संस्कृतीशी जोडूनी नाळ , साधूया विश्वाचा विकास .....
आज जगभरामध्ये आपण बघत असाल की , मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य टंचाई निर्माण झालेली आहे . जमिनीवरील पाण्याची पातळी दिवसेदिवस ढासळत चाललेली आहे . जमिनीची उर्वरकता रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे नष्ट होत आहे . भारतातील शेतीयोग्य जमीनीपैकी सुमारे ४० टक्के जमीन रासायनिक खतांच्या अति वापरामुळे नापीक झालेली आहे . भारतातील अनेक भागांमध्ये जमिनीतील भूगर्भातील पातळी पूर्णपणे खालावलेली आहे . चारशे ते पाचशे फूट खोल कूपनलिका घेऊन देखील आज पाणी लागत नाहीये . आधुनिक अवजारांच्या वापरामुळे जमीन दिवसेंदिवस कडक होत चाललेली आहे आणि त्यात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव आणि गांडूळे दिवसेंदिवस नाहीसे होत आहेत . ज्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा नाहीसा झालेला आहे आणि ह्याचं गोष्टीमुळे जमिनीतील पोषकद्रव्य पिकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचतच नाहीत .
ज्यामुळे आपण करतं असणारी आजची शेती ही एकप्रकारे कुंड्यांमधील किंवा एका सिमेंटच्या हौदात करत असणाऱ्या शेतीसारखी झालेल आहे . ज्यात त्या कुंडीत किंवा त्या सिमेंटच्या हौदात असणाऱ्या तेवढ्याच मातीत आपण वरतून रासायनिक खते टाकून फुलझाडे बहरवत असल्यासारखे आहे आणि ह्याचं कारणाने जगामध्ये निर्माण होत असणाऱ्या अन्नटंचाईमुळे लोक फक्त आणि फक्तं आज व्यापारी पिके घेताना दिसत आहेत त्यामुळे पोषणयुक्त आहाराची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे . ज्याप्रमाणे दुष्काळात रोज कोंडा खावा लागतो , त्याप्रमाणेच आज मितीला देशातील तसेच जगातील गरीब व्यक्ती आणि त्याचबरोबर जिभेचे चोचले पुरवणाऱ्या श्रीमंत व्यक्ती पोषणविरहित असणारे आणि मुळतत्वे नसणारे आरोग्यहीन असे अन्न रोज खात आहे . आजमितीला जगातील बहुसंख्य मुले कुपोषणाची शिकार झालेली आहेत .
दरवर्षी जगातील दहा कोटी मुले ह्या कुपोषणामुळे आणि उपासमारीने मरण पावतात . आणि ह्याचं दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या मागणीमुळे आधुनिक वसाहतवाद जन्मास येत आहे . याचेच उदाहरण म्हणजे , तेलाने युक्त असणारा उत्तर आफ्रिकी देश लिबियाने गहू उत्पादनासाठी भाडेतत्त्वावर घेतलेली मध्य आशियातील युक्रेन ह्या देशातील २४ लाख एकर जमीन .
फक्त भोगी जीवनासाठीचं विज्ञानाचा वापर केला गेल्यामुळे असंख्य नैसर्गिक आपत्तींना आपल्याला आज सामोरे जावे लागत आहे .
" जगातील प्रत्येक देशाने आपआपल्या भौगोलिक स्थितीशी , आपल्या संस्कृतीशी असणारी आपली जन्मजात नाळ तोडल्या कारणाने निसर्गाकडून फुकट मिळणाऱ्या गोष्टींना , आज विकत घेण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे " .
ज्याप्रमाणे नवजात जन्मलेल्या मुलाच्या बेंबीला जी आईची नाळ जोडलेली असते आणि त्या नाळेमध्ये ज्याप्रमाणे अवयवांची पुनर्निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या पेशी असतात , ज्या पेशींच्या सहायाने पुन्हा एकदा कोणत्याही अवयवांचे पुनर्निर्माण करता येऊ शकते , तसेच आपली देखील आपण राहत असणाऱ्या देशाशी , आपल्या संस्कृतीशी , आपल्या देशात असणाऱ्या भौगोलिक स्थितीशी आईप्रमानेचं ज्ञानाची आणि वातावरणीय नेसर्गिक नाळ ही जोडलेलीचं असते जी की , आपण तोडल्याशिवाय तुटत नाही . तिच्यात देखील पुनरुज्जीविकरणाचे गुण भरलेले असतात पण आपण आपल्या थोड्याशा फायद्यासाठी आपली ही ज्ञानाची नाळ आपल्या भौगोलिक परिस्थितीशी आणि संस्कृतीशी तोडल्यामुळे आज आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रात आपली दुसऱ्यांवर विसंबण्याची वृत्ती दृष्टीस पडते .
आपल्या पृथ्वीची रचना आपल्या शरीराला सारखी आहे . ज्याप्रमाणे शरीरातील रक्तामधून पाणी काढून घेतल्यावर जसे निर्जलीकरणामुळे मनुष्य रग आणि रंगहीन होऊन जातो ना! तसेच पृथ्वीच्या आतील पाण्याचा साठयाचा भरमसाठ उपसा केल्यामुळे आणि ते पाणी यांत्रिकीकरणामुळे पुनर्जीवित न झाल्याकारणाने पृथ्वीतील रग आता दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे आणि आता लवकरच आपल्याला निसर्गाच्या भयाण रुपास सामोरे जावे लागेल किंबहून त्याची सुरूवात झालेली आहे . त्यामुळे ह्या गोष्टींपासून आपल्याला जगाला वाचवायचे असेल ना! तर आपण आपल्या प्राचीन ज्ञानाला स्वीकारायला हवं , संस्कृतीला जोपासायला आणि प्राचीन शेती पद्धतीला पुनःआत्मसात करून ह्या जगाचा आध्यात्मिक ज्ञानाद्वारे सम्यक विकास करायला हवा . तेव्हाचं हे जग टिकेल आणि हा देश बहरेल ...
..... वंदे मातरम ... जय हिंद ... जय भारत .....





Nice....
उत्तर द्याहटवाApratim lekh
उत्तर द्याहटवाShubhecha 🌱🌷🌞