नैतिक मूल्यांचा ऱ्हास , तर देशाचा सर्वनाश .....
गेल्या दोन आठवड्यात एक बातमी मोठ्या वेगाने पसरत होती , ती म्हणजे उत्तर प्रदेश सरकारने अश्लिल चित्रपट असणाऱ्या साईट्सवर घातलेली बंदी . लोकांच्या भावना उसळायला लावणाऱ्या ह्या वेबसाईट्सवर सरकारने घातलेली बंदी एकदम योग्यचं आहे . पण इथे ह्या ठिकाणी एक विचार मनात आल्याशिवाय राहत नाही , तो म्हणजे हे केले गेलेले उपाय फक्त वरच्या वर तर नाही ना! थोडक्यात एखाद्या शहराला जोडणारा मुख्य रस्ता जरी बंद केला तरी तिकडे जाणारे कच्चे रस्ते चालूचं असले तर काय उपयोग अर्थात आपल्याकडील एका म्हणी प्रमाणे " इच्छा असेल तर मार्ग सापडेल " ज्याच्या मनामध्ये अश्लील बघण्याचे , अश्लीलता उपभोगण्याचे विचार आहेत इच्छा आहेत तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने ह्या गोष्टीकडे जाणारचं आहे ना! म्हणून फक्त वरच्या वर उपाय करून नाही ,
तर इच्छेला उत्पन्न करणाऱ्या कारणांवर आपल्याला घाव घालावा लागेल तेव्हाचं आपल्याला देशात वाढत चाललेल्या बलात्कार , अनैतिक संबंध आणि त्यातून फोफपनारी गुन्हेगारी ह्या गोष्टींवर कायमस्वरूपी बंदी घालता येईल . २०१७-१८ मध्येही केंद्र सरकारने अनेक अश्लील वेबसाइट्सवर बंदी आणली होती तरी देखील अश्लीलता बघणार्यांची , बलात्कार करणाऱ्यांची तसेचं अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाहीये . उलट हे प्रमाण दिवसेंदिवस आधिकं वाढतचं चाललेले आहे . आज भारतामध्ये दिवसाला ४००-४५० च्यावर बलात्कारी घटनांच्या नोंदी होतात , ज्यांच्या नोंदी होत नाहीत त्यांची संख्या तर वेगळीचं त्याचंबरोबर अनैतिक संबंधासारख्या दुष्कृत्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे . देशात वाढत चाललेल्या चंगळवादामुळे आणि भौतिकप्रगतीच्या भुरक्या पडद्यामुळे ह्या घटना मोठ्या प्रमाणावर आपल्या अवतीभोवती वाढताना आपल्याला दिसत आहेत आणि आपणही हळूहळू त्या घटनांचा भाग कसा बनत चाललो आहोत हे आपल्यालाही कळतं नाहीये .
ह्या ठिकाणी एक विचार करण्यासारखी बाब आहे ती म्हणजे " भारतासारख्या बहुतेक विकसनशील देशांतील बलात्कारांची तीव्रता ही विकसित देशांतील बलात्कारांच्या तीव्रतेपेक्षा आधिकं आहे " याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात कमी असणारी अनैतिक संबंधांची तीव्रता .
आज जी राष्ट्र आपल्याला विकसित दिसतात त्यातील बहुतेक राष्ट्रांमध्ये अनैतिक संबंधांचे प्रमाण हे अधिकचं सापडेल . अर्थात या पुरुषांचे शील आणि स्त्रियांचे पावित्र्य पूर्णपणे लयाला गेलेले आहे तेथील समाज हा दिसताना जरी खूप उच्च शिक्षित आणि विकसित दिसत असला तरी तो मोठ्या प्रमाणावर विचारांद्वारे आणि सामाजिक वर्तवणूकीद्वारे पूर्णपणे पतीत झालेला आहे . पण भौतिक प्रगतीच्या घोंगडीने स्वतःला झाकून घेतलेला हा समाज , स्वतःच्या देशातील हीन समस्यांचे दर्शन , त्या मार्गावर चालणाऱ्या इतर देशांना होऊ देत नाही , कधी ते दर्शन झाले तरी भौतिक भोगी प्रगतीच्या अंधकारात रमलेले अंध लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि ते वाक्य सत्यचं आहे ,
" उंच इमारतीचा पायाही , खोलचं असतो " तसेच उच्चभू समाजाचाही पतन बिंदू हा तितकाचं पतीत असतो "
आजची भोगी भौतिक प्रगतीचं ह्या सर्वाचे मूळ आहे ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झाला आणि देशादेशांमध्ये अशा वाईट घटनांची लाट येत गेली . अशा पतीत , क्लेशदायक घटना ज्यामध्ये कशाचीही मर्यादा नाही , नाही वयाची ना नात्याची , एवढेच नाही तर नाही पशुपक्षीप्राण्यांची .
अश्या विचित्र घटनांनी आज आपला देश ग्रासलेला आहे , पोखरलेला आहे . ह्या सर्व चित्रविचित्र गोष्टींमध्ये जगात वाईट गोष्टींसाठी वाईट लोकांकडून वापरण्यात येणाऱ्या समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वाटा आहे , समाज माध्यमांमुळे कामे नक्कीचं लवकर पार पडू लागली पण तितक्याच वेगाने समाजाचे पतनही होऊ लागले , प्रगतीचा हा आलेख चढताना आपण एक गोष्ट नक्कीचं विसरलो ती म्हणजे , " जी हवा सुगंधाला वाहून आणते ती दुर्गंधालाही वाहून आणू शकते " . देशात घडणाऱ्या बलात्काराच्या आणि तत्संबंधीच्या घटनांच्या मागे जवळजवळ ८० टक्के ह्याचं समाज माध्यमांचा न दिसणारा हात आहे , ज्याच्याद्वारे निर्बंध नसणाऱ्या अनेक वाईट गोष्टी समाजातील व्यक्तींपर्यंत पोहचतात . समाज माध्यमांचा शोध लागला आणि जेव्हापासून पैसे कमावण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला , तसे देशातील तसेच जगातील ,
योग्य शिक्षणाअभावी असंयमी राहीलेल्या लोकांमुळे बलात्कारांचे , अनैतिक संबंधांचे प्रमाणही वाढायला लागले . आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे .
मी वर म्हटल्याप्रमाणे , भारतात अनैतिक संबंधांपेक्षा बलात्कारी घटनांची तीव्रता अधिक आहे . याचे मुख्य कारण म्हणजे समाज माध्यमांचा स्री पुरुषांकडून करण्यात येणारा असमान वापर भारतातील ६७ टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतात , तर भारतातील फक्त ३३ टक्के स्त्रिया इंटरनेटचा वापर करतात असे भारतीय इंटरनेट व मोबाईल संघटनेच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे .
याचा अर्थ वैयक्तिक पातळीवरील सामाजिक माध्यमांचे वाढते प्रमाण हे नैतिक मूल्यांचा ऱ्हास करण्यास अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहेत . " वाढते अनैतिक संबंध , हे विकसित समाजाचे लक्षण आहे " असे देशातील तसेच जगातील काही नीतिभ्रष्ट लोक बोलायला देखील पुढे मागे बघत नाही . म्हणून खरंच देशाला ह्या बलात्कारासारख्या , अनैतिक संबंधांसारख्या कर्करोगातून वाचवायचे असेल देशातील स्रीयांना देशातील तरुणांना ह्या कालसर्पाच्या वेढ्यातून सोडवायचे असेल ना! तर आज आपण , आजच्या नव्या पिढीला चारित्र्यवानतेचे , नीतिमत्तेचे , नैतिकतेचे , अध्यात्माचे शिक्षण आणि संस्कार द्यायला हवेत ज्यायोगे देशातील तरुण-तरुणींनींच्या हातात असणाऱ्या ताकदीचा संयमाने आणि योग्य कार्यासाठीचं वापर करता येईल . " उत्कट भावनेमुळे नाहीतर , उत्तम विचार शक्तीच्या आधारे कार्य करायला आजचे युवा-युवती शिकतील . तेव्हाचं ह्या देशातील कुसंस्कृत गोष्टींचे प्रमाण कमी होईल आणि देशाचा सात्विक , सर्वांगीण आणि परिपूर्ण विकास होईल .
..... वंदे मातरम ... जय हिंद ... जय भारत ....





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा