" शेती " हा आपल्या देशाचा एक प्रमुख व्यवसाय आहे , अरे देशाच्या पाठीचा कणाच म्हणा की , पण आज तोच पाठीचा कणा मोडत चाललाय असं वाटतंय , कारण आज शेतीमध्ये कीटकनाशके वापरल्याशिवाय शेती करणे शक्यच नाही . बिना अजैविक खतानं शिवाय शेतीत पिकचं येत नाही . हरितक्रांतीच्या नावाखाली ह्या विषारी खतांची सुरुवात भारतात झाली . अनेक विषारी कीटकनाशके , खते आपण पिके चांगली यावी म्हणून वापरतो , परंतु त्या खतापासून त्या कीटकनाशकांपासून पीक टुमदार नक्कीच दिसते , पण पिकाची गुणवत्ता पूर्णपणे ढासाळते . ज्याप्रमाणे ड्रग्स ( सर्प पावडर )याच्या सेवनाची ,
एकदा सेवन केल्यावर शरीराला जशी सवय लागते ना ! तशीच सवय आज आपल्या भूमीला , आपल्या मातीला आणि पिकांना लागलेली आहे . आणि त्यातच आज मितीला कंपनीमधून जे " बी " आपण लागवडीसाठी , पेरणीसाठी घेतो ना! त्या बियांची पेरणी केल्यावर जे धान्य तयार होते ना! ते पुन्हा तुम्ही पेरणीसाठी वापरले ना! तर ते उतरून येत नाही . इतकी पिकांची कार्यक्षमता फक्त व्यापारापायी ढासळलेली आहे .
आपण जे खातो त्यावरच आपलं आरोग्य , आपले वर्तन , आपला स्वभाव ठरलेला असतो आणि तुम्ही या ठिकाणी गुणवत्ता नसलेली विषारी औषध फवारलेली भाज्या , कडधान्य खात आहात तर तुमचे आरोग्य कसं चांगलं राहील .
अनेक मोठ्या मोठ्या आजारांचं कारण आपण शेतात फवारतो ना! तीच औषध आहे . एक बाजूने शेतकरी जास्त उत्पादन मिळावे , जास्त फायदा , जास्त पैसे मिळावे म्हणून शेतीसाठी प्रमाणाबाहेर औषध वापरतो आणि त्याच औषधांपासून होणाऱ्या रोगामुळे त्याला दुप्पट पैसे खर्च करण्याची वेळ येते आहे . १९६० च्या दशकात आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी व्हावा ,म्हणून इथल्या नेतेमंडळींनी ही विदेशी विषारी औषधे हरितक्रांतीच्या नावाखाली भारतात आणली पण त्यामुळे आपला देश स्वावलंबी बनण्याऐवजी परावलंबी जास्त बनला .
आज मीतिला एखाद्या गावात शाळा कॉलेजेस दिसणार नाही पण तेथे खता औषधांचे दुकान नक्की दिसेल . भारतात असणाऱ्या खता - औषधांच्या दुकानदारांना विदेशी कंपन्या दरवर्षी करण्यासाठी मोठमोठाले " टूर पॅकेजेस " देतात यावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठ्या प्रमाणात हा विषाचा व्यापार भारतात चालू आहे आणि जो औषध फवारणीचा माल आपण येथे पिकवतो ना! तोच माल जो आपल्याला खता - औषधांचा पुरवठा करतो ना! तोच घेत नाही . यावरूनच तुम्ही समजून घ्या की , आपला देश आणि इथली लोकं ही विदेशी कंपनीसाठी फक्त एक व्यापाराचे साधन आहेत .
दरवर्षी वीस ते पंचवीस हजार ( हा आकडा जास्तही असू शकतो. )शेतकरी फक्त औषध फवारणी केल्यामुळे मरतात आणि त्या कीटकनाशकांपासून तयार होणाऱ्या रोगांमुळे कितीतरी कोटी लोक दरवर्षी भारतात मृत्युमुखी पडतात , त्याचंच उदाहरण म्हणजे आज भारताला पंजाब प्रांतामध्ये कॅन्सर एक्सप्रेस चालवावी लागत आहे . हे फक्त पंजाब मध्ये आहे असे नाही , तर भारताच्या इतरही भागात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण वाढत चाललेले आहे आणि दुसरं म्हणजे ह्या तयार झालेल्या आजारांवर औषध
पुरवठा करणाऱ्या कंपन्यापण सगळ्या विदेशी आहेत म्हणजेच " सापही त्यांचा आणि काठीही त्यांची " रोगही तेच देणार आणि उपायही तेच सांगणार , अरे अशा गोष्टींमुळे भारतातील समाज पिसाटला गेला आहे आणि खूप वाईट गोष्टी फक्त फायद्यासाठी आपल्यावर लादण्याचा प्रकार विदेशी कंपन्या आणि त्यांना साथ देणारे आपले सरकारी लोक , नेतेमंडळी करत आहे .
अरे इंग्रज येण्यापूर्वी भारतातील शेती आणि इथली व्यवस्था कशी होती हे ठाव आहे का तुम्हाला . अरे आपली पिके आपले मसाल्याचे पदार्थ त्यांच्या गुणवत्तेसाठी त्यांच्या स्वादासाठी सबंध युरोपभर प्रसिद्ध होते , परंतु आज तिचं पिके , तेचं मसाल्याचे पदार्थ या हरितक्रांतीच्या नावाखाली आणलेल्या विषारी सापामुळे गुणवत्ताहीन झालेले आहे आणि त्यामुळे कृषिप्रधान असणाऱ्या या देशाचा पाठीचा कणा असणारा शेती व्यवसाय हळूहळू मोडकळीस येत चालला आहे . याचा विचार करा जरा कधी .
आपण अजूनही जागे झालो नाही ना! तर येणाऱ्या काळात आपल्या देशाला कुबड्यांची आवश्यकता भासेलच......
अजूनही वेळ गेलेली नाहीये , म्हणून जागे व्हा आणि अजैविक खतांचा वापर नष्ट करून जैविक खतांच्या वापराला सुरुवात करा , आणि आपल्या देशाला स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवा .
वंदे मातरम् जय हिंद
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट विश्लेषण उपरोक्त विषयावर काय उपाय करता येतील हे देखील शब्दांकित करा....
उत्तर द्याहटवानक्कीच भावा .....
हटवा