रबलता टिकवणे हेचं गरजेचे आहे . यश मिळवणे सोप्पे असते , पण पुढे ते टिकवणे तितकेचं अवघड . म्हणून " ध्येय हे यशाचे नव्हे , तर मिळालेले यश टिकवण्याचे असायला हवे तेव्हाचं खरी प्रगती होईल . "            आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे " वेळ ही प्रत्येकाची येते ...

कर्म चांगली , तर नशीबही चांगलेच .....

इमेज
          आज एका दिशेला माणसे वेगवेगळ्या आजाराने मरतायेत आणि दुसऱ्या दिशेला अन्नपाण्यावाचून , एका बाजूला देशात असणाऱ्या बेरोजगारी , शैक्षणिक गोष्टी मधून निर्माण झालेल्या तणावामुळे , तर दुसऱ्या बाजूला मरतायेत ती गुन्हेगारी , वाईट भावनांवर नियंत्रण न राहिल्यामुळे . आज अश्या वाईट गोष्टींमुळे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुःख निर्माण होत आहे आणि जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला ह्या सर्व गोष्टी बघतो ना! तेव्हा आपण नरकात तर राहत नाहीये ना! असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही .           आज मनुष्याच्या जीवनाचा खरा अर्थ कुठेतरी हरवला आहे , आज मनुष्य त्याच्या जीवनाचे शाश्वत ध्येय विसरून बसला आहे . त्यामुळे त्याचे जीवन योग्य वळण घेण्याऐवजी वाईटचं रस्त्याकडे आकर्षित होत चालले आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे , म्हणजे आपण दिखाऊ विकासाच्या , प्रगतीच्या नावाखाली ज्या वाईट ,  अंधकारमय दरीमध्ये निघालो आहे ना! त्या दरीचे , आज आपल्याला जी परिस्थिती दिसतेय ते फक्त तोंड आहे आणि हळू हळू ही दरी आपल्याला अंधकाराच्या इतक्या खोल जगामध्ये घेऊन जाई...