पोस्ट्स

भारतीय संस्कृती आणि व्यापाराचा विश्वसंचार .....

इमेज
          भारतीय  अध्यात्म आणि प्राचीन भारतीय विज्ञान हे विश्वामध्ये नेहमीच उत्कृष्ट मानले गेलेले आहे . ज्यावेळेला विश्वातील बहुतांश देश असंस्कृत जीवन जगत होते , त्यावेळी भारतीय विज्ञान आणि अध्यात्म एका सर्वोच्च ठिकाणावर विराजमान होते . भारतीय ज्योतिषशास्त्र , स्थापत्यशास्त्र , आयुर्वेदशास्त्र , युद्धशास्त्र या शास्त्रांचे बहुतांश पुरावे आज वेगवेगळ्या देशांत आढळलेले आहेत , किंबहुना आजच्या उत्तर अमेरिकेतही ते आढळलेले आहेत . अमेरिकेचा शोध हा अमेरिगो व्हेस्पुसी याने लावला असे आपण मानतो पण याआधीही कितीतरी शतके भारतीय नाविक आणि व्यापारी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांतील देशांमधे व्यापार करत होते याचे पुरावे म्हणजेच मेक्सिको देशाच्या दक्षिण प्रांतांत पलेंके या भागात सापडलेले भारतीय संस्कृतीशी निगडित असणारे मय संस्कृतीचे स्थापत्यशैलीतील तसेच मय कालगणनेतील अवशेष . ही मय संस्कृती मॅक्सिकोत इसवीसनपूर्व सातव्या शतकात स्थापली गेली आहे . म्हणजेच , येशू ख्रिस्ताचा जन्माआधी सात शतके . तसेच मध्य अमेरिकेतील बर्‍याचशा देशांमध्येही ही संस्कृती निदर्शनास आलेली आहे...

संस्कृतीशी जोडूनी नाळ , साधूया विश्वाचा विकास .....

इमेज
     आज जगभरामध्ये आपण बघत असाल की , मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य टंचाई निर्माण झालेली आहे . जमिनीवरील पाण्याची पातळी दिवसेदिवस ढासळत चाललेली आहे . जमिनीची उर्वरकता रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे नष्ट होत आहे . भारतातील शेतीयोग्य जमीनीपैकी सुमारे ४० टक्के जमीन रासायनिक खतांच्या अति वापरामुळे नापीक झालेली आहे . भारतातील अनेक भागांमध्ये जमिनीतील भूगर्भातील पातळी पूर्णपणे खालावलेली आहे . चारशे ते पाचशे फूट खोल कूपनलिका घेऊन देखील आज पाणी लागत नाहीये . आधुनिक अवजारांच्या वापरामुळे जमीन दिवसेंदिवस कडक होत चाललेली आहे आणि त्यात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव आणि गांडूळे दिवसेंदिवस नाहीसे होत आहेत . ज्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा नाहीसा झालेला आहे आणि ह्याचं गोष्टीमुळे जमिनीतील पोषकद्रव्य पिकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचतच नाहीत .            ज्यामुळे आपण करतं असणारी आजची शेती ही एकप्रकारे कुंड्यांमधील किंवा एका सिमेंटच्या हौदात करत असणाऱ्या शेतीसारखी झालेल आहे . ज्यात त्या कुंडीत किंवा त्या सिमेंटच्या हौदात असणाऱ्या तेवढ्...

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

इमेज
             आरक्षण , हा विषय सध्या प्रत्येकाच्या चहाचा विषय झालेला आहे , एखाद्याने चहाच्या सवडीला आरक्षणाचा विषय नाही घेणे म्हणजे नवलच म्हणावं लागेल . ज्यांना आरक्षण आहे ते अजून आरक्षण वाढवायचे कसे याचा विचार करतायेत तर ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मिळवायचे कसे याचा विचार करतायेत . आज ह्या देशातील जवळजवळ सर्वच लोकांना फक्त स्वतःच्या दिखाऊ अन् तात्पुरत्या प्रगतीचे घेणे पडलेले आहे . आज देशातील कुणालाही स्वतःच्या हिमतीवर आणि बळावर ह्या देशाचा विकास करण्याचा प्रगती करण्याचा साधा विचार देखील मनात नाहीये . देशातील राजकारण्यांना सत्ता हवी तर देशातील जनतेला फक्त स्वतःचा भपकेबाज आणि न टिकणारा अपूर्ण विकास हवा आहे . जर खरचं ह्या देशातील जनतेला संविधानाच्या मूल्यांवर आधारित असणारा सामाजिक , राजकीय न्यायाच्या परिघात आणि समानतेच्या व संधीच्या शिखरावर असणारा खरा समाजवादी आणि राष्ट्रवादी देश हवा असेल ना! तर देशात असणाऱ्या ह्या आरक्षणाच्या बाबीला आज पूर्णपणे नष्ट करायला हवे . देशाचा खरा विकास करायचा असेल ना! तर या देशातील जनतेला प्रत्यक्ष स्पर्धेच्या तयारी मधील अपूर...

नैतिक मूल्यांचा ऱ्हास , तर देशाचा सर्वनाश .....

इमेज
          गेल्या दोन आठवड्यात एक बातमी मोठ्या वेगाने पसरत होती , ती म्हणजे उत्तर प्रदेश सरकारने अश्लिल चित्रपट असणाऱ्या साईट्सवर घातलेली बंदी . लोकांच्या भावना उसळायला लावणाऱ्या ह्या वेबसाईट्सवर सरकारने घातलेली बंदी एकदम योग्यचं आहे . पण इथे ह्या ठिकाणी एक विचार मनात आल्याशिवाय राहत नाही , तो म्हणजे हे केले गेलेले उपाय फक्त वरच्या वर तर नाही ना! थोडक्यात एखाद्या शहराला जोडणारा मुख्य रस्ता जरी बंद केला तरी तिकडे जाणारे कच्चे रस्ते चालूचं असले तर काय उपयोग अर्थात आपल्याकडील एका म्हणी प्रमाणे " इच्छा असेल तर मार्ग सापडेल " ज्याच्या मनामध्ये अश्लील बघण्याचे , अश्लीलता उपभोगण्याचे विचार आहेत इच्छा आहेत तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने ह्या गोष्टीकडे जाणारचं आहे ना! म्हणून फक्त वरच्या वर उपाय करून नाही ,   तर इच्छेला उत्पन्न करणाऱ्या कारणांवर आपल्याला घाव घालावा लागेल तेव्हाचं आपल्याला देशात वाढत चाललेल्या बलात्कार , अनैतिक संबंध आणि त्यातून फोफपनारी गुन्हेगारी ह्या गोष्टींवर कायमस्वरूपी बंदी घालता येईल . २०१७-१८ मध्येही केंद्र सरकारने अनेक अश्लील वेबसाइट्सवर...

" भावकीचा नाही , तर गावकीचा अन देशाचा विकास करायचा आहे " .....

इमेज
                    दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये आलेला आपल्याला प्रचंड भाव आणि ह्या भावामध्ये वाहून गेलेली अविचारी जनता आणि ह्या जनतेला पायाशी तुडवून स्वतःचे अस्तित्व उंचावणारे काही नेते , अशी काहीतरी दयनीय अवस्था सध्या आपल्या देशाची झालेली आहे . पक्षवाद , जातीयवाद , वर्णवाद ह्या गोष्टी आपल्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत जसे की , एखाद्या विकसित जागेचे भाव . याचे कारण फक्त आपणचं आहोत , जेव्हा एखादी निवडणूक जाहीर होते , त्यावेळेला पक्षातले , काही आपल्या भावकीतले , कुटुंबातले लोक ह्या निवडणुकांसाठी उभे राहतात आणि सुरुवात होते पक्षवादाची . निवडनुका ह्या फक्त जिंकायच्या आहेत एवढेचं नेत्यांची ध्येय असतात , पण जिंकल्यानंतर काय? याचा विचार कोणीच करत नाही आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये लोकांना दिलेली आश्वासने ही सारी फोल ठरतात . त्यामुळे हे त्रिवार सत्य आहे की , जगातील सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते आपण दिलेल्या वचनावर ठाम असणे हे आहे . अर्थात ह्या आश्वासनांना जागण्यासाठी असणारी योग्य नीतिमत्त...

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....

इमेज
          आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन चालू आहेत . ही आंदोलन शेतकी क्षेत्रांमध्ये होणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत . आज देशातील अनेक क्षेत्रांमध्ये सरकार खाजगीकरण आणत चालले आहे . सरकारचे म्हणणे आहे की , खाजगीकरणामुळे देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये होणारे गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल आणि त्याद्वारे त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवंतंत्राचा वापर होईल आणि त्याचबरोबर त्या क्षेत्राचा विकास देखील होईल . हो नक्कीचं भांडवलशाहीमुळे देशात असणाऱ्या विविध क्षेत्रातील लावले जाणारे पैशाचे प्रमाण हे नक्कीचं वाढेल आणि त्यातून त्या क्षेत्राचा काहीकाळ भपकेबाज विकास देखील होईल पण ह्या झालेल्या विकास कामांना वाली  तर काही ठराविक लोकचं असतील ना! असे लोक ज्यांना फक्त स्वफायदा महत्त्वाचा आहे आणि अशा लोकांमुळे , देशात नक्कीचं काही काळ विकास दिसेल पण पुढे हळूहळू ह्या खाजगीकरणाचे वाईट परिणाम देशाला एका युद्धाच्या मैदानात आणून सोडतील , असे युद्ध जे देशात तयार झालेल्या उच्च आणि कनिष्ठ या दोन वर्गांमध्ये लढले गेलेले असेल ज्यामुळे देशाचे फक्त आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक , श...

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

इमेज
                ह्या जगातील आपल्या सर्वांना येणारी दुःख ही भौतिक बंधनांमुळे येतात , कारण भौतिक सुखांची , भौतिक आनंदाची आपल्याला प्राप्ती होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या भौतिक गोष्टीच्या आधाराची गरज असते . तो आनंद कोणत्याही स्वरूपाचा असूद्यात . जेव्हा एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो अथवा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते , तेव्हा त्या व्यक्तीला सर्वाधिक दुःख होते जो व्यक्ती मृत्यू झालेल्या अथवा सोडून गेलेल्या व्यक्तीशी कोणत्या ना कोणत्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भौतिक बंधनाद्वारे जोडला गेलेला असतो कारण त्या व्यक्तीचा भौतिक सुखांचा आधार हा पूर्णपणे हरवलेला असतो , म्हणजेच थोडक्यात भौतिक बंधने तुम्हाला ह्या जगतामध्ये अडकवून ठेवण्याची काम करतात . याउलट अध्यात्मिक अंगामध्ये असते ,  ज्या ठिकाणी स्वतःला ह्या जगातून एका योग्य अध्यात्मिक साधनेद्वारे मुक्त करण्याचा सुंदर मार्ग दिलेला असतो . " अध्यात्मिक जगतातील स्वतःच्या मुक्तीचा मार्ग अर्थात अध्यात्मिक स्वार्थ  म्हणजे स्वतःचे सोडून अवघ्या विश्वातील लोकांचे कल्याण करण्यामध्ये लप...