भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....
आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन चालू आहेत . ही आंदोलन शेतकी क्षेत्रांमध्ये होणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत . आज देशातील अनेक क्षेत्रांमध्ये सरकार खाजगीकरण आणत चालले आहे . सरकारचे म्हणणे आहे की , खाजगीकरणामुळे देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये होणारे गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल आणि त्याद्वारे त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवंतंत्राचा वापर होईल आणि त्याचबरोबर त्या क्षेत्राचा विकास देखील होईल . हो नक्कीचं भांडवलशाहीमुळे देशात असणाऱ्या विविध क्षेत्रातील लावले जाणारे पैशाचे प्रमाण हे नक्कीचं वाढेल आणि त्यातून त्या क्षेत्राचा काहीकाळ भपकेबाज विकास देखील होईल पण ह्या झालेल्या विकास कामांना वाली तर काही ठराविक लोकचं असतील ना! असे लोक ज्यांना फक्त स्वफायदा महत्त्वाचा आहे आणि अशा लोकांमुळे , देशात नक्कीचं काही काळ विकास दिसेल पण पुढे हळूहळू ह्या खाजगीकरणाचे वाईट परिणाम देशाला एका युद्धाच्या मैदानात आणून सोडतील , असे युद्ध जे देशात तयार झालेल्या उच्च आणि कनिष्ठ या दोन वर्गांमध्ये लढले गेलेले असेल ज्यामुळे देशाचे फक्त आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक , शैक्षणिक , सामाजिक आणि शेतकी आदी सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल .
आज आपल्या देशातील ४० ते ५० टक्के लोकसंख्या ही शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून आहे . आपल्या देशातील ३० ते ४० कोटी लोकांकडे स्वतःच्या मालकीचे असणारे घर इतकीचं जमीन आहे तर काही लोकांकडे तेवढेही नाही . या सर्व लोकांचे आर्थिक उत्पन्न हे त्यांच्या रोजच्या कामावर आणि मजुरीवरचं अवलंबून आहे आणि आता थोड्याशा जास्त फायद्यासाठी देशात वाढवल्या जाणाऱ्या खाजगीकरणामुळे अश्या लोकांचे कमावण्याचे हे एकमेव साधनही त्यांच्या हातून सुटून जाणार म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाचं .
पहिली बाब म्हणजे लोकसंख्या जास्त असलेल्या प्रदेशात अथवा देशात यांत्रिकीकरण आणणे म्हणजे तळ्याशेजारी विहीर उकरणे , असेच म्हणता येईल ,
कारण भारतासारख्या लोकसंख्येने पुढारलेल्या देशात काही थोड्या काळाच्या फायद्यासाठी यांत्रिकीकरण आणणे म्हणजे देशातील तरुणांना " खायला कहार आणि भुईला भार " बनवण्यासारखेचं आहे कारण हाताला काम नसले की डोक्यात खराब विचार यायला वेळ लागत नाही . यातच दुसरी बाब म्हणजे बेरोजगार असणाऱ्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज ही सर्व सरकारला स्वतः पूर्ण करावी लागेल आणि यासाठी लागणारा पैसा हा देशातील मोठ्या उद्योगपतींकडूनचं वसूल केला जाईल म्हणजेच थोडक्यात आज वाचवलेल्या एक रुपयाला उद्या दोन रुपयांचा दंड भरावा लागेल .
आज शेतीसारख्या प्राथमिक क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण वाढत चालले आहे . आज शेतीची छोट्यात छोटी कामे यंत्राच्या साह्याने केली जात आहेत . अवघड असणाऱ्या कामांसाठी यंत्राचा वापर करणे अगदी योग्यचं आहे , पण आजमितीला आपण फक्त पैसे वाचवण्यासाठी सोपी असणारी कामे देखील यंत्राच्या साहाय्याने करू लागलो आहोत . त्यामुळे शेती कामावर अवलंबून असणाऱ्या मजुरांचा शेतीतील रोजगार हळूहळू कमी होत चालला आहे आणि शहरांमध्येही यांत्रिकीकरणामुळे रोजगाराची हमी दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांची अवस्था नाही घरचा , नाही घाटाचा असणाऱ्या व्यक्तीसारखी झालेली आहे . ह्या झालेल्या लोकांच्या विचित्र अवस्थेमुळे देश लवकरचं लाल क्रांतीच्या मैदानात उतरलेला असेल .
जे की आज आपल्याला जाणवत नाहीये पण येत्या काळात नक्कीच दिसेल .
१९९१ साली देशातील मजुरांना २३० दिवस काम मिळत होते आज त्याचे प्रमाण घटत चालले आहे , आजमितीला हे प्रमाण ८० ते ९० दिवसांवर आलेले आहे आणि दिवसेंदिवस हे प्रमाण अधिक घटत चालले आहे . हे आकडे असेही दर्शवतात की लोक शारीरिक कष्टप्रद जीवनाकडून बौद्धिक कष्टप्रिय जीवनाकडे वाटचाल करत आहेत पण ही याची एक बाजू निशाणी होऊ शकते . पण त्याचबरोबर लोकांच्या वाढणाऱ्या भौतिक सुखउपभोगी गरजा आणि त्या गरजा प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला उतरणारे लोकं . यामुळे आपण बौद्धिक शक्तीद्वारे केलेली भौतिक प्रगती ही खरंच योग्य असेल का? असाही प्रश्न याठिकाणी निर्माण होतो . कारण कल्की विचारांच्या संपर्कात आलेले आपण लोकं देशाला एका भौतिक स्पर्धेत , भौतिक सुखभोगी गोष्टींद्वारे सर्वोच्च ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सर्वोच्च ठिकाण फक्त आणि फक्त पैसा ह्या गोष्टीवरचं अवलंबलेले आहे . त्यामुळे फक्तं भौतिक प्रगती करून आपण नक्कीचं काही काळ जगात महासत्ता म्हणून राहू . पण आपल्याकडून इतर देशांनी काहीतरी आदर्श घ्यावा ह्या पातळीचे आपण असू का? याचाही विचार देशाच्या सर्वोच्च विकासात होणे गरजेचे आहे . ही झाली आध्यात्मिक विकासाची बाब , जी की देशातील ७० टक्के लोकांना मान्य नाही . पण त्यांना मी सांगू इच्छितो की , देशात होणाऱ्या एकतर्फी प्रगतीमुळे लवकरचं देशात मोठमोठाली आंदोलन उभे राहतील , देशातील लोक लवकरच वेगवेगळ्या गटांत विभागले जातील ,
मार्क्सवादी , साम्यवादी विचारांचे लोक या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवतील , आणि ही सरकारच्या आजच्या एका चुकीमुळे निर्माण झालेली आंदोलने सरकारला दाबून टाकणे खूप अवघड होऊन जाईल आणि आजच्या आपल्या चुकांमुळे भौतिक सुखांसाठी वेडे झालेली राष्ट्राची पुढची पिढी देशाची पुन्हा एकदा विभागणी करायला देखील पुढे मागे पाहणार नाही . म्हणून ह्या गोष्टीचा खरंच आज , विचार होणे गरजेचे आहे . आपण आज करत असलेला विकास खरंच समांतर आहे का? तो सर्वांना संगे घेऊन चालणारा आहे का? आणि मुख्यतः देशातील तरुणांना एक चांगला , उत्तम विचारी मार्ग देणारा आहे का? याचा विचार आधी होणे गरजेचे आहे .
त्यामुळे जर करायचाचं असेल तर देशामध्ये आधी आध्यात्मिक शिक्षणाचा विकास करावा ज्यामुळे ह्या देशातील तरुण हे निस्वार्थी वृत्तीचे , सुदृढ देहाचे आणि बलशाली विचाराचे असतील . जे की ह्या राष्ट्रालाचं नव्हे तर अवघ्या विश्वाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवतील आणि आपल्या देशाला पुन्हा एकदा जगात वंदनीय आणि गुरुभाव प्रदान करतील .
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....






Agreed, Education must be revised keeping spirituality at core.
उत्तर द्याहटवाहो बरोबर सर
हटवा