ज्यावेळेला घरातील सर्वोच्च स्थानावर असणारी व्यक्ती तिचे कर्तव्य व्यवस्थित बजावतं नाही , त्यावेळेला जशी कुटुंबव्यवस्था ढासळते ना! तसेचं ज्यावेळेला एकमेकांच्या सहकार्यावर आधारितं असणाऱ्या ह्या समाजव्यवस्थेतील एखादा घटक , त्याचे कर्तव्य निस्वार्थीपणे आणि निष्ठेने जेव्हा बजावतं नाही ना! त्यावेळेला बाकीचा समाज गोंधळला जाऊन समाजात अराजकता माजली जाते आणि सामाजिक व्यवस्था ही ढासळली जाते आणि असा समाज सजीवमात्रांसाठी राहण्यास अयोग्य बनतो . आज मितिला ह्या जगामध्ये अराजकतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसतचं आहे कारण आज अनेकजण त्यांना दिलेली काम योग्यरीत्या आणि जनतेशी निष्ठा ठेऊन पार पाडण्यापेक्षा , आपण करतं असणाऱ्या कामाचा , आपल्या स्वार्थासाठी कसा जास्तीत जास्त वापर करून घेता येईल याचाचं विचार करतो आहे आणि ह्या समाजातील घटकांनी त्यांचे असणारे काम नीटं न केल्यामुळे , समाजातील बाकीच्या घटकांना त्यांचे आधिकार प्राप्त करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था हाती घ्यावी लागते आणि त्यातूनचं कधी हिंसाचार घडून देशाच्या संविधानिक व्यवस्थेची पायमल्लीही होते .

आजच्या युगामध्ये समाजव्यवस्थेमध्ये सर्वत्र गोंधळ निर्माण झालेला आहे याचे कारण अनेक जण स्वार्थी झालेले आहे आणि अनेकजण आज हे फक्त काम , क्रोध , मद , मोह , मत्सर या भौतिक गोष्टींवरचं उभे आहेत आणि त्यांची पूर्तता करण्यासाठीचं जगतं आहे , त्यामुळे आज बहुतांश ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणा हा दिसणारचं नाही ज्यामुळे आज समाजात कलह हा वाढतचं चाललेला आहे .
आज ह्या जगात बहुतेकं लोकं या जगातील इतर जिवांचा , इतर लोकांचा स्वतःसाठी कसा वापर करून घेता येईल , याचाचं प्रयत्न करताना दिसतील आणि ह्या गोष्टीमुळे आजचा हा समाज अस्ताव्यस्त , विस्कुटलेला आपल्याला दिसतो . आजची परिस्थिती त्यामानाने बरी आहे पण भविष्यात येणारी परिस्थिती मात्र खूप वाईट असणार आहे कारण भविष्यात मनुष्याचे जीवन हे पशुंसारखेचं झालेले असेल , जर का आपण आज सावरलो नाही तर .
पशुंसारखे म्हणजेचं जिथे फक्तं उपभोगाला महत्त्व दिलेले असेल , जीवनाच्या परमसत्याची पायमल्ली जिथे झालेली असेल त्यापेक्षा मनुष्याने ती केलेली असेल . ज्यामुळे मनुष्य हा पशूंसारखा अन्न , जागा , सुरक्षा आणि कामवासना यांचाच विचार करतं असेल आणि त्यांच्याचं पूर्ततेसाठी प्रयत्न . ह्या गोष्टींची तुम्हाला गरजचं नाहीये असे मी बोलतं नाही पण ह्या गोष्टी एका मर्यादेत असायला पाहिजेतं पण आज मनुष्य ह्याचं गोष्टींना जीवनाचे परम सत्य मानून बसलेला आहे ज्यामुळे तो खऱ्या जिवनाच्या सत्यापासून दुरावतं चाललेला आहे . त्यामुळे आज मनुष्याला परम दिव्य ज्ञानाची प्राप्ती करून देणे खूप गरजेचे झालेले आहे . "
खरी प्रगती ही भौतिकता दाखवण्यातं नसून , अध्यात्मिक , दैवी गुणांना कमवण्यात आहे " हे मनुष्याने समजून घ्यायला हवे आणि ह्या आध्यात्मिक , दैवी शक्तींची तेव्हाचं आपल्याला प्राप्ती होईल जेव्हा आपण फक्तं स्वतःचा नाही , तर संपूर्ण मनुष्य समाजाचा विचार करायला शिकू .
ज्याप्रमाणे
" शेतीला सर्वत्र समान पाणी दिल्यावर जमिनीमध्ये जसे सगळीकडे चांगले पीकं येते ना! तसेचं देशातील योग्य गोष्टी सगळ्या लोकांकडे सारख्या प्रमाणात पोहचल्या तरचं सर्व लोकांचा विकास होईल आणि त्याचबरोबर देशाचाही "
त्याचबरोबर
" जसे एखाद्या बाटलीमध्ये पाणी ओतल्यावर , ती बाटली जशी खालून वर भरते ना! तसेचं जर तुम्हाला देशाची प्रगती करावयाची असेल ना! तर विकासाचे पाणी आधी जो वर्ग देशातं आधीकं आहे , जो वर्ग ह्या देशातील मोठा उत्पादक अन् उपभोक्ता आहे आणि त्याचं बरोबर ज्यांना विकासाची आधीकं प्रमाणात गरज आहे , त्या वर्गाला आधी विकासाचे पाणी जायला हवे तेव्हाचं देशाची खरी परिपूर्ण प्रगती होईल आणि जर तुम्ही विकासाचे पाणी फक्त वरच्याचं गटाला दिले तर जेव्हाही ह्या देशावर कोणतेही संकट येईल तेव्हा हा देश जशी पाण्याची बाटली , तिच्या फक्तं वरच्याचं पातळीवर पाणी असल्यावर , वाऱ्याच्या संथ झुळुकानेही कोसळते ना! तसाचं हा देशही कोलमडेल " , म्हणून आता तरी जागे व्हा आणि निस्वार्थी , सत्यतेने आणि प्रामाणिकपणे सर्व सजीवांशी वागा .....
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....
Kadak 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद भावा
हटवाVyavsthit Mandle ahe.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा