सात्विक , सर्वांगीण विकास हाचं खरा विकास .....

       

           आज जगभरामध्ये कोरोना नावाच्या एका मोठ्या संकटाने थैमान घातलेले आहे आणि दिवसेंदिवस ह्या संकटाची तीव्रता वाढतचं चाललेली आहे . आज बरेच जण असेही म्हणतं आहेत की , हा मनुष्यजातीचा शेवट आहे , हा जगाचा अंत आहे वगैरे वगैरे . पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे , हा आजार कितीही बळवला तरी देखील मनुष्यजातीला तो नष्ट करू शकणारं नाहीये पण हा , तो एक घाव मात्र नक्की घालून जाणार . म्हणून त्या घावाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व जगाने आणि जगातील सगळ्या नागरिकांनी एकत्रितरित्या प्रयत्न नक्कीचं व्हायला हवेतं . 

          आज आपण ज्या युगात जगतं आहोत ते आहे कलियुग आणि ह्या चालू असणाऱ्या कलियुगाचे सद्या पहिले चरण चालू आहे आणि अजून लाखो वर्षे जायची आहे त्यानंतर ह्या धरतीवरची वाईट मनुष्य जात नष्ट होईल आणि चांगले मनुष्य शिल्लक राहून एका नवीन युगाला म्हणजेचं सतयुगाला सुरुवात होईल . आज जगभर जो कोरोना विषाणू थैमान घालत आहे ना! तो फक्त आपल्या मनुष्यजातीला निसर्गाकडून दिली गेलेली एक छोटीसी ठेचं आहे . जीच्यामुळे फक्त आपल्या शरीररुपी मनुष्यजातीच्या पायालाचं इजा झालेली आहे म्हणजेचं " अधू झालेली आहे पण नष्ट नाही " आणि म्हणून जर आपण यापुढेही आपली जगण्याची दिशा ही बदलली नाही ना! म्हणजे फक्त एकाच बाजूचा , एकाचं गोष्टीचा विचार आणि विकास करत राहिलो ना! तर येणार्‍या काळात यापेक्षाही वाईट दशा आपली झाल्याशिवाय राहणार नाही .         

              म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये , आज छोटा दगड पडला आहे , उद्या संकटांचा मोठा दगड आपल्या डोक्यात पडायच्या आधी आपण आपली जगण्याची दिशा बदलुया! म्हणजेचं फक्त आर्थिक दिशेचाचं विचार न करता आपण सामाजिक , आध्यात्मिक , नैतिक आणि नैसर्गिक मूल्यांचा देखील विचार आणि विकास करूयात म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती आपल्यावर ओढावणार नाही . ही बाब म्हणजे अशी आहे ,

 " धान्य वाळतं टाकलेल्या कागदाचा जर आपण एकचं कोपरा उचलला तर त्यावर असणारे धान्य हे जमिनीवर पडून विस्करलेचं जाणार आहे " आणि असेचं आज , आपण देशाचा विकास करताना करत आहोत म्हणून जर आपल्याला मनुष्यजातीचा खरंच विकास साधायचा असेल ना! तर आपण मनुष्याच्या जीवनरुपी कागदाचा एकचं कोपरा उचलून न धरता एका संगे सर्व कोपऱ्यांना एकत्र उचलायला हवे तेव्हाचं योग्य आणि सात्विक विकास ह्या देशाचा आणि जगाचा होईल आणि सर्व जग सुखी , समाधानी , सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवन जगेल .....  







          ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....