संवर्धन आणि सांगड हीचं आहेत भौतिक गर्तेतून सुटण्याचे एकमेव साधन .....

           

           माझ्या मनात नेहमी एक विचार येतो की , आपल्या पूर्वजांकडे आपल्याहून अधिकं ज्ञान होते , त्यांची असणारी व्यवस्था ही आपल्याहूनही अधिकं प्रगत होती , 


 पण मग असं कोणते वादळ आले , असे कोणते कारण होते की , ज्यामुळे त्या वेळेच्या ज्ञानाचा आणि आपला असणारा संपर्क हा थंड झाला , तुटला गेला? असा प्रश्न मला नेहमी पडतो , पण आज त्या प्रश्नाचे उत्तर उलगडल्यासारखं मला वाटतंय , ते उत्तर म्हणजे , नवीन विचार अथवा नवीन जीवन जगण्याची शैली , पद्धती . हिचं ती गोष्ट जी कारणीभूत असते , प्रत्येक युगात बदल घडवण्याला आणि हा होणारा बदल हळूवार आणि अप्रत्यक्ष असतो त्यामुळे हा होणारा बदल लवकर कुणाच्याही लक्षात येत नाही . ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे मन काही ठराविक काळानंतर एका गोष्टीवरून उडून दुसऱ्या गोष्टीवर जाऊन बसते , तसेच होते ह्या समाजाचेही . 


            एका गोष्टीवरून मन उडून हळू हळू दुसऱ्या गोष्टीवर रमू लागले की , तसे पहिल्या गोष्टीबाबत असणारे आपले ज्ञान हळूहळू नष्ट होतं जाते . " जसे धार न लावलेल्या हत्याराचे आयुष्य गंज खाऊन टाकतो तसेचं वारंवारता नसलेल्या ज्ञानाची गंगा काळ गिळंकृत करून टाकतो " . 

            कधी कधी वाटते की , ज्याप्रमाणे प्राणी चार गोष्टींच्या पुढे विचार करू शकत नाही (काही अपवाद आहेत) त्याप्रमाणे मनुष्याचे मनही काही ठराविक अंतरावर जाऊन थांबत नाही ना? 


 " ज्याप्रमाणे समुद्राची लाट किनाऱ्यावर येऊन परत समुद्राच्या मूळ साठ्यात निघून जाते त्याचंप्रमाणे मनुष्याचे मनही काही काळाने त्याच्या पहिल्या स्थानाकडे निघून तर जात नाही ना? "  कारण आपल्या पूर्वजांची समृद्धी ही आपल्या काळाहून अधिक असूनही , प्रगतीच्या बाबतीत ते एवढे पुढारलेले असूनही , आजही आपण त्यांच्या त्याचं गोष्टींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत , ज्याठिकाणी आपले पूर्वज कधीचं पोहचलेले होते . याचा अर्थ आपण त्या चेंडूप्रमाणे आहोत ..... 


 जो की , जमिनीवर आदळला की , आकाशात भरारी घेतो खरा , पण पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी घेण्यासाठी त्याला जमिनीवरचं कोसळावे लागते . म्हणजेच थोडक्यात प्राचीन काळातील प्रगतीला कारणीभूत असणाऱ्या कारणांचे आपण संपूर्ण संवर्धन न केल्यामुळे तिचं कारणे काही काळाने आपल्या प्रगतशील सभ्यतेच्या अधोगतीस कारणीभूत ठरली आणि त्यामुळे काळाच्या मर्यादेत आपण पूर्णपणे फसून त्याचं त्याचं गोष्टी पुन्हा पुन्हा करतोय हा फक्तं त्या गोष्टी अमलात आणण्याची पद्धत मात्र तेवढी बदलतोय . पण जर आपल्याला या गर्तेतून बाहेर निघायचे असेल ना तर ते टप्प्याटप्प्यातूनचं निघावे लागणार आहे आणि हे टप्पे आहेत संवर्धनाचे आणि सांगड घालण्याचे .

संवर्धन कशाचे तर प्राचीन इतिहासाचे अन् प्राचीन गोष्टींचे आणि सांगड ही प्राचीन ज्ञानाची आणि आजच्या आधुनिक विज्ञानाची . हे टप्पे म्हणजेेचं पायऱ्या आहेत ह्या काळाच्या गर्तेतून सुटण्याच्या आणि ह्या ब्रम्हांडाला जाणून घेण्याच्या " .  

               त्याचबरोबर अध्यात्मिक विज्ञानात , जे काळाचे चार भाग पाडले गेलेले आहेत जर आपण त्यांना एखाद्या रबरी चेंडूप्रमाणे मानले तर , 


 आपल्या लक्षात येईल की , ताकतीनिशी टाकलेल्या चेंडूचा सुरुवातीचा टप्पा हा अधिक उंच आणि अधिकं गतिशील असतो , तसेच ह्या टप्प्याची जमिनीवर येण्याची वेळही अधिक असते म्हणजेचं पहिला टप्पा हा सतयुग आहे , ज्यामध्ये ज्ञानाची उंची , प्रगतीचा आणि विकासाचा वेग हा अधिकं तसेच ही समृद्धी टिकण्याचा काळ देखील मोठा होता . जसे चेंडूचे टप्पे पुढेपुढे जातील तसेच त्रेतायुग , द्वापारयुग आणि कलियुग ही सर्व युगे पुढे सरकत राहतात आणि ह्या काळरुपी चेंडूला पुन्हा एकदा गती मिळते ती कलियुगाच्या शेवटच्या काळात  म्हणून जर या खेळातून आपल्या मानवजातीला बाहेर पडायचे असेल ना! तर , जे ही प्राचीन ज्ञान उरलेले आहे त्याचे संवर्धन करून आणि त्यायोगे या चारही युगांची सांगड घालून या भौतिक गर्तेतून आपल्याला सुटता येईल .   






    ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

  1. ओंकार डुंबरे--संवर्धन आणि सांगड अतिशय सुंदर पद्धतीने पूर्वीचा आणि आताच्या जगाची आणि युगाची माहित चित्रासह आपण आपल्या लेखातून दिली आहे.. अभिनंदन💐💐💐
    राजेश साबळे,ओतूरकर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....