सुसंस्कृत विचारी तरुण हेच देशाची खरी संपत्ती .....
आज आपण जितकी उंच प्रभूची , महापुरुषांची , युगपुरुषांची स्मारक बांधत आहोत ना! तितक्याच खालच्या पातळीवर इथल्या लोकांची विचार क्षमता चाललेली आहे आणि म्हणूनच इतक्या वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत . आज आम्ही धर्माचे रंग लावून हिंडत आहोत पण त्या धर्माची नैतिक मूल्ये मात्र आम्ही स्वीकारायला तयार नाही होत .
आज मी जगात बघतोय , जो तो आपल्या धर्माचा प्रसार व्हावा यासाठी झटत आहे . जो कोणी मिळेल त्याला घाबरवून , समजावून तर कुठे पैसे देऊन आपल्या धर्मात सामील करण्याचा अविचारी प्रयत्न आज या जगात सुरू आहे . कारण काय तर , माझा धर्म महान आहे हे इतरांना सांगण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे . पण आपण समजावून घेतलं पाहिजे की " महानता ही लोकसंख्येवर आधारीत नसून , ती गुणवत्तेवर ठरते " १०० गोणी बदल्याच्या असण्यापेक्षा ४० गोणी चांगला कांदा असणे कधीही उत्तमचं ,
आज आपल्या देशात इतकी अराजकता माजली आहे की , " शेताच्या बांधा पासून तर , देशाच्या सीमेपर्यंत नुसती भांडणचं भांडण चालू आहे " आज आपण जगतो कमी पण भांडणचं जास्त करतो . सगळीकडे नुसता मानसिक कल्लोळ माजलेला आहे . आज ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला केल्या जातात ना! त्यातील बहुतेक गोष्टी फक्त आणि फक्त दिखाऊपणा साठीचं केल्या जात आहेत . आज जी अनेक ठिकाणी किर्तने , प्रवचने ही होतातच , पण तिही बहुतेक वेळा दिखाऊपणासाठीच . आज लोकं कीर्तनाला , प्रवचनाला जातात
पण कशासाठी तर जेवणासाठी , तर कोणी मान सन्मानासाठी . आज आपला हा देश पूर्णपणे एका दलदलीत फसत चालला आहे . पण आम्ही मात्र देशाला ह्या दलदलीतून बाहेर काढण्याऐवजी देशाला अजून दलदलीच्या आतमध्ये ढकलत आहे .
आपला हा देश या दलदलीतून बाहेर निघावा असं वाटतं असेल आणि पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर पूर्ण स्वावलंबनावर उभा करायचा असेल ना! तर आपण आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीला , शिक्षणाला , विचारांना पुन्हा जिवंत करायला हवं आणि ह्या भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोचवायला हवं . " अरे शिक्षण ते असतं जे व्यक्तीला मानसिक समाधान , मानसिक शांती प्राप्त करून देते , ते नव्हे जे व्यक्तीच्या मनात मानसिक कल्लोळ , असंतुष्टता निर्माण करेल "
आज आपला देश सुधरावा आणि इथलचे लोकंसुद्धा एकमेकासंगे गुण्यागोविंदाने रहावी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना , विचार नसावे यासाठी आपण आपल्या देशातील आपल्या प्राचीन सनातनी विचारांना स्वीकारायलाच हवं , ज्यायोगे आपला भारत सुसंस्कृत आणि चांगल्या , स्वाभिमानी विचारांचा बनेल आणि पुन्हा एकदा ह्या जगाचा वैश्विक गुरु बनेल .....






ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा